maharashtraprimenews
ठळक बातम्या
चित्रपटठळक बातम्यामनोरंजनमुंबई

जारण’ने साजरी केली सक्सेस पार्टी* *तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई*

या वेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, ”जारण’सारखा सिनेमा बनवणे हे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्या स्वप्नाशी स्वतःला जोडतात, तेव्हा एक निर्मिती फक्त प्रकल्प न राहाता एक भावनिक बंध जुळले जातात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आम्हाला नव्याने ऊर्जा दिली आहे. या चित्रपटामध्ये हृदयस्पर्शी कथा आणि परिश्रमांची गुंफण आहे. यशाच्या या टप्प्यावर पोहोचताना आमच्या संपूर्ण टीमने ज्या श्रद्धेने काम केले, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचे आज सिद्ध झाले आहे.”

निर्माते अमोल भगत यांनी यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले, ” जारण’सारखा आशयघन सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला प्रचंड आत्मिक समाधान मिळत आहे. हे यश म्हणजे आमच्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती आहे. प्रेक्षकांसाठी अशाच आशयप्रधान, अर्थपूर्ण आणि भावनिक कथा घेऊन आम्ही नक्कीच येऊ.’’

अनिस बाझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने आणि एथ्री इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं आहे. तर निर्मितीची जबाबदारी अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी सांभाळली असून मनन दानिया सहनिर्माता आहेत. या चित्रपटात अमृता सुभाष व अनिता दाते यांच्यासह किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी आणि सीमा देशमुख यांचा दमदार अभिनय अनुभवायला मिळतो.

Related posts

मिलिंद सोमणनच्या लाइफलोंग ग्रीन राइड ३.० ला सुरुवात; निरोगी आणि हरित भारतासाठी मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु !

Shivani Shetty

विद्यार्थ्यांना शिकवून घरी जाताना शिक्षिकेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं; डंपरखाली चिरडून गमावले प्राण

cradmin

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

cradmin

Leave a Comment