maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आर्या ओम्नीटॉकची फ्लीट मॅनेजमेंट सोल्युशन्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे क्रांती

मुंबई, २९ जानेवारी २०२५: टेलीमॅटिक्स उद्योगात २०हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या आर्या ओम्नीटॉकने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक क्षेत्रात आयओटी आणि जीपीएसचा वापर वाढला असून त्यामध्ये या क्षेत्राला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. साहजिकच ‘आर्या ओम्नीटॉक’सारखी विश्वासार्ह जीपीएस सोल्यूशन पुरविणारी कंपनी एकमेव ठरत आहे.

 

 

लॉजिस्टिक्स, घातक रसायनांची व नाशवंत अन्नपदार्थांची वाहतूक, कर्मचारी वाहतूक, कोणत्याही मालाचे कार्यक्षम वितरण अशा प्रत्येक क्षेत्रात ‘आर्या ओम्नीटॉक’च्या जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस आणि ‘फ्लीट विझिल’ या एसएएएस-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे पारंपरिक ट्रॅकिंगच्या पलीकडे जाऊन काम केले जाते. कंपनीची ही सोल्युशन्स फ्लीट ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी, सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक परतावा देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत.

 

आर्या ओम्नीटॉक’चे सीओओ व सीटीओ सौमिल ध्रू यांनी सांगितले की “प्रत्येक ग्राहकाच्या विशिष्ट गरजांनुसार त्याला खास प्रकारची सोल्युशन्स देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. उद्योगातील सर्व क्षेत्रांसाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि ऑप्टिमाइज्ड वाहतूक व्यवस्था साकार करण्याकरीता आम्ही आमचा काळानुरुप सिद्ध झालेला, अतिशय विश्वासार्ह आयओटी प्लॅटफॉर्म उपयोगात आणत असतो.”

 

वाहनांमध्ये एआयएस १४० जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसविल्यामुळे भारतातील वाहतूक आणि रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येत आहे. या उपकरणांबाबत खुद्द केंद्र सरकारनेच आदेश दिलेला असल्याने व्यावसायिक वाहनांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून येत असून सुरक्षेच्या उच्च मानकांची अंमलबजावणी करण्यात आणि एकंदर वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यात हा आदेश क्रांतिकारक ठरणार आहे.

 

आर्या ओम्नीटॉक ही या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून ती एआयएस १४० मानकांशी सुसंगत अशी अत्याधुनिक सोल्युशन्स पुरविते. ही सोल्युशन्स फ्लीट ऑपरेटर आणि वाहतूक प्राधिकरणांना त्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यास मदत करतात. सार्वजनिक सुरक्षेला यात प्राधान्य देण्यात आलेले आहे. यातील रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि चालकाच्या वर्तनाचे विश्लेषण या वैशिष्ट्यांमुळे अपघात कमी होण्यास मदत होते आणि चालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ते महत्वाचे ठरते.

 

भारताच्या शहरी भागातील वाढत्या प्रगतीच्या अनुषंगाने सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमांशी अनुरुप असे अनेक उपाय आर्या ओम्नीटॉक सादर करते. औद्योगिक व नगरपालिका स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन सुधारण्याकरीता ही कंपनी आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थापन, घनकचरा विल्हेवाट व्यवस्थापन आणि बुद्धिमान मालवाहतूक व्यवस्थापन अशा अनेक उपाययोजना पुरविते. बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन उपायांमधून कंपनी शहरांना सक्षम करते आणि संकटाच्या परिस्थितीत प्रतिसादाचा वेळ कमी करून सार्वजनिक सुरक्षा वाढवते.

 

संकल्पना व डिझाईन तयार करणे, त्यांची अंमलबजावणी आणि देखभालीची व्यवस्था अशी संपूर्ण सेवा देण्याची या कंपनीची क्षमता आहे. कस्टमाइज्ड अॅप्लिकेशन्स, आयओटी इंटिग्रेशन आणि इन्ट्युइटिव्ह डॅशबोर्ड यांच्या माध्यमातून ही कंपनी वाहतुकीतील गुंतागुंतीची आव्हाने हाताळते.

Related posts

स्नॅप इंडिया जागतिक स्थरावर एआर लेन्सेस आकडेवारीसह अग्रस्थानी

Shivani Shetty

मधुमेहामुळे येणाऱ्या दृष्टिहीनतेला प्रतिबंध करण्यासाठी VRSI आणि RSSDI द्वारे पहिल्यांदाच डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसारित

Shivani Shetty

१९ ऑक्टोबर रोजी ठाण्यामध्ये राज्यस्तरीय शिक्षण स्नेहमेळाव्याचे आयोजन, हजारो शिक्षक उपस्थित राहणार*

Shivani Shetty

Leave a Comment