maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

अपोलोने राष्ट्रीय डॉक्टर दिनी प्रतिबंधात्मक आरोग्याप्रती आपली वचनबद्धता जाहीर केली

नवी मुंबई, २ जुलै २०२५ : अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून, भारताच्या आरोग्यसेवेच्या भविष्याला आकार देण्यासाठी एक नवी ऐतिहासिक वचनबद्धता जाहीर केली आहे. देशातील वाढत्या असंसर्गजन्य रोग (एनसीडी) संकटाला तोंड देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने प्रतिबंधाला प्राधान्य या तत्त्वावरील देखभाल दुपटीने वाढवण्याचे ठरवले आहे. अपोलो हॉस्पिटल्सने चार दशकांहून अधिक काळ टिकवून ठेवलेल्या क्लिनिकल नेतृत्वावर आधारित, उचलण्यात आलेले हे धोरणात्मक पाऊल एआय-चालित, तंत्रज्ञान-सक्षम प्रतिबंधात्मक आरोग्यावर अपोलोचे लक्ष अधिक बळकट करेल त्यामुळे आजाराचे निदान करण्याच्या, भविष्याचे अंदाज वर्तवण्याच्या आणि त्यांचा प्रतिबंध करण्याच्या भारतातील पद्धतींमध्ये बदल घडवून आणले जातील. गेल्या चार दशकांच्या क्लिनिकल नेतृत्वाच्या आधारे उचलण्यात आलेले हे धोरणात्मक पाऊल, एनसीडी संकटाचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआय-संचालित इंटेलिजन्सचा वापर करून रोग प्रतिबंधकतेवर अपोलोचा फोकस अधिक मजबूत करेल.

ही घोषणा १९७४ मध्ये सुरू झालेल्या एका मोहिमेचे प्रतिबिंब आहे, जेव्हा डॉ. रेड्डी यांनी भारतातील पहिली संरचित आरोग्य तपासणी सुविधा सुरू केली. तेव्हापासून, अपोलोने जागतिक स्तरावर बेंचमार्क केलेली एक इकोसिस्टिम तयार केली आहे – ज्याला ते “सायन्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ” म्हणतात – ज्याने जगभरातील २९ दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनावर प्रभाव निर्माण केला आहे.

डॉ. प्रताप सी रेड्डी, संस्थापक आणि अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाले,“एक डॉक्टर म्हणून, मी आपल्या देशावर असंसर्गजन्य आजारांचा होत असलेला प्रचंड परिणाम पाहतो आहे – केवळ आरोग्यावरच नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या कुटुंबांवर आणि आपल्या भविष्यावरही हा परिणाम होत आहे. ही एक मूक त्सुनामी आहे आणि तिच्याशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर कारवाई करणे. आज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुराव्यावर आधारित प्रतिबंधात्मक उपक्रमांच्या बळावर, आपल्याकडे रोग येण्यापूर्वीच धोका ओळखण्याची अभूतपूर्व क्षमता आहे – जी रोगाच्या वाढीला आळा घालण्यात मदत करते आणि बर्याच केसेसमध्ये परिस्थिती पूर्णपणे उलटवते. प्रतिबंध हा आपल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा आधारस्तंभ असला पाहिजे.”

नॉन कम्युनिकल डिसीज (एनसीडी) लढा: एक राष्ट्रीय अभियान भारत एका अभूतपूर्व आरोग्य संकटाचा सामना करत आहे – एकूण मृत्यूंपैकी ६३% मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. तरुण पिढीच्या जीवनावर या मूक साथीच्या आजाराचा परिणाम वाढत असल्याने समस्या अधिक गंभीर बनत आहे. रोगाचे लवकरात लवकर निदान आणि उपचार करण्याची शक्ती वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित झाली आहे: ८०% प्रकरणांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या रोखता येतात, मधुमेहाची गुंतागुंत ७०% प्रमाणात कमी करता येते आणि पद्धतशीर तपासणी आणि जीवनशैलीत बदल उपक्रमांच्या माध्यमातून कर्करोगाच्या मृत्युदरात ५०% घट करता येते.

अपोलोच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मॉडेलमध्ये एआयसीव्हीडी सारखी इनोवेशन्स आहेत, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोक्यांचा आधीच अंदाज लावण्यासाठी एक आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल आहे; ज्यामुळे देशावरील आजारांचा भार कमी होतो. होम डायग्नॉस्टिक्स, रिअल-टाइम डिजिटल रिपोर्ट यासारखी वैशिष्ट्ये; मोबाइल वैद्यकीय युनिट्स वंचित समुदायांना आरोग्यसेवा सेवा देत आहेत. अपोलोची व्यापक प्रतिबंधात्मक चौकट केवळ भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य प्राधान्यांना समर्थन देते, इतकेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी देखील सुसंगत आहे-आरोग्यसेवा फक्त मर्यादित उपचारांपुरती मर्यादित राहू नये, तिचे रूपांतर सातत्यपूर्ण निरोगीपणात व्हावे आणि आजार प्रतिबंधाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळावा हा उद्देश अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचा आहे.

Related posts

गुवाहाटीने १०० टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसेससह स्‍वीकारला हरित मार्ग

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने भविष्य में सड़क सुरक्षा के लिए काम करने वालों का टीएसईपी के जरिये सशक्तिकरण किया

Shivani Shetty

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

Leave a Comment