maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून पहिले प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर – ‘acti.ev’ लाँच

मुंबई, ५ जानेवारी २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) या भारतातील ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज त्‍यांचे पहिले प्रगत प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍र – acti.ev (अॅक्टिव्‍ह असा उच्‍चार) लाँच केले. acti.ev म्‍हणजे (अॅडवान्‍स कनेक्‍टेड टेक-इंटेलिजण्‍ट इलेक्ट्रिक वेईकल) (Advanced Connected Tech-Intelligent Electric Vehicle) आणि टीपीईएम पोर्टफोलिओमधील भावी उत्‍पादनांना प्रकाशझोतात आणेल. या प्‍युअर इलेक्ट्रिक आर्किटेक्‍चरवर आधारित पहिले उत्‍पादन असणार आहे Punch.ev, ज्‍यानंतर विविध बॉडी स्‍टाइल्‍स व आकारांमध्‍ये विभिन्‍न उत्‍पादने तयार केली जातील. आजपासून, ग्राहक ईव्‍हीच्‍या विक्रीसाठी अधिकृत जवळच्‍या टाटा मोटर्स शोरूम्‍सला भेट देत किंवा फक्‍त २१,००० रूपये पेमेंट करत Tata.ev स्‍टोअर्सच्‍या माध्‍यमातून Punch.ev बुक करू शकतात. बुकिंग्‍ज ऑनलाइनhttps://bit.ly/punchev-bookingsopen येथे देखील करता येऊ शकतात.

या महत्त्वाकांक्षी सादरीकरणाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे प्रमुख उत्‍पादन अधिकारी आणि एचव्‍ही प्रोग्राम्‍स व कस्‍टमर सर्विसचे प्रमुख श्री. आनंद कुलकर्णी म्‍हणाले, ”भारतातील ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी म्‍हणून आम्‍हाला नवीन वर्ष २०२४ मध्‍ये मेड-इन-इंडिया प्रगत प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर acti.ev च्‍या स्‍वरूपात उल्‍लेखनीय विकासासह प्रवेश करण्‍याचा अभिमान वाटतो. हे आर्किटेक्‍चर देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ईव्‍ही बाजारपेठेत ट्रेण्‍डसेटर असण्‍याची खात्री देते. हे आर्किटेक्‍चर जागतिक दर्जाची कार्यक्षमता, एैसपैस जागा, बॅटरी क्षमता देण्‍यासह ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. acti.ev जगासाठी सुसज्‍ज, भावी प्‍युअर इलेक्ट्रिक आर्किटेक्‍चर आहे, जे सॉफ्टवेअर केंद्रित वैशिष्‍ट्यांची अंमलबजावणी सक्षम करते, ज्‍यामधून आपली वाहने तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत असण्‍यासोबत भविष्‍यासाठी सुसज्‍ज असण्‍याची देखील खात्री मिळते.

यासह, आम्‍हाला या प्रगत, बहुस्‍तरीय आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेले पहिले उत्‍पादन Punch.ev च्‍या अनावरणाची घोषणा करताना दुप्‍पट आनंद होत आहे. Punch.ev हे टीपीईएममधील ईव्‍हींच्‍या नेक्‍स्‍ट जनरेशनचे सादरीकरण आहे. आमच्‍या ईव्‍ही उत्‍पादनांचा विद्यमान पोर्टफोलिओ पाहता आम्‍हाला विश्‍वास आहे की, acti.ev आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात येणारी भावी उत्‍पादने आमच्‍या वाढत्‍या समुदायाला अधिक उत्‍साहित करत राहतील.

acti.ev आर्किटेक्‍चर परफॉर्मन्‍स, टेक्‍नॉलॉजी, मॉड्युलेरिटी व स्‍पेस एफिशिएन्‍सी या प्रमुख आधारस्‍तंभांवर आधारित आहे आणि त्‍यामध्‍ये चार लेयर्सचा समावेश आहे:

