maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

यामाहा ने राष्ट्रीय स्तरावरील शोडाउन 3 एस ग्रँड प्रिक्स २०२४-२५ चे आयोजन केले

 

सुरजपूर, ग्रेटर नोएडा, २५ जून २०२५: इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेड (IYM) ने आज ‘Yamaha National 3S Grand Prix 2024–25’ चे आयोजन केले. ही एक कौशल्याधिष्ठित स्पर्धा असून, यामध्ये डीलरशिपमधील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना गौरवण्यात आले. हे कर्मचारी विक्री (Sales), सेवा (Service) आणि सुटे भाग (Spares) यांसारख्या यामाहाच्या प्रीमियम 3S अनुभवाचा भाग ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण देशभरातील यामाहा डीलरशिपमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देणे तसेच कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांचे कौशल्य अधिक विकसित करणे आहे. ही स्पर्धा यामाहाच्या आफ्टरसेल्स सेवा अधिक दर्जेदार आणि वेगळी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

 


या वर्षीच्या स्पर्धेत एकूण पाच श्रेणी होत्या – टेक्निशियन, सर्व्हिस सल्लागार (Service Advisor), टेली- कॉलर (नवीन श्रेणी), पार्ट्स मॅनेजर आणि सेल्स कन्सल्टंट. ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडली. पहिला टप्पा म्हणजे रीजनल राउंड, जो १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान झाला. यामध्ये विक्रमी ७,५६७ सहभागी होते. प्रत्येक श्रेणी आणि झोनमधून ऑनलाईन परीक्षेच्या आधारे टॉप ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या निवड झालेल्या स्पर्धकांनी १७ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ दरम्यान यामाहा मोटर अकॅडमी किंवा संबंधित डीलरशिपवर झोनल राउंडमध्ये भाग घेतला.

राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा 24 और 25 जून 2025 रोजी यामाहाच्या सुरजपूर (ग्रेटर नोएडा) सुविधेमध्ये आयोजित करण्यात आली होती. एकूण ४० फायनलिस्ट्सनी या स्पर्धेत भाग घेतला आणि प्रत्येक श्रेणीत शीर्ष ३ स्पर्धकांना यामाहा व्यवस्थापनाद्वारे सन्मानित करण्यात आले. टेक्निशियन श्रेणीत प्रथम क्रमांक मिळवणारा सहभागी आता नोव्हेंबर २०२५ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या World Technician Grand Prix 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

स्पर्धेचे मूल्यांकन करताना टेक्निशियनच्या ट्रबलशूटिंग, डायग्नोसिस आणि मेंटेनन्स कौशल्यांचा विचार करण्यात आला. सर्व्हिस सल्लागारांचे मूल्यांकन ग्राहक संवाद, तक्रार निवारण आणि वेळेत वाहन डिलिव्हरी सुनिश्चित करण्याच्या क्षमतेवर आधारित होते. टेली-कॉलर्सच्या संवाद कौशल्यावर आणि ग्राहक व्यवस्थापन क्षमतेवर लक्ष दिले गेले, तर सेल्स कन्सल्टंटच्या ग्राहक सेवा आणि प्रीमियम अनुभव देण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन झाले. सुटे भाग श्रेणीत पार्ट्स मॅनेजर्सच्या स्टॉक व्यवस्थापन कौशल्यावर आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या उपक्रमावर भाष्य करताना यामाहा मोटर इंडिया सेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीनियर वाईस प्रेसिडेंट श्री. रविंदर सिंग म्हणाले, “Yamaha National 3S Grand Prix हे आमच्या फ्रंटलाइन टीमच्या कौशल्याला धार देण्यासाठी आणि ग्राहकांना अपवादात्मक अनुभव देण्यामध्ये त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचे प्रतीक आहे. हे व्यासपीठ केवळ डीलरशिप कर्मचाऱ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरित करत नाही, तर आमच्या ब्रँडच्या गुणवत्तेचा, विश्वासार्हतेचा आणि उत्तम सेवांचा शब्दही अधिक मजबूत करतो. आम्ही सर्व फायनलिस्ट्सचे अभिनंदन करतो आणि जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय विजेत्यांना शुभेच्छा देतो.”

 

Related posts

हार्ले-डेव्हिडसन X440ची डिलिव्हरी १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार बुकिंग विंडो १६ ऑक्टोबर, २०२३ पासून पुन्हा खुली होणार

Shivani Shetty

कर्करोगाचे रुग्ण यांच्याबाबत सामाजिक पूर्वग्रह हाताळ्यासाठी मोहीम

Shivani Shetty

भारतातील द्राक्ष व अन्य फळांच्या निर्यात वाढीसाठी ‘देहात’चा पुढाकार

Shivani Shetty

Leave a Comment