maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कायनेटिक ग्रीनने ई-लुनावर इंडस्‍ट्री-फर्स्‍ट अनलिमिटेड किलोमीटर ‘अशुअर्ड बायबॅक ऑफर’सह नवीन मापदंड स्‍थापित केले; ग्राहक आश्‍वासनामध्‍ये वाढ

२६ मार्च २०२५: कायनेटिक ग्रीन या भारतातील इलेक्ट्रिक वेईकल्‍समधील अग्रणी कंपनीने ई-लुनासाठी विशेष ‘अशुअर्ड बाय बॅक ऑफर’ची घोषणा केली आहे. ही लिमिटेड-पीरियड ऑफर ग्राहक समाधान आणि मन:शांतीप्रती कायनेटिक ग्रीनच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.

या अद्वितीय उपक्रमाचा भाग म्‍हणून कायनेटिक ग्रीन या ऑफर कालावधीदरम्‍यान खरेदी केलेल्‍या सर्व ई-लुना वेईकल्‍ससाठी ३६,००० रूपयांच्‍या बायबॅक मूल्‍याची खात्री देते. ३ वर्षांसाठी वेईकल मालकीहक्‍क पूर्ण केल्‍यानंतर बायबॅकचा लाभ घेता येऊ शकतो, ज्‍यामध्‍ये या योजनेअंतर्गत अनपेक्षित इंडस्‍ट्री-फर्स्‍ट अनलिमिटेड किलोमीटर कव्‍हरेजचा समावेश आहे. या उपक्रमामधून कायनेटिक ग्रीनचा त्‍यांच्‍या इलेक्ट्रिक दुचाकींचा दर्जा सुधारण्‍याचा आत्‍मविश्‍वास दिसून येतो. तसेच या उपक्रमाचा ग्राहकांसाठी शाश्‍वत गतीशीलता अधिक सहजसाध्‍य व लाभदायी करण्‍यासोबत इलेक्ट्रिक दुचाकीच्‍या (e2W) रिसेल मूल्‍याबाबत प्रमुख समस्‍येचे निराकरण करण्‍याचा देखील मनसुबा आहे.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, ”कायनेटिक ग्रीनमध्‍ये आम्‍ही शाश्‍वत व किफायतशीर सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून शहरी गतीशीलतेला नव्‍या उंचीवर नेण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. ई-लुना गेम-चेंजर राहिली आहे आणि अशुअर्ड प्रॉडक्‍ट बाय बॅक ऑफरसह आम्‍ही या वेईकलला ग्राहकांसाठी अधिक लक्षवेधक निवड बनवत आहोत. हा उपक्रम मूल्‍याची खात्री देण्‍यासोबत वाढत्‍या इलेक्ट्रिक वेईकल इकोसिस्‍टममधील विश्‍वास अधिक दृढ देखील करतो. आम्‍ही ग्राहकांना या स्‍पेशल ऑफरचा फायदा घेण्‍याचे आणि हरित क्रांतीचा भाग बनण्‍याचे आवाहन करतो.”

अशुअर्ड प्रॉडक्‍ट बाय बॅक ऑफर भारतभरातील सर्व कायनेटिक ग्रीन अधिकृत डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे, जी ग्राहकांना विनासायास व सोईस्‍कर खरेदी अनुभव देते. या उपक्रमासह कायनेटिक ग्रीन पर्यावरणपूरक व किफायतशीर गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याचा आपला दृष्टिकोन पुढे घेऊन जात आहे.

Related posts

फेडएक्सचा मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसह सहयोग

Shivani Shetty

नवीन वर्ष, आरोग्‍यदायी वर्ष: २०२४ मध्‍ये मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी ५ संकल्‍प

Shivani Shetty

ओकले मेटा एचएसटीएन भारतात १ डिसेंबरला लाँच होणार, ज्‍यामध्‍ये आहेत कार्यक्षमता-केंद्रित एआय वैशिष्‍ट्ये

Shivani Shetty

Leave a Comment