maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सने ट्रक श्रेणीमध्‍ये वातानुकूलित केबिन व काऊल लाँच केली

मुंबई, जून २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आपल्‍या संपूर्ण ट्रक श्रेणीमध्‍ये फॅक्‍टरी-फिटेड वातानुकूलित सिस्‍टम्‍सच्‍या लाँचची घोषणा केली आहे. एसएफसी, एलपीटी, अल्‍ट्रा, सिग्‍ना आणि प्राइमा केबिन्‍समध्‍ये हे मोठ्या प्रमाणाात अपग्रेड करण्‍यात आले आहे, तसेच पहिल्‍यांदाच काऊल मॉडेल्‍समध्‍ये देखील अपग्रेड करण्‍यात आले आहे. टाटा मोटर्सने पॉवर आऊटपुट सुधारणांसह मूल्‍यवर्धित सुधारणांची सिरीज देखील सादर केली आहे, ज्‍यासह कार्यक्षमता व ड्रायव्हिंग क्षमतेमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
याप्रसंगी मत व्‍यकत करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍सच्‍या ट्रक्‍स विभागाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्‍हणाले, ”वातानुकूलित केबिन्‍स व काऊल्‍सचे लाँच ड्रायव्‍हर्ससाठी आरामदायी कामकाज वातावरण निर्माण करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे, ज्‍यामधून उच्‍च उत्‍पादकतेची खात्री मिळेल. नियामक आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यासह आम्‍ही अनेक सुधारणांसह दीर्घकालीन मूल्‍य वितरित करण्‍यासाठी या संधीचा फायदा घेतला आहे. व्‍यापक ग्राहक अभिप्रायासह आकार देण्‍यात आलेले आणि स्‍मार्ट इंजीनिअरिंगचे पाठबळ असलेले हे अपग्रेड्स एकूण मालकीहक्‍क खर्चावरील परिणाम कमी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, जे ताफा मालकांना उच्‍च नफ्याची खात्री देतात.”
नवीन वातानुकूलित सिस्‍टम इको आणि हेवी अशा ड्युअल-मोडमध्‍ये काम करते, तसेच सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेसह सानुकूल कूलिंग देते. टाटा मोटर्सची हेवी ट्रक्‍स, ट्रिपर्स व प्राइम मूव्‍हर्सची श्रेणी आता जवळपास ३२० एचपीपर्यंत उच्‍च पॉवर आऊटपुट देते. इंधन कार्यक्षमता वाढवणारे इंटेलिजण्‍ट तंत्रज्ञान असलेले हे अपग्रेड ट्रक्‍सला विविध उपयोजनांसाठी सुसज्‍ज करते. तसेच, इतर सुधारणा आहेत ड्युटी-सायकल-आधारित इंधन कार्यक्षमता वैशिष्‍ट्ये, जसे इंजिन इडल ऑटो-शट, रिअल-टाइम अलर्टससाठी वॉइस मेसेजिंग सिस्‍टम आणि इतर अनेक.
टाटा मोटर्सच्‍या व्‍यापक व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओला पूरक ३००० हून अधिक टचपॉइण्‍ट्सचे प्रबळ सर्विस नेटवर्क आहे, तसेच त्‍यांच्‍या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सर्वसमावेशक वेईकल जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या अनेक मूल्‍यवर्धित सेवा आहेत. हे सर्वसमावेशक सोल्‍यूशन रोड-साइड असिस्‍टण्‍स, खात्रीदायी सर्विस टनआराऊंड टाइम्‍स, वार्षिक देखभाल करार अशा प्रत्‍येक टप्‍प्‍यावर सपोर्टची आणि अस्‍सल स्‍पेअर स्‍पार्टस् सहजपणे उपलब्‍ध होण्‍याची खात्री देते. तसेच, टाटा मोटर्स सानुकूल ताफा व्‍यवस्‍थापनासाठी आपला कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजचा फायदा घेते, ज्‍यामुळे ऑपरेटर्स वेईकल अपटाइम वाढवण्‍यास आणि मालकीहक्‍काचा एकूण खर्च कमी करण्‍यास सक्षम होतात.

Related posts

अभिबसद्वारे केवळ १ रुपयामध्ये प्रवासाची सुविधा

Shivani Shetty

आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार 18 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू

Shivani Shetty

निवासी मालमत्ता विक्री मूल्य १.११ लक्ष कोटींवर पोहोचले: प्रोपटायगर डॉटकॉम

Shivani Shetty

Leave a Comment