maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील ८२ टक्‍के प्रोफेशनल्स २०२५ मध्‍ये नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत, पण शोध पूर्वीपेक्षा अधिक आव्‍हानात्‍मक आहे

भारत, १६ जानेवारी २०२५: जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)च्‍या नवीन संशोधनानुसार, भारतातील ५ पैकी ४ (८२ टक्‍के) प्रोफेशनल्स यंदा नवीन रोजगार शोधण्‍याचे नियोजन करत आहेत, तसेच अर्ध्‍याहून अधिक (५५ टक्‍के) प्रोफेशनल्सच्‍या मते, गेल्‍या वर्षभरात रोजगार शोधण्‍याची प्रक्रिया अधिक आव्‍हानात्‍मक झाली आहे. भारतातील दोन-तृतीयांशहून अधिक (६९ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्सचे हेच मत आहे, ज्‍यामधून २०२५ मध्‍ये प्रोफेशनल्सनी रोजगारासाठी अर्ज करण्‍याच्‍या व रोजगार मिळवण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये आवश्‍यक बदल करण्‍याची गरज दिसून येते.

 

आव्‍हानात्‍मक रोजगार बाजारपेठेत स्थिर आशा

नोकरीसाधकांना २०२४ मध्‍ये कमी हालचालीसह कर्मचारी बाजारपेठेतील मंदीचा सामना करावा लागला. २०२५ ची सुरूवात झाली असताना २०२४ मध्‍ये नवीन रोजगाराचा शोध घेतलेले पाचपैकी एक (१५ टक्‍के) श्रमजीवी व्‍यावसायिक आजही नवीन संधींचा शोध घेत आहेत. आव्‍हानात्‍मक बाजारपेठेने काहीजणांना माघार पत्‍करण्‍यास भाग पाडले, जेथे ३७ टक्‍के प्रोफेशनल्स म्‍हणतात की त्‍यांचे २०२५ मध्‍ये नवीन रोजगाराचा शोध घेण्‍याचे नियोजन नाही. पण, अनेकांमध्‍ये आत्‍मविश्‍वास देखील वाढत आहे, जेथे ५८ टक्‍के प्रोफेशनल्सचा विश्‍वास आहे की रोजगार बाजारपेठेत सुधारणा होईल आणि त्‍यांना २०२५ मध्‍ये नवीन रोजगार मिळण्‍याची आशा आहे.

 

प्रोफेशनल्सनी मोठे पाऊल उचलत रोजगाराचा शोध घेण्‍याची गरज आहे

अनेक प्रोफेशनल्स अनेक रोजगारांसाठी अर्ज करत आहेत, पण हे धोरण ति‍तकेसे प्रभावी नाही. खरेतर, ४९ टक्‍के नोकरीसाधक अधिकाधिक रोजगारांसाठी अर्ज करत आहेत, पण प्रतिक्रिया कमी मिळते. नियोक्‍त्‍यांना देखील प्रक्रिया मोठ्या प्रामणात आव्‍हानात्‍मक आढळून येत आहे. एक-चतुर्थांशहून अधिक (२७ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्स दिवसाला ३ ते ५ तास अर्जांचे पुनरावलोकन करण्‍यामध्‍ये वेळ व्‍यतित करतात आणि ५५ टक्‍के प्रोफेशनल्स म्‍हणतात की, त्‍यांना मिळणाऱ्या रोजगार अर्जांपैकी अर्ध्‍याहून कमी अर्ज सर्व निकषांची पूर्तता करतात.

 

करिअर तज्ञआणि लिंक्‍डइन इंडियासाठी वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, Career Expert and Sr. Managing Editor for LinkedIn India) म्‍हणाल्‍या, ”रोजगार बाजारपेठ आव्‍हानात्‍मक आहे, पण यामधून भारतीयांना त्‍यांच्‍या रोजगार शोधाप्रती अधिक विचारशील दृष्‍टीकोन अवलंबण्‍याची गरज देखील दिसून येते. योग्‍य कौशल्‍ये आत्‍मसात करणे महत्त्वाचे आहे, तसेच तुमचा लिंक्‍डइन प्रोफाइल अद्ययावत ठेवणे आणि तुमच्‍या कौशल्‍यांशी जुळणाऱ्या पदांवर लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. अधिक धोरणात्‍मक व जाणीवपूर्वक काम केल्‍याने तुम्‍हाला आव्‍हानात्‍मक रोजगार बाजारपेठेत देखील नवीन संधी आणि अर्थपूर्ण करिअर वाढ मिळू शकते.”

