maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एचडीएफसी लाइफ जीवन विमा कंपनीने केली नवीन मोहिम लाँच

मुंबई, जानेवारी, २०२५: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या जीवन विमा कंपनीने नवीन मोहिम लाँच केली आहे, जी कुटुंबांना आकार देण्‍यासोबत त्‍यांचे भविष्‍य सुनिश्चित करण्‍यामध्‍ये पालकत्‍व मूल्‍यांच्‍या कालातीत भूमिकेला दाखवते. हृदयस्‍पर्शी कथानकासह मोहिम दाखवून देते की प्रेम, आदर, चिकाटी आणि स्‍वातंत्र्यामधून प्रेमळ नाते निर्माण होते.

एचडीएफसी लाइफने (HDFC Life) खास व प्रेरणादायी जाहिराती निर्माण करण्‍यासाठी प्रतिष्‍ठा प्राप्त केली आहे आणि ही नवीन मोहिम नाविन्‍यपूर्ण दृष्टिकोनाला सादर करते. ही मोहिम भर देते की पालकांचे संगोपन बदलत असलेल्‍या असलेल्‍या विश्‍वामध्‍ये मुलांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, ज्‍यामुळे त्‍यांना आत्‍मविश्‍वास आणि प्रामाणिकपणासह अनिश्चिततांचा सामना करण्‍यास मदत होऊ शकते.

या मोहिमेचे खास आकर्षण आहे दोन भावांची कथा, ज्‍यांच्‍यामध्‍ये अत्‍यंत दृढ नाते आहे, त्‍यांच्‍या पालकांनी त्‍यांच्‍यामध्‍ये समान मूल्‍ये रूजवली आहेत. भावंडांमधील साहचर्यामधून प्रबळ मूल्‍ये बिंबवण्‍याचे आणि त्‍याला पूरक सुरक्षित भविष्‍यासाठी आर्थिक नियोजन (financial planning) करण्‍याचे महत्त्व दिसून येते.

या मोहिमेबाबत मत व्‍यक्‍त करत एचडीएफसी लाइफचे धोरणाचे ग्रुप हेड आणि प्रमुख विपणन अधिकारी विशाल सुभरवाल म्‍हणाले, “पालक त्‍यांच्‍या मुलांचे पहिले शिक्षक व आदर्श म्‍हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मुलांमध्‍ये रुजवणारी मूल्‍ये मुलांच्‍या जीवनाला आकार देतात, त्‍यांना शौर्य व प्रामाणिकपणासह मार्गदर्शन करतात. ही मोहिम दाखवून देते की, या मूल्‍यांसह आर्थिक सुसज्‍जता असल्‍यास कुटुंबांसाठी प्रबळ व दीर्घकालीन पाया निर्माण होऊ शकतो.”

“भारतीयांचे संगोपन नेहमी कौटुंबिक मूल्‍ये व संस्‍कारामध्‍ये सामावलेले आहे. दोन भावंडांची ही अद्वितीय व हृदयस्‍पर्शी कथा प्रेक्षकांना भावनिक प्रवासावर घेऊन जाते आणि कुटुंबामध्‍ये रूजवण्‍यात आलेली मूल्‍ये भावी पिढीच्‍या वर्तमान, तसेच भविष्‍याला आकार देतात हे दाखवून देते. ज्‍यामधून एचडीएफसी लाइफचा संदेश सुरेखरित्‍या सादर होतो – सर उठा के जियो.” असे लिओ बर्नेट साऊथ एशियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर विक्रम पांडे म्‍हणाले.

उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, या मोहिमेच्‍या जाहिरातीचे दिग्‍दर्शन प्रख्‍यात चित्रपटनिर्माते शूजित सिरकार यांनी केले आहे, ज्‍यामुळे कथानकामध्‍ये अद्वितीय भावनेची भर झाली आहे.

ही मोहिम टेलिव्हिजन, डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स आणि आऊटडोअर मीडियावर राबवण्‍यात येईल, तसेच देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

Related posts

साजरा करत आहे महाकुंभ: कोका-कोला इंडिया साधत आहे उत्साह, प्रयोजन आणि सामाजिक प्रभावाचा मेळ

Shivani Shetty

भारतातील पहिली ‘गो कोडर्ज’ राष्ट्रीय कोडिंग स्पर्धा

Shivani Shetty

माझा नवीन मॅजिक मँगो लस्‍सीसह देत आहे अनोख्या स्‍वादाचा अनुभव; अनन्‍या पांडे टीव्‍हीसीमध्ये झळकणार

Shivani Shetty

Leave a Comment