१० मे २०२५*: आपले शूर भारतीय सशस्त्र दल १४० कोटी भारतीयांच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्य व बलिदानाला अभिवादन म्हणून, लोढा फाउंडेशन ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाच्या कुटुंबाला खालीलप्रमाणे विनम्र सहाय्य प्रदान करेल:
1. लोढा फाउंडेशन शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे, जो त्यांचं महाविद्यालयीन पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत चालू राहील. यामध्ये शिक्षण शुल्क, पुस्तके आणि वसतिगृहाचा खर्च समाविष्ट असेल. याशिवाय, लोढा जीनियस प्रोग्रॅम अंतर्गत या मुलांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व मार्गदर्शन (मेंटॉरशिप) दिले जाईल.
2. शहीद जवानांच्या पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता सहाय्य दिले जाईल. तसेच, जर त्या इच्छुक असतील, तर लोढा ग्रुप व लोढा फाउंडेशनमध्ये रोजगाराच्या संधींमध्ये त्यांना प्राधान्य दिले जाईल.
3. लोढा फाउंडेशन शहीद जवानांच्या पालकांसाठी पुढील २० वर्षांसाठी आरोग्य विम्याची व्यवस्था करेल.
- तसेच, भारताच्या वीर जवानांना मदतीचा हात देऊ इच्छिणाऱ्या नागरिक आणि कंपन्यांसाठी लोढा फाउंडेशनने ‘ऑपरेशन सिंदूर / देशभक्त निधी’ स्थापन केला आहे. या निधीमध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व देणग्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान शहीद झालेल्या किंवा कायमस्वरूपी अपंग झालेल्या सैनिकांच्या व नागरिकांच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी वापरल्या जातील.
लोढा फाउंडेशन सरकार व सशस्त्र दलांना आवश्यक असलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या सहाय्यासाठी पूर्ण मनापासून तयार आहे.

