maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

महाराष्ट्रातील अन्‍न व औषध प्रशासन, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्‍हीआय) आणि नेस्ले इंडियाकडून राज्‍यामध्‍ये प्रकल्‍प ‘सर्व्‍ह सेफ फूड’चा विस्‍तार*

महाराष्ट्रात ‘सर्व्‍ह सेफ फूड’ प्रकल्पाचा भौगोलिक विस्तार करत नेस्ले इंडियाने अन्‍न व औषध प्रशासन, महाराष्ट्र आणि नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्‍हीआय) सोबत सहयोग सुरू ठेवला आहे. या सहयोगांतर्गत मुंबई, नाशिक आणि ठाणे येथील २,५०० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्‍यात येईल, ज्‍यामुळे राज्यातील एकूण स्ट्रीट फूड विक्रेत्यांची संख्या ६,१०० हून अधिक झाली आहे.

‘सर्व्ह सेफ फूड’ या प्रोजेक्टमुळे २६ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमधील ९२,८०० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित अन्‍न हाताळणी, कचरा विल्हेवाट व उद्योजकता याबद्दल शिक्षित करून फायदा झाला आहे. प्रशिक्षण उपक्रम विक्रेत्यांना त्यांच्या अन्‍न हाताळणीच्या पद्धती सुधारण्यासाठी माहितीसह सुसज्‍ज करतो.

महाराष्ट्राच्‍या अन्‍न व औषध प्रशासनाचे आयुक्‍त श्री. राजेश नार्वेकर म्हणाले, “महाराष्ट्रामध्‍ये देशातील प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा आस्‍वाद मिळतो. साधा वडा पाव आणि मिसळ पाव असो किंवा कबाब असो, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीसह मोठ्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आमचा ही संस्कृती आणखी दृढ करण्याचा आणि राज्यातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांना अन्‍न स्वच्छता व सुरक्षिततेबद्दल कौशल्य देऊन सक्षम करण्याचा मनसुबा आहे. महाराष्ट्रातील नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्‍हीआय), अन्‍न व औषध प्रशासन (एफडीए) आणि नेस्ले इंडिया यांच्यातील सहयोगाबद्दल आणि ‘सर्व्‍ह सेफ फूड’ प्रोजेक्टद्वारे उद्दिष्ट साध्य करण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल मी आभार व्‍यक्‍त करतो.”

नेस्ले इंडियाच्या शाश्वतता व सामाजिक उपक्रमांच्या प्रमुख डॉ. तरुना सक्सेना म्हणाल्या, “नेस्ले इंडियामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या पलीकडे जाऊन भारतातील अन्‍न सुरक्षितता सुधारण्याचा सातत्याने प्रयत्‍न करत आहोत. प्रकल्‍प ‘सर्व्ह सेफ फूड’ स्वच्छता आणि अन्‍न सुरक्षा पद्धतींवरील संबंधित प्रशिक्षणाद्वारे स्‍ट्रीट फूड विक्रेत्यांना त्यांचे कौशल्य अपग्रेड करून सक्षम करते. यामुळे अन्‍न सुरक्षा आणि स्वच्छतेबद्दल हे अधिक जागरूक होतील. आम्ही या प्रकल्पाचा विस्तार करत आहोत, तसेच आम्हाला विश्वास आहे की, यामुळे कालांतराने सकारात्मक वर्तनात्मक बदल घडून येतील आणि त्यांच्या व्यवसायांच्या एकूण वाढीस व शाश्वततेला हातभार लागेल.”

नेस्ले इंडियाने २०१६ मध्ये प्रकल्‍प ‘सर्व्ह सेफ फूड’ सुरू केला आणि आसाम, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, अंदमान व निकोबार बेटे, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्‍कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये स्ट्रीट फूड विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले आहे.

Related posts

न्यू चॅप्टरच्या संवादाचे उद्घाटन करून अॅबॉटकडून मेनोपॉजबाबत जास्तीत जास्त लोकांना बोलते करण्याचे आवाहन

Shivani Shetty

‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार

Shivani Shetty

मुंबईत प्रथमच संतोकबा मानवतावादी पुरस्काराचे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment