मुंबई, १९ सप्टेंबर २०२४: मनोरंजनासोबत स्वादिष्ट स्नॅकचा आस्वाद घेण्याच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी उत्साहवर्धक नवीन सहयोग करत भारतातील प्रीमियर स्नॅकिंग ब्रँड ४७०० बीसी (4700BC) आणि जगातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा नेटफ्लिक्स कन्टेन्ट पाहण्याच्या अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एकत्र आले आहेत. या सहयोगात्मक मोहिमेमध्ये बॉलिवुडचे सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते करण जोहर आणि लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार करण वाही व करणवीर बोहरा आहेत. हा सहयोग दोन विशेष पॉपकॉर्न फ्लेवर्सना सादर करतो, स्वीट अँड सॉल्टी आणि चीज अँड कॅरमल, जे नेटफ्लिक्सच्या वैविध्यपूर्ण कन्टेन्ट लायब्ररीशी परिपूर्णपणे पूरक असण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
खास तयार करण्यात आलेले ४७००बीसी नेटफ्लिक्स पॉपकॉर्न फ्लेवर्स ग्राहक अभिप्रायामधून प्रेरित आहेत, जेथे व्यक्तींना सिनेमा पाहताना स्वादिष्ट फ्लेवर्सचा आस्वाद घ्यायला आवडते, पण आतापर्यंत घरामध्ये हा पर्याय उपलब्ध नव्हता. या सहयोगाच्या माध्यमातून ४७००बीसी आणि नेटफ्लिक्स हे त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये नाविन्यतेसाठी ओळखले जाणारे दोन ब्रँड्स संपूर्ण व्युइंग अनुभवाला उत्साहित करण्यास उत्सुक आहेत, जेथे ते ग्राहकांना प्रत्येक शैलीसाठी फ्लेवर आणि प्रत्येक फ्लेवरसाठी शैली देत आहेत.
स्वीट अँड सॉल्टी फ्लेवर जगभरातील आवडते केटल पॉपकॉर्न आहेत, जे गोडवा व काहीशा खारटपणासह संतुलित चवीचा आस्वाद देतात. चीज अँड कॅरमल फ्लेवरमध्ये ४७००बीसीचे सिग्नेचर चेडर चीज आणि हिमालयन सॉल्ट कॅरमलचे मिश्रण आहे, ज्यामधून अद्वितीय स्वादाचा आनंद मिळतो. ही उत्पादने सर्व प्रमुख रिटेलर्स, ई-कॉमर्स, क्यू-कॉमर्स आणि ४७००बीसी वेबसाइटवर उपलब्ध असतील.
४७००बीसी चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग गुप्ता या सहयोगाबाबत आनंद व्यक्त करत म्हणाले, “४७००बीसी मध्ये आम्हाला पॉपकॉर्न आणि मनोरंजनामधील प्रबळ संबंध माहित आहे. नेटफ्लिक्ससोबतचा आमचा सहयोग आम्हाला हे लोकप्रिय स्नॅक अधिकाधिक घरांमध्ये पोहोचवण्यास मदत करतो, जेथे कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेताना पॉपकॉर्नचा आस्वाद घेतला जातो. हा सहयोग स्वाभाविक आहे, कारण दोन्ही ब्रँड्स ग्राहकांसाठी मनोरंजन अनुभवाला अधिक उत्साहित करण्याप्रती कटिबद्ध आहेत.”
चित्रपटनिर्माते व कल्चरल आयकॉन करण जोहर म्हणाले, “मला उत्तम सिनेमा पाहताना स्वादिष्ट फूडचा आस्वाद घ्यायला आवडते. माझा विश्वास आहे की, ४७००बीसी आणि नेटफ्लिक्स यांच्यामधील सहयोग उत्तम ठरेल. यामधून खात्री मिळते की, प्रत्येकवेळी चित्रपट पाहताना उत्तम मनोरंजनासोबत प्रीमियम स्नॅक्सचा आस्वाद मिळेल. मला या उपक्रमाचा भाग होण्याचा आनंद होत आहे, जेथे प्रत्येक क्षण आणि प्रत्येक बाइट परिपूर्णपणे एकत्र करण्यात आले आहेत.”
नेटफ्लिक्स इंडियाच्या मार्केटिंग पार्टनरशिप्सच्या प्रमुख पूर्णिमा शर्मा म्हणाल्या, “मनोरंजनाचा आनंद घेताना स्नॅकिंग ही लोकप्रिय परंपरा आहे. ४७००बीसी चे हे स्पेशल-एडिशन पॉपकॉर्न नेटफ्लिक्सच्या ब्लॉकबस्टर मनोरंजनाशी पूरक आहेत, ज्यामुळे ग्राहकांना घरामध्ये स्नॅक्सचा आस्वाद घेत चित्रपट व सिरीज पाहण्याचा आनंद घेता येईल. उत्तम कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेण्यासोबत स्वादिष्ट स्नॅक्सचा आस्वाद घेतला जातो आणि हा सहयोग याच बाबीला प्राधान्य देतो.”