maharashtraprimenews
ठळक बातम्या
अंबरनाथआंतरराष्ट्रीयआरोग्य वार्ताउल्हासनगरकर्जतकलाकल्याणकोकणकोल्हापूरक्रीडागुजरातगुन्हेचित्रपटजळगावठळक बातम्याठाणेडोंबिवलीदिल्लीनवी दिल्लीनवी मुंबईनागपूरनाटकनांदेडनालासोपारानाशिकनेरळपंढरपूरपनवेलपालघरपिंपरी/चिंचवडपुणेबदलापूरबॉलीवूडबोरगांव/माणगांवमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईमुरुड/जंजिरारत्नागिरीरायगडराष्ट्रीयलेखवसईविदर्भविरारशहापूरसंपादकीयसांगलीसातारासाहित्यसोलापूरहॉलिवूड

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : दिवाळी सणाची धामधूम सुरू झाल्याने मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत. सणासुदीच्या दिवसांमुळे मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या असून अशा गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर आहे. एकीकडे ही स्थिती असताना मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडविले जाणार असल्याचा फोन कॉल आल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. या फोननंतर सुरक्षा यंत्रणा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. (security agencies on alert in mumbai and maharashtra)अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेल विमानतळावर स्फोट हे स्फोट घडवले जाणार असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या फोननंतर पोलिसांनी सर्व ठिकाणी तपास केला. मात्र, कुठेही काही संशयास्पद आढळले नाही. सध्या पोलीस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिवाजी पार्कात राज ठाकरेंचा कार्यक्रम, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती असणार!यापूर्वी अंधेरीतील अंबानी हॉस्पिटल आणि अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी दहिसर येथील विष्णू भौमिक आणि बिहार येथील राजेश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून असे धमकीचे फोन येत असल्याने आणि सणासुदीच्या काळ असल्याने मुंबई पोलिस सतर्क असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा- ईडी, सीबीआय उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करणार?; शिंदेंनी ‘तह’ मोडला… वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन’शांततेत साजरे करा सण’

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी लोकांना सण शांततेत साजरा करण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अफवा पसरवणार्‍यांवर आणि अशा धमक्या देणार्‍या कॉल करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले आहे. बाजारपेठ, चित्रपटगृहे, पार्किंगची ठिकाणे, मॉल्स इत्यादी गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

क्लिक करा आणि वाचा- आदित्य ठाकरेंनी सांगितला शिंदे गटाच्या आमदारांचा ‘नेक्स्ट प्लान’; CCTV, पोहे सगळंच काढलं

Related posts

नवी मुंबईत ‘प्रोटॉन कर्करोग थेरपी परिषद

Shivani Shetty

आयुष्मान खुरानाची वाय वाय इंडियाच्या ब्रँड अम्बॅसॅडरपदी नियुक्ती

Shivani Shetty

मोबिक्यूल: भारतातील कर्ज निराकरणाच्या भौतिक परिवर्तनाचे नेतृत्व करण्यात अग्रणी

Shivani Shetty

Leave a Comment