maharashtraprimenews
ठळक बातम्या
अंबरनाथआंतरराष्ट्रीयआरोग्य वार्ताउल्हासनगरकर्जतकलाकल्याणकोकणकोल्हापूरक्रीडागुजरातगुन्हेचित्रपटजळगावठळक बातम्याठाणेडोंबिवलीदिल्लीनवी दिल्लीनवी मुंबईनागपूरनाटकनांदेडनालासोपारानाशिकनेरळपंढरपूरपनवेलपालघरपिंपरी/चिंचवडपुणेबदलापूरबॉलीवूडबोरगांव/माणगांवमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईमुरुड/जंजिरारत्नागिरीरायगडराष्ट्रीयलेखवसईविदर्भविरारशहापूरसंपादकीयसांगलीसातारासाहित्यसोलापूरहॉलिवूड

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेली महत्त्वाची निवडणूक म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आपले उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या. पटेल यांच्या माघारीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अन्य काही उमेदवार रिंगणात असल्याने ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. अशातच आता एका अपक्ष उमेदवाराने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता, असा दावा अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर केला आहे. तसंच याबाबत मिलिंद कांबळे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून तक्रारही दाखल केली आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते, असा कांबळे यांचा दावा आहे.उद्धव यांना धक्का!, ठाण्यात ‘दिवाळी पहाट’ शिंदे यांच्या पक्षाची, युवासैनिकांची याचिका फेटाळली

या पोटनिवडणुकीतील मतदानाला काही दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवाराने ऋतुजा लटके यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत तक्रार केल्याने आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अंधेरी पूर्वच्या मतदानासाठी जय्यत तयारीअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी दिली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

आता मध्य प्रदेशचा महाराष्ट्रातील उद्योगांवर डोळा, मुख्यमंत्री चौहान लवाजम्यासह पुण्यात येणार

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही पोटनिवडणूक निष्पक्षपणे होण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या अंतर्गत जवळपास २ हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिस दल, राखीव पोलिस दल आणि अन्य सुरक्षा व्यवस्था देखील सुसज्ज व तैनात असणार आहे.

मतदान कार्ड नसेल तर काय कराल?सद्यस्थितीत बहुतांश मतदारांकडे ‘मतदार कार्ड’ आहे. तथापि, ज्या मतदारांकडे ‘मतदार कार्ड’ नसेल, त्यांनी ‘भारत निवडणूक आयोगा’ने निश्चित केलेल्या १२ प्रकारच्या ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र बाळगणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. या निवडणुकीत २ लाख ७१ हजार ५०२ मतदार असून एकूण २५६ मतदान केंद्रे आहेत.

Related posts

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

शाहरुख खानने पठाणसाठी आपल्या शरीरावर ब्रेकींग पॉइंटपर्यंत मेहनत घेतली आहे!’ : सिद्धार्थ आनंद

Shivani Shetty

सुप्रसिद्ध गायक अमेय डबली यांचे अनसन्ग हिरोजच्या कथांवर आधारित बॉलीवूड म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट “वर्दी के वीर”चे नेत्रदीपक सादरीकरण! प्रसिद्ध गायक शान, अमेय डबली आणि डान्स मेस्ट्रो आणि कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्या उत्कृष्ट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कामगिरीने मुंबई शहराला मंत्रमुग्ध केले.

Shivani Shetty

Leave a Comment