maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

क्रोमाने सांताक्रूझ पश्चिम मध्ये नवीन दालन सुरू केले

मुंबई, जुलै २०२५ : टाटा समूहाकडून सुरू झालेलाभारतातील पहिला आणि विश्वासार्ह ओम्नीचॅनेलइलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमाने सांताक्रूझ पश्चिम मधील नवीनदालनाच्या उद्घाटनासह मुंबईतील आपले स्थान आणखीबळकट केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्यामागणीची पूर्तता करण्यासोबतच स्थानिक समुदायालाअधिक चांगला शॉपिंग अनुभव देण्यासाठी हे पाऊलउचलण्यात आले आहे.

२०० हून अधिक शहरांमध्ये ५६० हून अधिक दालनांसह क्रोमामोठ्या स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्पेसमध्ये नेतृत्वकरत आहे. येथे ५५० हून अधिक आघाडीच्या ब्रँड्सची१६,००० पेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. गेटवे बायसुंदर व्हिला, हसमुख नगर, जुहू तारा रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई येथील हे नवीन स्टोअर ,४२८ चौ.फूट क्षेत्रफळातपसरले आहे आणि शहरातील ब्रँडचे स्थान अधिक मजबूतकरत आहे.

श्री.शिबाशीष रॉय, मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक, क्रोमा इन्फिनिटी रिटेल लिमिटेडया नवीन स्टोअरच्या उद्घाटनाविषयी बोलताना म्हणाले,“सांताक्रूझ पश्चिम मधील आमचे स्टोअर हा आमच्याविकासाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दर्जेदारतंत्रज्ञान अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्याबांधिलकीचे हे प्रतीक आहे. तसेच ग्राहकांना उत्कृष्ट खरेदीअनुभव मिळावा यासाठीचा आमचा प्रयत्नही यात दिसूनयेतो. या उत्साही आणि गजबजलेल्या परिसरात आमचीविस्तृत उत्पादन श्रेणी आणि विश्वासार्ह सेवा घेऊन येतानाआम्हाला अत्यंत आनंद होत आहे.”

या नव्या स्टोअरच्या समावेशासह, क्रोमा आता मुंबईत एकूण५२ स्टोअर्स आणि महाराष्ट्रात १०५ स्टोअर्सच्या माध्यमातूनकार्यरत आहे. खरेदीदारांना येथे लॅपटॉप्स, टीव्ही, स्मार्टफोन्स, घरगुती उपकरणे आणि ऑडिओॅक्सेसरीजसह विविध उत्पादनांमध्ये तज्ञांचे मार्गदर्शनआणि विक्रीनंतरच्या मूल्यवर्धित सेवा देखील अनुभवायलामिळणार आहेत. सांताक्रूझ पश्चिम हे मुंबईतील एकगजबजलेले निवासी आणि व्यावसायिक उपनगर असूनक्रोमाच्या वाढीसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. तंत्रज्ञानाबद्दल जागरूक ग्राहकवर्ग आणि आधुनिकगॅजेट्सच्या वाढत्या मागणीमुळे सांताक्रूझ पश्चिम क्रोमाच्यासातत्यपूर्ण रिटेल वाढीसाठी एक योग्य स्थान आहे.

Related posts

टाटा मोटर्सने भारतातील पहिल्‍या एसयूव्‍ही कूपेसह मिड-एसयूव्‍ही श्रेणीला नव्‍या उंचीवर नेले

Shivani Shetty

सैमसंग ने भारत में गैलेक्सी वियरेबल्स पर रोमांचक क्रिसमस ऑफर्स की घोषणा की

Shivani Shetty

मेधा शंकरने जिंकला IMDb स्टारमीटर पुरस्कार

Shivani Shetty

Leave a Comment