maharashtraprimenews
ठळक बातम्या
चित्रपटठळक बातम्यामनोरंजनमुंबई

जारण’ने साजरी केली सक्सेस पार्टी* *तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई*

मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोजही अनेक ठिकाणी वाढवण्यात आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘जारण’ची संपूर्ण टीम, निर्माते, कलाकार मंडळी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थिती लावली.

 

Related posts

नेत्रदीपक शोडाऊनमध्ये चॅम्पियन्सचा ताज: प्रो गोविंदा सीझन 2 लीगच्या अंतिम फेरीस जल्लोषपूर्ण यश सातारा सिंघम्स (जय जवान गोविंदा) संघाने मिळविला विजेतेपदाचा मान

Shivani Shetty

वेदात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार एकत्र

Shivani Shetty

इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेडचा अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCD) ट्रान्चे I इश्यू खुला . कूपनचा दर, दरवर्षाला 10.30% पर्यंत# प्रभावी उत्पन्न दरवर्षाला 10.30% पर्यंत#

Shivani Shetty

Leave a Comment