नवी मुंबई, ६ डिसेंबर २०२४:वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झाली शोकांतिका! ५ वर्षांची मुलगी आई श्रीमती स्नेहा हिचा वाढदिवस साजरा करून आई-वडिलांसोबत घरी परतत होती. एका एसयूव्हीने त्यांच्या कारला धडक दिली, दुर्दैवाने वडिलांचा जागीच मृत्यू झाला, लहान मुलगी आणि तिच्या आईला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. आईची प्रकृती स्थिर होती, परंतु ५ वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली होती, तिच्या नाकातून आणि तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मुलीला प्रगत गंभीर उपचारांसाठी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत नेण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्सच्या आपत्कालीन कक्षात या मुलीला आणले तेव्हा ती बेशुद्ध आणि खूप शॉकमध्ये होती. तपासणीमध्ये आढळून आले की डोके आणि चेहऱ्याच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच हातापायांचे फ्रॅक्चर, जबडा, मनगट, कॉलरबोनचे फ्रॅक्चर आणि फुफ्फुसांना अनेक जखमा झालेल्या होत्या.
डॉ.अभिजीत बागडे, क्लिनिकल लीड-पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर अँड जनरल पेडियाट्रिक्स, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,”आमच्या समोर आलेल्या सर्वात आव्हानात्मक प्रकरणांपैकी ही एक केस होती. मुलीचे वय खूपच लहान होते आणि तिला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालेली होती, खूप जास्त रक्त वाहून गेले होते, जखमा गंभीर आणि गुंतागुंतीच्या होत्या. संपूर्ण हॉस्पिटलचे लक्ष तिच्याकडे होते, त्या सर्वांच्या शुभेच्छांसह आम्ही उपचार सुरू केले.मुलीचे वय खूपच लहान असल्यामुळे डोके, चेहरा आणि हाताच्या फ्रॅक्चरच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या, ज्यामध्ये विशेष काळजी घेण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, तिला बालरोग अतिदक्षता विभागात (पीआयसीयू) वेंटिलेशन सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि तिच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवले जात होते. पुढील काही दिवसांत मुलीची प्रकृती हळूहळू सुधारत गेली; शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी, श्वासोच्छवासाची नळी काढून टाकण्यात आली जेणेकरून ती स्वतः श्वास घेऊ शकेल. काळजीपूर्वक निरीक्षण आणि वैद्यकीय व्यवस्थापनाने, मुलीची किडनी आणि यकृत यांची कार्ये हळूहळू सामान्य झाली.”
डॉ. बागडे पुढे म्हणाले,“मुलीच्या तब्येतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ लागली, ते पाहणे खूप आनंददायी आणि समाधानकारक होते. आमच्या टीमने अतिशय तातडीने आवश्यक ती पावले उचलली आणि पूर्ण सहयोग दिला, मुलीचा जीव वाचवण्यात हे खूप मोठे योगदान होते. सर्जरी आणि आयसीयूमधील देखभाल खूप मोलाची ठरली. मुलगी चांगली बरी झाली आणि १८ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार दिल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले.”
डॉ.विनोद विज, सिनियर कन्सल्टन्ट, प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“एवढ्या लहान मुलीच्या चेहऱ्याचे फ्रॅक्चर रिकन्स्ट्रक्ट करणे ही एक नाजूक प्रक्रिया आहे आणि तिच्या चेहऱ्याची रचना आता वाढण्याच्या अवस्थेत आहे, त्यावर परिणाम होऊ नये हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे होते. आमच्या टीमने मुलीचे दिसणे आणि कार्यक्षमता पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी काळजीपूर्वक काम केले आणि त्याचे खूप चांगले परिणाम मिळाले.”
बाळाची मावशी सुश्री समता गौड यांनी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईप्रती कृतज्ञता व्यक्त केली, त्या म्हणाल्या,”आम्ही अपोलो हॉस्पिटल्सच्या टीमचे जितके आभार मानू ते कमीच असतील. या आव्हानात्मक काळात त्यांनी दिलेला तत्काळ प्रतिसाद अमूल्य होता. वैद्यकीय सेवा आणि देखभालीबरोबरीनेच त्यांनी आमची भावनिक साथ देखील दिली. माझ्या भाचीच्या जीव वाचवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. आम्ही मीडियाचे देखील आभारी आहोत. त्यांच्या कव्हरेजमुळे अनेक परोपकारी व्यक्तींनी दान केले आणि योग्य ते उपचार करवून घेण्यासाठी आम्हाला सक्षम केले.”
“तिच्या बरे होण्याच्या काळात, हातापायांची हालचाल पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी तिला फिजिओथेरपी द्यावी लागली. २५ नोव्हेंबर रोजी डिस्चार्जच्या वेळी, तिची पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलू शकत होती, आधाराशिवाय बसू शकत होती आणि कमीत कमी मदत घेऊन चालू शकत होती. घरी देखील फिजिओथेरपी चालू ठेवावी यासाठी तिच्या आईला प्रशिक्षण देण्यात आले. मनोवैज्ञानिक समुपदेशनामुळे तिला पोस्ट-ट्रॉमॅटिक तणावातून बरे होण्यास खूप मदत झाली.”