maharashtraprimenews
ठळक बातम्या
Pro kabaddi league updateक्रीडाठळक बातम्यामुंबई

पीकेएल सीझन १२: प्रत्येक सामन्यात थरार, स्पर्धा आणि कबड्डीचा रोमांच दुप्पट होणार

साखळी फेरीत खेळवले जाणार १०८ सामने – सर्व संघांना स्पर्धात्मक संधी आणि प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रोमांचक कबड्डी सामन्यांचा थरार

टाय ब्रेकर आणि गोल्डन रेड फॉरमॅट आता साखळी फेरीतील सामन्यांमध्येही लागू

संपूर्ण गुणपद्धती प्रणाली – संपूर्ण हंगामभर अधिक स्पष्टता

नव्या स्वरूपातील प्ले-ऑफ्स – ८ संघांना पात्रतेची संधी

मुंबई, २२ ऑगस्ट २०२५: आगामी प्रो कबड्डी लीग (पीकेएल) स्पर्धेला येत्या २९ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी शुक्रवारी (२२ ऑगस्ट) स्पर्धेतील १२ व्या हंगामासाठी काही मोठे बदल जाहीर केले. नव्या स्वरूपातील साखळी फेरीतील सामना आणि सुधारित प्ले- ऑफ्स रचना यामुळे स्पर्धा आणखी चुरशीची होणार असून प्रेक्षकांना आणखी रोमांचक सामन्यांचा अनुभव मिळेल. या  हंगामातील सामने विशाखापट्टणम, जयपूर, चेन्नई आणि दिल्ली येथे खेळले जातील. यामुळे प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा  रोमांच भारताच्या अधिकाधिक भागांमध्ये पोहोचणार आहे.

नव्या स्वरूपातील लीग टप्पा

आगामी हंगामात एकूण १०८ सामने खेळवले जाणार आहेत. यादरम्यान प्रत्येक संघ १८ सामने खेळणार आहे. या नव्या फॉरमॅटमुळे संघांची कसोटी लागेल आणि प्रेक्षकांना एकापेक्षा एक रोमांचक सामने आणि उच्च दर्जाची  कबड्डी पाहायला मिळेल. यासह स्पर्धेतील सर्व संघांना आपली क्षमता दाखवण्याची देखील संधी मिळणार आहे.

नवीन टाय-ब्रेकर नियमावली

प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामासाठी नवीन टाय- ब्रेकर नियमावली लागू करण्यात आली आहे. आता गोल्डन रेड फॉरमॅट साखळी फेरीतील सर्व सामन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. गेल्या हंगामापर्यंत हा नियम फक्त प्ले- ऑफ्सच्या सामन्यांपूर्ती मर्यादीत होता. या नव्या नियमामुळे संपूर्ण हंगामात प्रत्येक सामन्याचा निकाल हा निर्णायक लागणार आहे.

सामना बरोबरीत सुटल्यास ५ रेड शूटआऊट खेळवले जाईल

<span;><span;>- सामना बरोबरीत सुटल्यास दोन्ही संघ ७ खेळाडूंसह मैदानात उतरतील आणि बॉक लाईनला बोनस लाइन मानले जाईल.

<span;><span;>- प्रत्येक संघाला आपल्या ५ चढाईपटूंची नावं पंचांना सांगावी लागतील जे आळीपाळीने चढाई करतील.

<span;><span;>- आऊट आणि रिव्हायव्हल हे नियम लागू केले जाणार नाहीत. फक्त मिळवलेले गुण ग्राह्य धरले जातील.

<span;><span;>- जर ५-५ चढाई होऊनही सामना बरोबरीत सुटला, तर मग सामन्याचा निकाल हा गोल्डन रेडने लावला जाईल.

गोल्डन रेड फॉरमॅट हा निर्णायक क्षणी अधिक थरारक ठरतो. ज्यात पुन्हा एकदा नाणेफेक केली जाईल आणि कोणता संघ गोल्डन रेड करेल हे ठरेल.जर गोल्डन रेड होऊनही सामना बरोबरीत सुटला तर मग नाणेफेकीच्या आधारे विजयी संघ ठरवला जाईल.

हा नवा नियम प्रो कबड्डी लीग स्पर्धेची स्पर्धात्मकता कायम ठेऊन प्रत्येक सामन्याचा निकाल लागेल याची खात्री देतो. त्यामुळे प्रेक्षकांना कबड्डीचे आणखी थरारक आणि रोमांचक सामने पाहायला मिळू शकतात.

सोप्या स्वरूपातील गुणपद्धती

प्रेक्षकांना गुणतालिका समजण्यासाठी सोपी व्हावी यासाठी प्रो कबड्डीच्या १२ व्या हंगामात मोठा बदल करण्यात आला आहे. या हंगामासाठी गुणपद्धती आणखी सोपी करण्यात आली आहे. जो संघ सामना जिंकेल त्या संघाला २ गुण, तर पराभूत होणाऱ्या संघाला ० गुण मिळतील. या बदलामुळे  गुणतालिका समजून घेणं आणखी सोपं होणार आहे. तसेच लीगच्या प्रेक्षकांसाठी स्पष्ट आणि थरारक अनुभव देण्याच्या वचनबद्धतेला बल मिळेल.

प्ले- इन्स आणि प्ले -ऑफ्सच्या फॉरमॅटमध्येही बदल

या हंगामापासून प्ले- इन्सची सुरूवात केली जाणार आहे. तसेच प्ले-ऑफ्समध्ये नव्या स्वरूपातील फॉरमॅट लागू केला जात आहे. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये अग्रगण्य ८ संघांना प्ले-ऑफ्सची पात्रता मिळण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अधिक संघांना जेतेपदासाठी झुंज देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबर, प्ले- इन्समुळे साखळी फेरीतील प्रत्येक सामना महत्वाचा असेल आणि प्रत्येक सामना निर्णायक ठरेल.

काय आहे नवा फॉरमॅट?

१. गुणतालिकेत ५ ते ८ क्रमांकावर असलेले संघ प्ले- इन सामन्यांमध्ये लढतील. विजेते संघ एलिमिनेटर फेरीत प्रवेश करतील.

२.  गुणतालिकेत ३ आणि ४ क्रमांकावर असलेले संघ मिनी क्वालिफायर खेळतील. विजेता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला प्ले- ऑफ्समध्ये आणखी एक संधी मिळेल.

३. साखळी फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेले संघ क्वालिफायर १ मध्ये भिडतील. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला क्वालिफायर २ द्वारे अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळेल.

४. प्ले- ऑफ्सचा प्रवास हा आता ३ एलिमिनेटर आणि २ क्वालिफायर मधून होणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीचा प्रवास आणखी रोमांचक होईल

Related posts

वर्ल्ड पिकलबॉल लीगचे संस्थापक गौरव नाटेकर आणि एआयपीए अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्यासह चेन्नईच्या नवीन संघाच्या मालक समंथा रुथ प्रभू यांनी भारतात पिकलबॉलसाठी एका नवीन युगाची सुरुवात केली.

Shivani Shetty

ॲडव्हर्ब तर्फे लॉजिमॅट इंडिया २०२५ मध्ये क्रांतिकारी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन साल्युशन्सची भारतात सुरुवात- भारतातील सर्वांत मोठा क्वाड्रूपेड- ट्रॅकर २.० सह ब्रिस्क आणि एचओसीए चा समावेश

Shivani Shetty

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते रहदारी संबंधित माहिती तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

Shivani Shetty

Leave a Comment