मुंबई, ३१ मे २०२४: झेलियो ईबाईक्स (Zelio), एक अग्रगण्य इव्हीटू–व्हीलर स्टार्टअप, त्यांनी कमी–स्पीड इव्ही दुचाकींची श्रेणी– ग्रेसी मालिकेचेअनावरण केले आहे. रु. ५९,२७३ ते रु. ८३,०७३ एक्स–शोरूमच्याकिंमतींसह, ग्रेसी मालिकेत ग्रेसी आय, ग्रेसी प्रो आणि ग्रेसी प्लस मॉडेल्सचासमावेश आहे. ही घोषणा नूकत्याच लाडवा, हिसार, हरियाणा येथे झेलियोच्या सुरु झालेल्या नवीन उत्पादन युनिटच्या उद्घाटनानंतर करण्यात आलीआहे, ज्याची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० वाहने इतकी आहे.
स्त्रिया असो वा पुरूष सर्व शहरी रायडर्ससह, नवशिक्यापासून अनुभवीवाहनचालकांपर्यंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक आणिनोकरदारांसाठी तयार केलेल्या, झेलियो ईबाईक्सच्या नवीनतम बाईक्समध्येअत्युकृष्ट कामगिरी, शैली, टिकाऊपणा आणि शाश्वतता यांचा समावेशकरण्यात आला आहे.
झेलियो ईबाईक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री कुणालआर्य म्हणाले, “आम्ही इव्ही मार्केटमध्ये आमची नवीनतम इ–बाईक सादरकरताना अत्यंत आनंदी आहोत, या मार्केटमध्ये व्यावहारिकता, परवडणारीकिंमत आणि पर्यावरणीय फायदे यांसह कमी–स्पीडच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सवर्चस्व गाजवतात. शहरी प्रवासी अधिकाधिक किफायतशीर आणि शाश्वतवाहतूक पर्याय शोधत आहेत आणि कमी–स्पीड इव्ही सहज चालना, कमीदेखभाल खर्च आणि शून्य उत्सर्जनासह एक आदर्श पर्याय प्रदान करतात.”
“आमची ग्रेसी मालिका प्रचंड संशोधन आणि विकासाची पराकाष्ठा आहे, शहरी रायडर्सच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक तयारकेलेली आहे. आम्ही कार्यप्रदर्शन, सुरक्षितता, शाश्वतता आणि शैलीयासारखे विविध घटक विचारात घेतले आहेत. आमच्या स्कूटरचे प्रत्येकघटक, डायनॅमिक बीएलडीसी मोटारपासून ते प्रगत ब्रेकिंग सिस्टमपर्यंत, सर्वोच्च गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वकनिवडले आहेत आणि चाचणी केली गेली. आम्हाला विश्वास आहे की आमचेग्राहक आमच्या नवीन स्कूटर्सच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि विचारपूर्वकडिझाइनची प्रशंसा करतील.” ते पुढे म्हणाले.
ग्रेसी आय मध्ये ६०/ ७२व्ही मध्ये डायनॅमिक बीएलडीसी मोटार आहे, ज्यामुळे सुरळीत आणि कार्यक्षम राइड सुनिश्चित होते. ६० किलोग्रॅम वजनआणि १५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, बाईकला रस्त्यावर स्थिरता आणिचपळता मिळते. सुधारित सुरक्षिततेसाठी स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणिरेयर ड्रम ब्रेक आहेत. या बाईक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
ग्रेसी प्रो मध्ये ६०/ ७२व्ही ची मजबूत बीएलडीसी मोटार आहे, जी अत्युकृष्टकामगिरी आणि विश्वासार्हता प्रदान करते. एकूण वजन ७० किलोग्रॅम आणि१५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, ही शहरी प्रवाशांसाठी स्थिर आणिआरामदायी राइड प्रदान करते. फ्रंट डिस्क ब्रेक आणि रेयर ड्रम ब्रेकसहसुसज्ज, प्रत्येक प्रवासात सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. या बाईक चारप्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
ग्रेसी प्लस ६०/ ७२व्ही च्या शक्तिशाली बीएलडीसी मोटारसह येते, जीरस्त्यावर उत्कृष्ट प्रवेग आणि कार्यप्रदर्शन देते. ६० किलोग्रॅम वजन आणि१५० किलोग्रॅम लोडिंग क्षमतेसह, ही शहरी प्रवासासाठी अष्टपैलुत्व आणिचपळता प्रदान करते. फ्रंट डिस्क ब्रेक्स आणि रेयर ड्रम ब्रेक्ससह, सुरक्षिततानेहमीच सुनिश्चित केली जाते. या बाईक पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.