 

लिंक्‍डइनन नोकरीसाधकांना त्‍यांच्‍यासाठी योग्‍य पदांचे मूल्‍यांकन करण्‍याकरिता नवीन ‘जॉब मॅच’ वैशिष्‍ट्य सादर करत आहे

नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनाशी जुळून राहत वरचढ ठरण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन नवीन जॉब मॅच वैशिष्‍ट्य सादर करत आहे, जे त्‍यांची कौशल्‍ये व अनुभव खुल्‍या पदांसाठी कशाप्रकारे अनुकूल आहे हे दाखवते. ज्‍यामुळे त्‍यांना नियुक्‍त करण्‍याची शक्‍यता असलेल्‍या संधींचा शोध घेण्‍यावर फोकस करण्‍यास मदत होईल. एका क्लिकसह नोकरीसाधकांना ते कोणत्‍या पात्रतांची पूर्तता करतात आणि कोणत्‍या संधी चुकवत आहेत याबाबत तपशीलवार माहिती मिळते, ज्‍यामुळे ते अर्ज करावे की नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात.

 

प्रीमियम सबस्‍क्रायबर्स देखील वर्गीय रेटिंग पाहू शकतील, जे ते उच्‍च, मध्‍यम किंवा कमी पात्र असल्‍याचे आणि त्‍यांना टॉप अॅप्‍लीकण्‍ट म्‍हणून नियोक्‍त्‍याकडून प्रतिक्रिया मिळण्‍याच्‍या शक्‍यतेचे संकेत देते. तसेच, प्रीमियम सबस्‍क्रायबर्सना त्‍यांचे कव्‍हर लेटर व रिझ्यूम सुधारण्‍यासाठी लिंक्‍डइनच्‍या एआय-पॉवर्ड टूल्‍सवर टॅप करण्‍याचा पर्याय मिळेल.

 

बहुतांश व्‍यावसायिक नवीन रोजगाराचा शोध घेत असताना लिंक्‍डइनचे जॉब्‍स ऑन द राइज कुठे शोध घ्‍यावा हे दाखवते

भारतातील ५ पैकी तीन (६० टक्‍के) प्रोफेशनल्स म्‍हणतातकी, ते नवीन उद्योग किंवा क्षेत्रामध्‍ये भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहेत आणि ३९ टक्‍के व्‍यावसायिक संधी मिळवण्‍यासाठी यंदा नवीन कौशल्‍ये शिकण्‍याचे नियोजन करत आहेत. खरेतर, लिंक्‍डइन सदस्‍य २०२२ पासून त्‍यांच्‍या प्रोफाइलमध्‍ये नवीन कौशल्‍यांची भर करण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये १४० टक्‍के वाढ झाली आहे. एआय कौशल्‍यांच्‍या महत्त्वाला चालना देत राहिले, जेथे ते भविष्‍यात प्रत्‍येक रोजगारासाठी संबंधित बनले आहे आणि बहुतांश टास्‍क्‍ससाठी आवश्‍यक आहेत, असे लिंक्‍डइनच्‍या नुकतेच जारी करण्‍यात आलेल्‍या वर्क चेंज अहवालामधून निदर्शनास आले आहे.

रोजगारामध्‍ये बदल करण्‍यासोबत नवीन संधींचा शोध घेत असलेले प्रोफेशनल्स गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये झपाट्याने वाढलेल्‍या रोजगारांबाबत माहिती मिळवण्‍यासाठी लिंक्‍डइन इंडियाचा जॉब्‍स ऑन द राइज अहवाल पाहू शकतात. यंदाच्‍या जॉब्‍स ऑन राइजमधील जवळपास दोन-तृतीयांश (६५ टक्‍के) पदे भारताच्‍या यादीमध्‍ये नवीन आहेत आणि यापैकी अर्धी (५० टक्‍के) पदे २५ वर्षांपूर्वी अस्तित्‍वात नव्‍हती. एअरक्राफ्ट मेन्‍टेनन्‍स इंजीनिअर, रोबोटिक्‍स टेक्निशियन आणि क्‍लोजिंग मॅनेजर हे भारतातील अव्‍वल तीन झपाट्याने विकसित होणारे रोजगार आहेत. यंदाच्‍या रँकिंगमधून सुरक्षा-केंद्रित इंजीनिअरिंग, प्रवास आणि वैयक्तिक सेवा क्षेत्र पदांमध्‍ये अधिक वाढ दिसून येते, जेथे महामारीनंतर भारतातील बहुतांश भागांमध्‍ये व्‍यवसाय पुन्‍हा सुरळीत झाले आहेत.

