maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

किया इंडियाची सर्वोत्तम मासिक विक्री

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५:ऐतिहासिक टप्‍प्‍याची घोषणा करत किया इंडियाने भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्‍यापासून ऑक्‍टोबर २०२५ मध्‍ये सर्वोत्तम मासिक विक्री कामगिरी संपादित केली. ऑक्‍टोबर २०२४ मध्‍ये करण्‍यात आलेल्‍या २२,३७५ युनिट्सच्‍या विक्रीच्‍या तुलनेत वार्षिक टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ अनपेक्षित विक्री टप्‍पा ठरला. या यशामधून भारतातील स्‍पर्धात्‍मक ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रात कियाची शक्तिशाली आणि शाश्वत गती दिसून येते.

किया इंडियाच्‍या या प्रबळ कामगिरीचे नेतृत्‍व सोनेटने केले आहे, जिने १२,७४५ युनिट्सच्‍या सर्वोच्‍च विक्रीची नोंद केली, तसेच ब्रँडच्‍या एकूण यशस्‍वी टप्‍प्‍यामध्‍ये प्रमुख योगदानकर्ता ठरली. या ट्रेण्‍डला पुढे नेत नुकतेच लाँच करण्‍यात आलेली कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस, तसेच कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍हीने विक्रमी एकत्रित ८,७७९ युनिट्सच्‍या विक्रीसह कंपनीच्‍या विकासाला गती दिली. कियाची प्रमुख एसयूव्‍ही सेल्‍टोसला ७,१३० युनिट्ससह प्रबळ मागणी मिळत राहिली, ज्‍यामधून भारतातील ग्राहकांमध्‍ये या वेईकलची अविरत लोकप्रियता दिसून येते.

कियाची पहिली मेड-इन-इंडिया ७-सीटर मास-प्रीमियम ईव्‍ही कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ईव्‍ही विशेषत: ईव्‍ही क्षेत्रात उदयोन्‍मुख प्रवेशक म्‍हणून इतरांपेक्षा वरचढ ठरली आहे, जेथे या वेईकलला ग्राहकांकडून प्रेरणादायी प्रतिसाद मिळत आहे, ज्‍यामधून कियाची शाश्वत गतीशीलतेमध्‍ये वाढती ताकद दिसून येते.

*या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाचे सेल्‍स व मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष आणि राष्‍ट्रीय प्रमुख श्री. अतुल सूद म्‍हणाले,* “ऑक्‍टोबर २०२५ किया इंडियाच्‍या प्रवासामधील ऐतिहासिक टप्‍पा असलेला महिना ठरला आहे. यामधून लाखो ग्राहकांचा विश्वास दिसून येतो, जे कियाच्‍या नाविन्‍यता व प्रगतीप्रती कटिबद्धतेवर विश्वास ठेवतात. आमचा वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची प्रबळपणे पूर्तता करत आहे. आमच्‍या ईव्‍ही श्रेणीचे वाढते योगदान भारतासाठी भविष्‍याकरिता सुसज्‍ज, शाश्वत गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या दिशेने आमच्‍या वाटचालीची अधिक पुष्‍टी देते. या यशाने आम्‍हाला प्रगतीशील ड्रायव्हिंग अनुभवासाठी तंत्रज्ञान, सुरक्षिता व स्‍टाइलचे संयोजन असलेल्‍या वेईकल्‍स वितरित करत राहण्‍यास प्रेरित केले आहे.”

या विक्रमी कामगिरीसह किया इंडियाने मागील सर्व विक्री टप्पे पार केले आहेत, तसेच देशातील सर्वात विश्वसनीय आणि झपाट्याने विकसित होणारा ऑटोमोबाइल स्‍टॅण्‍ड म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ देखील केले आहे. कियाच्‍या संपूर्ण उत्‍पादन श्रेणीमधील प्रबळ मागणीमुळे कंपनीला यश मिळाले आहे.

किया इंडियाने जवळपास १० टक्‍क्‍यांची शक्तिशाली इअर-टू-डेट (वायटीडी) वाढीची नोंद केली आहे, जेथे २०२५ मध्‍ये आतापर्यंत २३६,१३८ युनिट्सची विक्री करण्‍यात आली, तुलनेत गेल्‍या वर्षी याच कालावधीदरम्‍यान २,१५,४४३ युनिट्सची विक्री करण्‍यात आली होती. या प्रभावी कामगिरीमधून कियाच्‍या सर्वांगीण व श्रेणीमध्‍ये उत्तम कामगिरी करणाऱ्या उत्‍पादनांसाठी ग्राहकांची उत्तम पसंती दिसून येते, ज्‍याला नुकतेच करण्‍यात आलेल्‍या जीएसटी दरामधील सुधारणांचे पाठबळ मिळाले, ज्‍यामुळे किफायतशीरपणा वाढला आणि सणासुदीच्‍या काळात वेईकल खरेदी करण्‍याच्‍या भावनेला चालना मिळाली.

किया इंडियाच्‍या स्थिर वाढीमधून ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेवरील फोकस दिसून येतो, ज्‍याला प्रगत तंत्रज्ञान आणि उच्‍च दर्जाच्‍या मालकीहक्‍क अनुभवाने गती दिली आहे. यासोबत स्‍थानिक उत्‍पादन आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमधील नेटवर्क विस्‍तारीकरणामध्‍ये सातत्‍याने गुंतवणूक, डिजिटलायझेशन आणि भारत-केंद्रित उत्‍पादने यांचा पाठिंबा मिळाला आहे.

Related posts

Snapchat, WPP मीडिया आणि Lumen यांच्याकडून ‘Attention Advantage’ रिसर्चचे अनावरण – भारतातील डिजिटल जाहिरातींचे भविष्य नव्याने ठरवले जात आहे

Shivani Shetty

वझीरएक्स आणि टॅक्सनोड्सच्या भागीदारीचा विस्तार

Shivani Shetty

सहीबंधूने १४,००० कोटी रुपयांचे गोल्ड लोन वितरित केले

Shivani Shetty

Leave a Comment