लेयर १ – पॉवरट्रेन

acti.ev मध्‍ये सानुकूल बॅटरी पॅक डिझाइनसह प्रगत जागतिक मानकांनुसार चाचणी करण्यात आलेल्‍या सेल्‍स बॅट-या आहेत, ज्‍यामुळे ऊर्जा घनतेमध्‍ये १० टक्‍क्‍यांची सुधारणा करण्‍यात आली आहे. ही बॅटरी पॅक डिझाइन ३०० किमी ते ६०० किमीपर्यंतची रेंज देते. आर्किटेक्‍चर मॉड्युलेरिटीला योग्‍य उत्‍पादनासाठी एडब्‍ल्‍यूडी, आरडब्‍ल्‍यूडी आणि एफडब्‍ल्‍यूडीमधून योग्‍य ड्राइव्‍हट्रेन पर्याय निवडण्‍यास देखील मदत करते. एसी फास्‍ट चार्जिंगसाठी ७.२ केडब्‍ल्‍यू ते ११ केडब्‍ल्‍यू ऑन बोर्ड चार्जर आणि जवळपास १५० केडब्‍ल्‍यू डीसी फास्‍ट चार्जिंगसह फक्‍त १० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये जवळपास १०० किमीपर्यंतची रेंज मिळते.

लेयर २ – चेसिस

या आर्किटेक्‍चरच्‍या दुस-या लेयरमध्‍ये विविध बॉडी स्‍टाइल्‍ससह भावी जीएनसीएपी / बीएनसीएपी सुरक्षितता प्रोटोकॉल्‍सची पूर्तता करण्‍याची क्षमता असलेली सुधारित बॉडी रचना सामावू शकते. acti.ev मध्‍ये एैसपेस जागा व स्‍टोरेजसह ट्रान्‍समिशन टनेलशिवाय फ्लॅट फ्लोअर आणि अतिरिक्‍त फ्रंक आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना केबिनमध्‍ये अधिक एैसपैस जागा मिळते. यामधील कमी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ड्रायव्हिंग गतीशीलता व हाताळणी सुधारण्‍यामध्‍ये मदत करते. 

लेयर ३ – इलेक्ट्रिकल आर्किटेक्‍चर

acti.ev उच्‍च कम्‍प्‍युटिंग क्षमता आणि एडीएएस लेव्‍हल २ क्षमता असलेली भविष्‍यासाठी सुसज्‍ज स्‍केलेबल आर्किटेक्‍चर आहे. हे आर्किटेक्‍चर एडीएएस एल२+ क्षमतांसह सुसज्‍ज आहे, ज्‍यामधून सुरक्षितता व नेव्हिगेशन क्षमतांच्‍या उच्‍च मानकांची खात्री मिळते. यामधील ५जी सुसज्‍जता एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटीसह प्रगत नेटवर्क देते. हे आर्किटेक्‍चर वेईकल टू लोड (व्‍ही२एल) आणि वेईकल टू वेईकल चार्जिंग (व्‍ही२व्‍ही) तंत्रज्ञानाला देखील साह्य करेल.  

लेयर ४ – क्‍लाऊड आर्किटेक्‍चर

हे आर्किटेक्‍चर भविष्‍यासाठी सुसज्‍ज स्‍केलेबल क्‍लाऊड आर्किटेक्‍चरवर आधारित आहे, जे इन-कार अॅप सूट Arcade.ev सह सुधारित युजर अनुभवाची खात्री देते. तसेच acti.ev मध्‍ये अत्‍याधुनिक सोल्‍यूशन्‍स आहेत, जी उच्‍च दर्जाच्‍या कनेक्‍टीव्‍हीसह सॉफ्टवेअर व इतर वैशिष्‍ट्यांसाठी प्रगत ओव्‍हर-द-एअर अपडेट्सची देखील खात्री देतात. 

Related posts

फिजिक्‍सवालाने युजीसी नेट २०२४ साठी ‘मिशन जेआरएफ’ सिरीज लाँच केली

Shivani Shetty

फिजिक्‍सवालाने ठाण्यात ऑफलाइन विद्यापीठ सेंटर सुरु केले

Shivani Shetty

ईवायव्हीएने १ दशलक्ष स्‍कॅन्‍सचा टप्पा गाठला

Shivani Shetty

Leave a Comment