मुंबई, ४ डिसेंबर २०२४-अदानी विल्मार लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या खाद्यपदार्थ आणि एफएमसीजी कंपन्यांपैकी एका कंपनीला ‘बेस्ट रुरल चिल्ड्रन हेल्थकेयर इनिशिएटिव्ह ऑफ द इयर – २०२४’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. कंपनीच्या फॉर्च्युन सुपोषण या प्रमुख ग्रामीण उपक्रमासाठी हा पुरस्कार दिल्लीत झालेल्या इंडियन सीएसआर पुरस्कार २०२४ सोहळ्यात देण्यात आला. यामुळे या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरवयीन मुली आणि गरोदर मातांचे कुपोषण व रक्तक्षयासारख्या समस्या सोडविण्यासाठी देण्यात आलेल्या भरीव योगदानाची दखल घेतली गेली आहे.
श्री.अंगशू मल्लिक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अदानी विल्मार लिमिटेड म्हणाले,‘’फॉर्च्युन सुपोषण उपक्रमासाठी हा पुरस्कार स्वीकारताना आम्ही भारावून गेलो आहोत. या पुरस्कारामुळे तळागाळात आरोग्य आणि पोषण सेवांचा प्रसार करण्याची आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. कुपोषण आणि रक्तक्षयासारख्या समस्या पोषणाशी संबंधित असून, त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतातील सर्वात मोठी खाद्यपदार्थ कंपनी या नात्याने या क्षेत्रात भरीव बदल घडविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे असे वाटते. या पुरस्कारामुळे सुपोषण संगिनींचे क्रांतिकारी काम आणि ग्रामीण भारतात आरोग्यपूर्ण समाज तयार करण्यासाठी भागीदारांकडून मिळत असलेला पाठिंबा अधोरेखित झाला आहे.’’
सुपोषण संगिनी – स्थानिक समाजातील गावकरी स्वयंसेविका या उपक्रमाच्या केंद्रस्थानी असून, त्या आवश्यक आरोग्य आणि पोषण सेवांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व लोकांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी सक्षम करण्यासाठी भरीव कार्य करत आहेत. या उपक्रमाने स्थापनेपासून १४ राज्यांतील ३६ ठिकाणी आपले कामकाज विस्तारले असून, त्या अंतर्गत १,९४० गावे आणि झोपडपट्टी परिसर व २ दशलक्ष लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडविला आहे. या उपक्रमाने ९०,००० मुलांचे आयुष्य कुपोषणापासून वाचविले असून, प्रजनन वयातील ३,००,००० स्त्रियांचे आरोग्य उंचावले आहे, तर १,२०,००० किशोरवयीन मुलींमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.