maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

‘गोल्ड सील ऑफ अप्रूव्हल®️’ मिळवणारे नवी मुंबईतील अपोलो पहिले रुग्णालय

नवी मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स (एएचएनएम) ला यूएस-आधारित जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसिआय) कडून १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मान्यता प्राप्त झाली आहे. जॉइंट कमिशन इंटरनॅशनल मान्यता हे संसर्ग नियंत्रण शिष्टाचार आणि रुग्णाची सुरक्षा व उपचाराची आवश्यकता यामध्ये सर्वोच्च दर्जाचे अनुसरण व पालन करणाऱ्या संस्थांना दिलेले सुवर्ण मानक आहे.

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे ३ जून २०१७ रोजी जेसीआय द्वारे मान्यताप्राप्त नवी मुंबईतील पहिले रुग्णालय होते, तसेच या रुग्णालयाने जेसीआय-मान्यताप्राप्त रुग्णालय म्हणून गोल्ड सील ऑफ अप्रूव्हल®️ प्राप्त करून साडेसहा वर्षे पूर्ण केली आहेत. जेसीआय मान्यताप्राप्तीचे नूतनीकरण म्हणजे रूग्णांची सुरक्षा, वैद्यकीय सेवेची गुणवत्ता, उपचार आणि समर्पणाबद्दल रुग्णालयाच्या सतत वचनबद्धतेची पुष्टी देते.

श्री.संतोष मराठे, सीईओ-पश्चिमी प्रादेशिक विभाग, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स (एएचएनएम) ने प्रारंभिक काळातच आघाडी प्राप्त करुन दर्जेदार सुरुवात केली. आपल्या विभागातील अग्रगण्य एकात्मिक आरोग्य सेवा प्रदाता म्हणून, एएचएनएम कडे वैद्यकीय सेवा प्रदात्यांद्वारे वापरले जाणारे अनेक आयटी सक्षम उपायांनी परिपूर्ण असे गुणवत्तापूर्ण मार्ग (उपाययोजना) आहेत. भारतीय उपखंडासाठी जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय) सोबतचे आमचे संबंध काही दशकांपासून आहेत. पुनर्मान्यता प्रक्रिया म्हणजे एएचएनएममध्ये प्रदान केल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण वैद्यकीय उपचाराची साक्ष आहे. पूर्णवेळ सल्लागार, हार्डवायर्ड आयटी सॉल्यूशन्स आणि उत्कृष्ट सर्व्हिलेन्समुळे एएचएनएम उत्कृष्ट वैद्यकीय परिणाम आणि रुग्णाला चांगली सुरक्षा प्रदान करु शकते.”

जेसीआय चिकित्सक, परिचारिका आणि आरोग्य सेवा प्रशासकांच्या तज्ञ टीमने प्रस्थापित मानके आणि सतत सुधारणांच्या प्रयत्नांच्या संबंधात हजारो तत्वांचे मूल्यांनक केले आहे आणि कार्यक्षमतेच्या दर्जाचे आकलन केले आहे. जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (जेसीआय) मान्यता मिळवण्यासोबतच, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे नॅशनल ऍक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स (एनएबीएच) द्वारे देखील मान्यतापाप्त आहे.

Related posts

गुन्हा, षडयंत्र आणि भ्रष्टाचार: ‘मनी माफिया सीझन ३’ ७ एप्रिल रोजी डिस्कव्हरी चॅनलवर

Shivani Shetty

एंजल वनची धोरणात्‍मक सुधारणा

Shivani Shetty

खाता येण्याजोग्या फोर्क्सच्या पहिल्यावहिल्या प्रयोगातून मॅगीने दिली बदलाची प्रेरणा

Shivani Shetty

Leave a Comment