मुंबई, २५ जून २०२४: संशोधन प्रणीत, एकात्मिक, जागतिक औषधनिर्माण कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) ने पोस्टकार्ड आणि कॅलेंडरचे अनावरण करण्यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि लेप्रोलॉजिस्ट (IADVL) सोबत सहयोग केला आहे. त्वचेतील रंगकणांवर परिणाम करणारा त्वचा विकार म्हणजेच कोड असलेल्या रुग्णांप्रती सहानुभूती आणि पाठिंबा दर्शवत याबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा सहयोग करण्यात आला आहे.
चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी आणि स्वीकार करायला प्रोत्साहन देण्यासाठी ग्लेनमार्क आणि IADVL ने २५ जून २०२४ रोजी जागतिक कोड दिनानिमित्त “एम्पथी इन एव्हरी स्ट्रोक” नावाची एक अनोखी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा उद्देश कोड असलेल्या रुग्णांप्रती जागरुकता, समज आणि उपचारांचे महत्त्व यावर प्रकाश टाकणे हा होता. देशभरातील त्वचारोगतज्ञांनी यात सहभाग घेतला आणि १५० हून अधिक चित्रं सादर केली गेली. त्यामध्ये या त्वचारोगासह जीवन व्यतीत करत असलेल्या रुग्णांच्या प्रवासाचे सर्जनशीलतेने चित्रण केले गेले आणि वैविध्याचा स्वीकार करण्याचे महत्त्व या गोष्टीचा पुरस्कार करण्यात आला.
सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे सुवर्णपदक विजेते प्रख्यात सर्जनशील कलाकार श्री. उदय पारकर आणि प्रसिद्ध समकालीन भारतीय कलाकार सुश्री अर्पा मुखोपाध्याय यांच्यासह परीक्षकांच्या एका मंडळाने सर्व कलाकृतींचे बारकाईने परीक्षण करून विजेत्या कलाकृतींची निवड केली.
या प्रक्रियेत भारतभरातील त्वचारोगतज्ञांच्या २२ विजेत्या चित्रांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी १२ चित्रे २०२५ च्या IADVL कॅलेंडरचा भाग असतील. यातील १० चित्रांचे आकर्षक पोस्टकार्डमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यातून कोड झालेल्या रुग्णांप्रती सहानुभूती, सहवेदना, स्वीकृती आणि आदर या महत्त्वपूर्ण गोष्टींची सतत आठवण करून दिली जाईल.
यावेळी बोलताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या इंडिया फॉर्म्युलेशनचे अध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख आलोक मलिक म्हणाले, “आम्हाला कोड रोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट आणि लेप्रोलॉजिस्ट (IADVL) सोबत पुन्हा सहयोग करण्यात अभिमान वाटत आहे. या उपक्रमातून सर्वसमावेशकतेसाठी आणि सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी असलेली आमची बांधिलकी दिसून येते. आमच्या चित्रकला स्पर्धेने प्रेरित होऊन त्वचारोग तज्ञांकडून १५० हून अधिक चित्रं सादर झाली. ही चित्रं आता पोस्टकार्ड आणि कॅलेंडरवर झळकतील. कोड झालेल्या रुग्णांप्रती सहानुभूती, सहवेदना, स्वीकृती आणि आदर या महत्त्वपूर्ण गोष्टींप्रती असलेली आमची बांधिलकी या कार्डमधून दिसून येत आहे. कोड झालेल्या रुग्णांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणत याबाबत असलेल्या गैरसमजांचे आव्हान पेलून अधिक समावेशक समाज निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”
IADVL चे अध्यक्ष डॉ मंजुनाथ शेनॉय म्हणाले, “जगामध्ये भारतात कोड त्वचारोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि रुग्णांना अनेकदा सामाजिक कलंक आणि गैरसमजुती यांचा सामना करावा लागतो. जागरूकता आणि स्वीकृती निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांच्या सामर्थ्यावर आमचा विश्वास आहे. या त्वचारोगाच्या रूग्णांना आधार देण्याच्या दिशेने आणि अधिक समावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी ही पोस्टकार्ड आणि कॅलेंडर म्हणजे लहान पण प्रभावी पायऱ्या आहेत.”
कोड या त्वचारोगा बद्दल:
कोड म्हणजे मेलॅनिन-उत्पादक पेशी नीट काम करत नसल्यामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे त्वचेचे रंगद्रव्य नष्ट होणे. याचा केवळ शारीरिक रंगरूपावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल डर्मेटोलॉजी 2022 मधील नवीनतम डेटा असे दर्शवितो की या त्वचारोगाचा प्रसार जगभरात 0.5 ते 1% पर्यंत असून भारतात हे प्रमाण 8.8% इतके जास्त आहे. त्याचा प्रसार आणि प्रभाव यांची शास्त्रीय कारणे माहीत असूनही या त्वचारोगाविषयी अनेकदा गैरसमज दिसून येतो. त्यामुळे सामाजिक कलंक आणि पूर्वग्रह निर्माण होतात. जगभरात कोड या त्वचारोगाचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये असून दहापैकी एक व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे.