maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मुंबईतील ज्वेलर्ससोबत ‘प्लस’चा सहयोग

मुंबई, १७ सप्टेंबर २०२३: यंदा सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा उत्साहपूर्ण आनंद देण्यासाठी भारतातील ज्वेलरी सेव्हिंग्ज अॅप प्लसने मुंबईतील विविध ज्वेलर्ससोबत सहयोग केल्याची घोषणा केली आहे. यामुळे वापरकर्ते स्वस्त दरात सोन्याची नाणी खरेदी करू शकतील. भारतीय गृहिणींसाठी लाँच करण्यात आलेले प्लसचे अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासोबत घडणावळीवर बचत करण्याची सुविधा देते.

प्रत्येक भारतीयाची साजरा केल्या जाणाऱ्या सणांसह घरामध्ये समृद्धता येण्याची इच्छा असते. शुभ सणासुदीच्या काळाला सुरूवात करण्यासाठी आणि गृहिणींना सोन्याची नाणी खरेदी करता येण्यासाठी प्लसने मुंबईतील २०हून अधिक ज्वेलर्ससोबत सहयोग केला आहे, ज्यामुळे वापरकर्ते स्वस्त दरात सोन्याची नाणी खरेदी करू शकतात आणि त्यांना घडणावळीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. ही अद्वितीय ऑफर वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीच्या विश्‍वसनीय ज्वेलरकडून स्वस्त दरात सोन्याची नाणी खरेदी करण्याची संधी देते. तसेच प्लसचा महाराष्‍ट्राच्या राजधानी शहरामधील म्हणजेच मुंबईतील १०० हून अधिक ज्वेलर्ससोबत सहयोग करण्याचा उद्देश आहे.

म्हणाले, “समृद्धतेचे प्रतीक म्हणून सोन्याची नाणी खरेदी करणे ही प्रथा विशेषत: सणासुदीच्या काळात भरतातील अनेक घरांमध्ये पाळली जाते. यामधून सण साजरा करण्यासह समृद्धतेचा आनंद मिळतो. भारतीयांना त्यांच्या इच्छा व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी प्लसने मुंबईतील विविध प्रमुख ज्वेलर्ससोबत सहयोग केला आहे. वापरकर्त्यांना सोन्याची नाणी खरेदी करण्यामध्ये मदत करण्यासाठी या सहयोगांतर्गत विशेष ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. हा सहयोग आमच्या वापरकर्त्यांना इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त दरामध्ये सोन्याची नाणी खरेदी करण्यास सक्षम करेल.”

प्लसने मुंबईतील प्रमुख ज्वेलर्ससोबत, तसेच ज्वेलर सहयोगी जसे शिव शुभम ज्वेलर्स प्रा., लघु बंधू, पांडुरंग हरी वैद्य अॅण्‍ड सन्‍स ज्वेलर्स, शा धानजी पूनमचंद.के आणि विपुल ज्वेलर्स यांच्यासोबत सहयोगाने फेस्टिव्ह  ऑफर लाँच केली आहे.

Related posts

पीव्‍हीआर आयनॉक्‍सचा किफायतशीर पासपोर्ट आता संपूर्ण भारतात अद्वितीय वैशिष्‍ट्यांसह उपलब्ध

Shivani Shetty

आयओएसपीएलने भारतात तीन सहयोगी ब्रॅण्‍ड्स लॉन्च केले

Shivani Shetty

इझमायट्रिपची इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

Leave a Comment