maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि टाटा मोटर्स यांनी १३१ मेगावॅट हायब्रिड प्रकल्पासाठी केली भागीदारी

राष्‍ट्रीय, एप्रिल २१, २०२५ – टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाइल उत्‍पादक आणि टाटा पॉवर रिन्‍यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) ही टाटा पॉवरची उपकंपनी व भारतातील शुद्ध ऊर्जा परिवर्तनामधील अग्रगण्‍य कंपनी यांनी सहयोगाने १३१ मेगावॅट विंड-सोलार हायब्रिड रिन्‍यूएबल एनर्जी प्रोजेक्‍ट विकसित करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण पॉवर परचेस अॅग्रीमेंट (पीपीए)वर स्‍वाक्षऱ्या केल्‍या आहेत.

वार्षिक जवळपास ३०० दशलक्ष युनिट्स शुद्ध वीजेची निर्मिती करण्‍यास सज्‍ज असलेला हा प्रकल्‍प दरवर्षाला २ लाख टनहून अधिक कार्बन डायऑक्‍साइडची भरपाई करण्‍याची अपेक्षा आहे. सह-गुंतवणूक आणि दीर्घकालीन पॉवर परचेस अॅग्रीमेंट (पीपीए)च्‍या माध्‍यमातून सक्षम हे एकीकृत विंड-सोलार हायब्रिड सोल्‍यूशन टाटा मोटर्सच्‍या महाराष्‍ट्र व गुजरातमधील सहा उत्‍पादन प्‍लांट्सना हरित, किफायतशीर ऊर्जा देईल, ज्‍यामुळे व्‍यावसायिक व प्रवासी वाहनांच्‍या उत्‍पादनाला पाठिंबा मिळेल.

हा उपक्रम टाटा मोटर्सच्‍या २०३० लक्ष्‍यापूर्वी आरई-१०० कटिबद्धता संपादित करण्‍यासाठी असलेल्‍या शुद्ध ऊर्जा परिवर्तनाला मोठ्या प्रमाणात प्रगत करतो आणि हवामान-स्थिर कार्यसंचालनांप्रती अर्थपूर्ण प्रगतीला गती देतो. तसेच हा उपक्रम टाटा मोटर्सच्‍या शाश्‍वतता रोडमॅपमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा देखील आहे, जो निव्‍वळ-शून्‍य उत्‍सर्जन संपादित करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या व्‍यापक महत्त्वाकांक्षेशी संलग्‍न आहे आणि पर्यावरणदृष्‍ट्या जबाबदार उत्‍पादनाप्रती परिवर्तनाचे नेतृत्‍व करतो.

पीपीएवर स्‍वाक्षरी करत टाटा मोटर्सच्‍या ऑपरेशन्‍स, कमर्शियल वेईकल्‍सचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. विशाल बादशाह म्‍हणाले, ”भारतातील गतीशीलता व लॉजिस्टिक्‍स इकोसिस्‍टमची प्रमुख स्रोत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सला शाश्‍वत उत्‍पादनामध्‍ये आदर्श राखत नेतृत्‍व करण्‍याचा अभिमान वाटतो. हा प्रकल्‍प आमच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये नवीकरणीय ऊर्जेचा समावेश करण्‍याप्रती, तसेच आमचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्‍यासह आमच्‍या आरई-१०० ध्‍येयांची पूर्तता करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. या प्रकल्‍पामधून गतीशीलता सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याचा आमचा व्‍यापक उद्देश देखील दिसून येतो, जे उत्‍पादनापासून कामगिरीपर्यत प्रत्‍येक टप्‍प्‍यावर शाश्‍वत आहेत.”

टाटा मोटर्स पॅसेंजर वैईकल्‍सच्‍या ऑपरेशन्‍सचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. प्रमोद चौधरी म्‍हणाले, ”आम्‍ही भविष्‍यासाठी सुसज्‍ज ऑटोमोटिव्‍ह व्‍यवसाय घडवण्‍यासाठी शुद्ध ऊर्जेमध्‍ये परिवर्तनाप्रती कटिबद्ध आहोत. या पीपीएसह महाराष्‍ट्र व गुजरातमधील आमचे प्‍लांट्स भारतातील हरित परिवर्तनाशी पूरक राहत ग्रीन मॅन्‍युफॅक्‍चुरिंगप्रती आमच्‍या प्रवासामध्‍ये मोठी झेप घेतील. हे आमच्‍या पॅसेंजर वेईकल ऑपरेशन्‍सना हरित, स्‍मार्टर आणि शाश्‍वत आधारावर अधिक स्थिर करण्‍याच्‍या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे.”

Related posts

कापडिया हॉस्पिटल’ची ‘मिस्सो’ प्रणालीसह अस्थिरोग शस्त्रक्रियेत क्रांती

Shivani Shetty

इन्श्युरन्सदेखोद्वारे विमा एजन्ट्सचे सक्षमीकरण

Shivani Shetty

किया इंडियाने बहुप्रतिक्षित ‘किया सिरॉस’ लाँच केली*

Shivani Shetty

Leave a Comment