टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आपली सर्विस इकोसिस्टम प्रबळ करत आणि आजच्या खडतर मालवाहतूक वितरण टाइमलाइनमधील महत्त्वपूर्ण घटक वाहनांच्या उच्च अपटाइमची खात्री घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत भारतातील ट्रकिंग उद्योगामध्ये मोठी प्रगती केली आहे. प्रबळ सेवा नेटवर्क, मूल्यवर्धित सेवा, जेन्यूएन स्पेअर पार्ट्सची सुलभ उपलब्धता यांसह ड्रायव्हरच्या आरोग्याला प्राधान्य देत कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम मालकीहक्क अनुभवाची खात्री देते.
किमान डाऊनटाइमसह वेईकल सुलभपणे कार्यरत राहणे ग्राहकांच्या व्यवसायांच्या यशासाठी महत्त्वाचे आहे. ही बाब लवकर ओळखत टाटा मोटर्सने महाराष्ट्रामध्ये व्यापक सर्विस नेटवर्क स्थापित केले आहे, जेथे राज्यभरात २५१ धोरणात्मकरित्या स्थित सर्विस टचपॉइण्ट्स आहेत. तसेच, उत्तमरित्या सुसज्ज डिलरशिप्सच्या माध्यमातून जेन्यूएन स्पेअर पार्ट्स सहजपणे उपलब्ध होण्याची खात्री मिळते. टाटा मोटर्सच्या सर्विस सर्वोत्तमतेमधील खासियत म्हणजे उच्च कुशल टेक्निशियन्स, ज्यां ना कंपनीकडून सतत प्रशिक्षण दिले जाते.
मालकीहक्क अनुभवाला अधिक उत्साहित करण्यासाठी टाटा मोटर्स मूल्यवर्धित सेवांची श्रेणी देते, ज्यामध्ये अपटाइम गॅरण्टीज, ऑन-साइट सर्विस, वार्षिक देखभाल करार आणि ताफा व्यवस्थापन सोल्यूशन्स यांचा समावेश आहे. टाटा अलर्ट आणि टाटा कवच यांसारखे उपक्रम अपघातग्रस्त वाहनांना रोडसाइड असिस्टण्स व दुरुस्ती सेवा देतात, तसेच टाटा झिप्पी अशुअरन्स वेळेवर सर्विस पूर्ण होण्याची खात्री देते. एकत्रित, या सेवा डाऊनटाइम कमी करतात आणि वेईकल विश्वसनीयता वाढवतात, ज्यामुळे व्यवसाय कार्यक्षमतेला गती मिळते.
भारतातील लॉजिस्टिक्स उद्योगाचे आधारस्तंभ असलेल्या ड्रायव्हर्सची सुरक्षितता व आरामदायीपणाला प्राधान्य देणारी जबाबदार कॉर्पोरेट कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने सतत ड्रायव्हर कल्याणाप्रती काम केले आहे. सर्वसमावेशक ड्रायव्हर प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून टाटा मोटर्स ड्रायव्हर्स वेईकल्सचे सुरक्षितपणे व कार्यक्षमपणे ऑपरेट करण्यासाठी नवीन कौशल्ये आणि माहितीसह सुसज्ज असण्याची खात्री घेते. कंपनीचे ड्रायव्हर वेल्फेअर प्रयत्न प्रशिक्षणाव्यतिरिक्त देखील सुरू आहेत. ‘टाटा समर्थ’सारखे उपक्रम सादर करत कंपनी ड्रायव्हर्सचे आरोग्य, सुरक्षितता आणि स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी जीवनाचा दर्जा सुधारतो.
ग्राहकांशी संलग्न राहत आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य देत टाटा मोटर्स खात्री घेते की, प्रत्येक टाटा मालक अभिमानी मालक असेल. विक्रीपश्चात्त सेवेप्रती या अविरत कटिबद्धतेने ग्राहक निष्ठा प्रबळ केली आहे, तसेच त्यामधून कंपनीची महाराष्ट्रातील दीर्घकालीन वाढ देखील दिसून येते.