maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपचा बीएनझेड ग्रीनसोबत सहयोग

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने शाश्‍वत तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍समधील अग्रणी कंपनी बीएनझेड ग्रीनसोबत सहयोगाची घोषणा केली. हा सहयोग पर्यावरणपूरक हरित प्रवासाला चालना देण्‍याप्रती, तसेच पर्यटन क्षेत्राचा पर्यावरणावरील परिणाम कमी करण्‍याप्रती इझमायट्रिपच्‍या कटिबद्धतेमधील महत्त्वाचा टप्‍पा आहे.

 

या सहयोगाच्‍या माध्‍यमातून इझमायट्रिप आपल्‍या बुकिंग प्‍लॅटफॉर्ममध्‍ये बीएनझेड ग्रीनच्‍या अत्‍याधुनिक एपीआयना एकीकृत करेल. ब्‍लॉकचेन-आधारित कार्बन ऑफसेट प्रोग्रामच्‍या विनासायास एकीकरणाच्‍या माध्‍यमातून या सर्व सुविधा देण्‍यात येतील, ज्‍यामुळे प्रवासी प्रत्‍यक्ष प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून कार्बन क्रेडिट्स खरेदी करू शकतील आणि त्‍यांना सुरक्षित ब्‍लॉकचेनवर स्‍टोअर केलेले सत्‍यापित करण्‍यायोग्‍य प्रमाणपत्र मिळतील. वापरकर्त्‍यांना रिअल-टाइममध्‍ये कार्बन उत्‍सर्जन गणन देखील मिळेल, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या फ्लाइटच्‍या कार्बन फूटप्रिंटबाबत माहिती मिळेल. मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करत हा उपक्रम पर्यावरणाप्रती योगदान देण्‍यास कटिबद्ध असलेले जबाबदार प्रवासी घडवेल.

 

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी या नवीन उपक्रमाबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ‘’इझमायट्रिपमध्‍ये आम्‍हाला शाश्‍वत प्रवास पर्यायांना चालना देण्‍यासाठी आमची जबाबदारी माहित आहे. बीएनझेड ग्रीनसोबतचा आमचा सहयोग ग्राहक व पर्यावरणाला फायदा देणारे नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती आमच्‍या दृष्टिकोनाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. पारदर्शक कार्बन फूटप्रिंट डेटा व सोपे ऑफसेट पर्याय देत आम्‍ही वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या प्रवास अनुभवांबाबत तडजोड न करता पर्यावरणपूरक निर्णय घेण्‍यास सक्षम करत आहोत.’’

 

बीएनझेड ग्रीनच्‍या सह-संस्‍थापक डॉ. नेहा जैन म्‍हणाल्‍या, ‘’आम्‍हाला या भविष्‍यकालीन प्रकल्‍पासाठी इझमायट्रिपसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. त्‍यांच्‍या लोकप्रिय प्‍लॅटफॉर्मवर आमच्या एपीआयना एकीकृत करत आम्‍ही लाखो वापरकर्त्‍यांसाठी शाश्‍वत प्रवास पर्याय सादर करत आहोत. या सहयोगामधून हवामान बदलासंदर्भात फ्लाइटमध्‍ये अर्थपूर्ण परिवर्तन करण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे फायदा घेता येऊ शकतो हे दिसून येते.’’

Related posts

कोस्‍टा कॉफीकडून शरद ऋतूमधील बेस्‍ट-केप्‍ट सिक्रेट ‘मॅपल हेझल’ मेनू लाँच

Shivani Shetty

नवीन किया सेल्टोसने 1 लाख बुकिंगचा टप्पा पार केला

Shivani Shetty

ऑडी इंडियाने ‘ऑडी क्‍यू७ बोल्‍ड एडिशन’ लाँच केले

Shivani Shetty

Leave a Comment