maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे आपल्‍या अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे अनावरण

नवी दिल्‍ली, ११ डिसेंबर २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक आणि गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे प्रगत अॅग्रीगेट्सची सर्वसमावेशक श्रेणी दाखवली. यामध्‍ये २५ केव्‍हीए ते १२५ केव्‍हीए पॉवर रेंजमध्‍ये उपलब्‍ध असलेले सीपीसीबी IV+ प्रमाणित टाटा मोटर्स जेनसेट्स, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्सपर्यंतचे सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणणित इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स, लाइव्‍ह अॅक्‍सल्‍स व ट्रेलर अॅक्‍सल्‍स आणि कम्‍पोनण्‍ट्सचा समावेश होता. मटेरिअल हाताळणी, बांधकाम उपकरण, औद्योगिक उपयोजन व लॉजिस्टिक्‍स विभागांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍यात आले आहेत, तसेच उच्‍च कार्यक्षमता व टिकाऊपणासाठी निर्माण करण्‍यात आले आहेत.

बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २.०४ येथे टाटा मोटर्स पॅव्हिलियनचे उद्धाटन करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या स्‍पेअर्स अँड नॉन-वेईकुलर बिझनेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्‍हणाले, “बाऊमा कॉनएक्‍स्‍पो शक्तिशाली व विश्‍वसनीय तंत्रज्ञानांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स सादर करण्‍याकरिता परिपूर्ण प्‍लॅटफॉर्म आहे. हे नवीन अॅग्रीगेट्स ग्राहकांचा प्रत्‍यक्ष आवाज आहेत, जे व्‍यापक ग्राहक अभिप्रायांनंतर विकसित करण्‍यात आले आहेत. आम्‍ही भारतातील सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत, जेनसेट्ससह पॉवर सोल्‍यूशन्‍स वितरित करत आहोत, ज्‍यामुळे पाायाभूत सुविधा सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणित इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स व लाइव्‍ह अॅक्‍सल्‍ससह सक्षम होतील आणि लॉजिस्टिक्‍स ट्रेलर अॅक्‍सल्‍स व कम्‍पोनण्‍ट्ससह प्रबळ होईल.”

टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स त्‍यांचा उच्‍च टिकाऊपणा, कार्यक्षमता व परफॉर्मन्‍ससाठी ओळखले जातात. व्‍यापक संशोधनाच्‍या माध्‍यमातून विकसित आणि अत्‍याधुनिक केंद्रांमध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या या सोल्‍यूशन्‍सना देशभरातील २५००० हून अधिक अधिकृत सर्विस आऊटलेट्सचे पाठबळ आहे. कंपनी प्रखर औद्योगिक वैशिष्‍ट्यांची पूर्तता करणारे नाविन्‍यपूर्ण, उच्‍च-कार्यक्षम अॅग्रीगेट्स देत भारतातील पायाभूत सुविधा विकासाला पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

*बाऊमा कॉनएक्‍स्‍पो २०२४ येथे टाटा मोटर्स अॅग्रीगेट्स*

 टाटा मोटर्स जेनसेट्स: सीपीसीबी IV+ प्रमाणितसह रिमोट मॉनिटरिंग सिस्‍टम; २५ केव्‍हीए ते १२५ केव्‍हीए पॉवर रेंज.

 इंडस्‍ट्रीयल इंजिन्‍स: सीईव्‍ही बीएस-५ उत्‍सर्जन-प्रमाणित, ५५-१३८ एचपी पॉवर नोड्समध्‍ये उपलब्‍ध.

 लाइव्‍ह अॅक्‍सल्‍स: उच्‍च-टन क्षमतेच्‍या बांधकाम उपकरणासाठी प्रबळपणे डिझाइन करण्‍यात आले आहेत.

 ट्रेलर अॅक्‍सल्‍स आणि कम्‍पोनण्‍ट्स: हेवी-ड्युटी व्‍यावसायिक वाहनांसाठी नवीन १६ मिमी जाड ट्रेलर अॅक्‍सल बीम.

Related posts

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

स्विस ब्‍युटीकडून द लिपस्टिक ऑफ इंडिया लाँच

Shivani Shetty

कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफरिंग गुरुवार, 19 डिसेंबर 2024 पासून सुरू

Shivani Shetty

Leave a Comment