 

आगामी वर्षामध्‍ये नोकरीसाधकांसाठी उपयुक्‍त टिप्‍स व टूल्‍स

प्रोफेशनल्स २०२५ मध्‍ये रोजगार शोधाच्‍या माध्‍यमातून मोठे पाऊल उचलण्‍यास सज्‍ज असताना लिंक्‍डइन नोकरीसाधकांना वरचढ ठरण्‍यास, योग्‍य रोजगाराचा शोध घेण्‍यास आणि त्‍यांच्‍या रोजगार क्षमतेला एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यासाठी माहिती मिळवण्‍यास मदत करू शकते.

 

२०२५ मध्‍ये रोजगाराचा शोध घेण्‍यासोबत वरचढ ठरण्‍यासाठी लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट टिप्‍स:

● अनुकूल मानसिकतेचा अवलंब करा: विद्यमान रोजगारबाजारपेठेमधून नेव्हिगेट करणे आव्‍हानात्‍मक आहे, पण स्थितीचा अवलंब करण्‍याच्‍या इच्‍छेसह करिअर वाढीसाठी अनेक संधी आहेत. हायरिंग प्रक्रियेदरम्‍यान अनुकूलता व कम्‍युनिकेशन यासारखी तुमचेसॉफ्ट स्किल्‍स दाखवण्‍याची खात्री घ्‍या आणि स्‍वत:मध्‍ये ही कौशल्‍ये आत्‍मसात करा. तुम्‍ही लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेससह अपस्किल होऊ शकता, जसे बिल्डिंग करिअर अॅजिलिटीअँड रेसिलिएन्‍स इन द एज ऑफ एआय (Building Career Agility and Resilience in the Age of AI) आणि लँडिंग ए जॉब अॅज ए स्किल्‍स-फर्स्‍ट कँडिडेट (Landing a Job as a Skills-First Candidate), जे ३१ मार्च २०२५ पर्यंत मोफत आहेत.

● तुमचा लिंक्‍डइन प्रोफाइल अद्ययावत ठेवा: इतर सर्व गोष्‍टींसह विशेषत: आजच्‍या रोजगार बाजारपेठेत तुमचा लिंक्‍डइन प्रोफाइल अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण नियोक्‍ते उमेदवारांमधील टॅलेंट शोधण्‍यासोबत त्‍यांच्‍याबाबत अधिक माहिती मिळवण्‍यासाठी प्रथम प्रोफाइल पाहतात. वरचढ ठरण्‍यासाठी एक्‍स्‍पेरिअन्‍स सेक्‍शनमध्‍ये तुमची कौशल्‍ये दाखवा. प्रोफाइलमध्‍ये पाच किंवा अधिक कौशल्‍ये दाखवणाऱ्यांना रिक्रूटर्सकडून जवळपास ५.६ पट अधिक प्रोफाइल व्‍ह्यूज आणि मेल्‍समध्‍ये २४ पट रिक्रूटर मिळतात.

● रोजगारासाठी आवश्‍यक कौशल्‍ये व पात्रता जाणून घ्‍या: लिंक्‍डनच्‍या नवीन जॉब मॅच वैशिष्‍ट्याचा वापर करत सेकंदांमध्‍ये कोणत्‍याही जॉब पोस्टिंग्‍जसाठी आवश्‍यक कौशल्‍ये व पात्रता त्‍वरित समजून घ्‍या. यामुळे तुम्‍हाला तुमच्‍यासाठी अनुकूल पदे सहजपणे ओळखता येईल आणि वेळ व प्रयत्‍न कुठे लक्ष केंद्रित करावे हे देखील समजेल.

● सुरक्षितपणे शोध घ्‍या: नवीन संधीचा शोध घेताना समाधान व आत्‍मविश्‍वास मिळण्‍यासाठी तुम्‍हाला जॉब पोस्टिंग्‍जवरील व्‍हेरिफेकशन बॅज देखील पाहता येईल, जे सत्‍यापित केलेले असते, ज्‍यामुळे लिंक्‍डइनवरील जवळपास अर्धे रोजगार सत्‍यापित आहेत.

● नवीन संधींचा शोध घ्‍या: सध्‍याची खुली पदे, वर्क-फ्रॉम-होम उपलब्‍धता, प्रत्‍येक पदासाठी सर्वात सामान्यकौशल्‍ये, अव्‍वल शहरांमधील हायरिंग अशा कृतीशील माहितीसह लिंक्‍डइनच्‍या जॉब ऑन द राइजमधील उदयोन्‍मुख पदांचा शोध घ्‍या, ज्‍यामुळे प्रोफेशनल्सना नवीन पदे मिळण्‍यास मदत होईल.

Related posts

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची ५वी आवृत्ती सादर केली

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून दिल्‍लीमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍सच्या बुकिंगला सुरूवात

Shivani Shetty

Leave a Comment