maharashtraprimenews
ठळक बातम्या
EducationTechnologyटेक्नॉलॉजीठळक बातम्यातंत्रज्ञानराष्ट्रीय

एनआयआरएफ 2025 मध्ये आयआयएम संबलपूरची मोठी झेप

एनआयआरएफ 2025 मध्ये आयआयएम संबलपूरने मोठी झेप घेतली आहे. संस्था स्थापन झाल्यापासून ही सर्वात मोठी झेप आहे. नवीनतम मूल्यांकनात आयआयएम संबलपूरने 34 वा क्रमांक मिळवून आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. उच्च शिक्षणातील नावीन्यपूर्ण उपक्रम, सचोटी, सर्वसमावेशकता आणि समान संधींना प्रोत्साहन देण्यात आयआयएम संबलपूरच्या गतिमान नेतृत्वाचे काम ही कामगिरी अधोरेखित करते. संस्थेची ही उत्कृष्ट कामगिरी शैक्षणिक उत्कृष्टता, नवोपक्रम तसेच सामाजिक प्रभावासाठीचा ध्यास आणि समर्पण अधोरेखित करते. शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करण्यासाठी प्रमाणित आणि पारदर्शक दृष्टिकोन ठेवत एनआयआरएफ उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे. एकूण मूल्यांकनात त्यांचे महत्त्व सिद्ध करण्यासाठी विशिष्ट वेटेजसह एनआयआरएफ पॅरामीटर्सच्या एका व्यापक संचाचा वापर करते.

क्रमवारीवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर भर देत ते वाढवण्यासाठी आयआयएम संबलपूर कार्यरत आहे. त्यामुळेच शैक्षणिक उत्कृष्टता आणि नावीन्यपूर्ण नेतृत्वाचे केंद्र म्हणून आयआयएम संबलपूर वेगळे आहे. अध्यापन, शिक्षण आणि साधनांमध्ये (टीएलआर) संस्थेने झपाट्याने वाढ केली आहे. यासोबतच संस्थेने प्राध्यापकांची संख्या वाढवली, शिकवण्यात वेगळेपणा आणला आणि महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये देखील सुधारणा केल्या. याशिवाय, संशोधन आणि व्यावसायिक सराव (आरपीसी) यातील सुधारणा प्रभावी संशोधन तसेच अहवालांच्या वाढत्या महत्त्वाचे संकेत देतात. पदवी निकाल (जीओ) आणि दृष्टिकोन (पीआर) यातील सकारात्मक बदल देखील सुधारित रोजगारक्षमता, शैक्षणिक स्थिती आणि सामाजिक योगदान दर्शवितात. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारसरणी, नवोन्मेष आणि नैतिक नेतृत्वाला प्रोत्साहन देणारे आयआयएम संबलपूर एक प्रमुख शैक्षणिक संस्था म्हणून आपले स्थान भक्कम करते आहे.

आयआयएम संबलपूरचे संचालक प्रो. महादेव जयस्वाल म्हणाले, “हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी संस्थेतील प्रत्येकाने केलेल्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी मी संपूर्ण आयआयएम संबलपूर टीमचे मनापासून अभिनंदन करतो. अधिक यश मिळवण्यासाठी तसेच अधिक उंची गाठण्यासाठी सुरू असलेला आमचा प्रवास असाच सुरू राहणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) 2025 रँकिंगमध्ये एकदम सोळा स्थाने वर झेप घेऊन नवीनतम मूल्यांकनात 34 वे स्थान मिळवत आयआयएम संबलपूरने आपल्या उत्कृष्टतेची पुष्टी केली आहे. या वर्षी, आयआयएम संबलपूरने अधिकृतपणे जागतिक ऍक्रिडिशनच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. शिक्षण पद्धतीमध्ये एआयचा समावेश करत व्यावसायिक शिक्षणात आंतरराष्ट्रीय दर्जाचा बेंचमार्क असलेल्या एएसीएसबी मान्यता प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. याशिवाय ‘ट्रिपल क्राउन’ दर्जा मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. जगभरातील १% पेक्षा कमी बी-स्कूलना ही दुर्मिळ मान्यता आहे आणि मला हे सांगताना अभिमान वाटतो की, आयआयएम संबलपूर शैक्षणिक उत्कृष्टता, जागतिक सहकार्य, उद्योग भागीदारी आणि सर्वसमावेशकतेच्या बाबतीत वेगाने वाढणारे आयआयएम ठरले आहे. नवोपक्रम, अखंडता आणि सर्वसमावेशकता या प्रमुख मूल्यांवर आमचा दृढ विश्वास आहे. शाश्वततेसाठी आपल्या मजबूत वचनबद्धतेला बळकटी देत, आयआयएम संबलपूरने ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषद (सीईईडब्ल्यू) तसेच मेरीलँड विद्यापीठाच्या सहकार्याने ओडिशाच्या आर्थिक परिवर्तनाच्या प्रवासात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. याबरोबरच एमबीए अभ्यासक्रमासाठी महिला विद्यार्थ्यांची नोंदणी करून अभ्यासासाठी पोषक तसेच सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था वचनबद्ध आहे.

Related posts

राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह 2023: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आगमुक्त राज्य करण्यासाठीचा पुढाकार

Shivani Shetty

पठाणकरिता जॉन आमची पहिली आणि एकमेव पसंती होती!’ : सिद्धार्थ आनंद

Shivani Shetty

विद्यार्थ्यांना शिकवून घरी जाताना शिक्षिकेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं; डंपरखाली चिरडून गमावले प्राण

cradmin

Leave a Comment