औरंगाबाद: दोन मित्र हॉटेलमध्ये भजी खात असताना किरकोळ करणावरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच धारदार चाकूने मित्रावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान मित्राचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद – पैठण मार्गांवरील साखर कारखाना परिसरात घडली आहे. अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख (वय-३५ रा. पिराची पिंपळवाडी, पैठण) असे मृताचे नाव आहे. तर रामेर उर्फ राम गजेसिंग बोते (वय-३७ रा.साखर कारखाना कॉलनी पैठण) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा -आईने आवडती भाजी केली नाही, मग या मुलाने जे केलं ते भयंकरच…
नेमकं काय घडलं?याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी अब्दुल आणि राम अडीच वाजेच्या सुमारास कारखाना परिसरातील एका हॉटेलमध्ये भजी खाण्यासाठी गेले होते. तेथे गप्पा मारत दोघेही भजी खात होते. दरम्यान किरकोळ विषयाला घेऊन दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर बाचाबाची झाली.
हेही वाचा -ड्रग्ज तस्करीसाठी भारतीय महिलांशी लग्न, दिल्लीत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबई कनेक्शन उघड
वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या रामने बाजूच्या अंडा ऑम्लेटच्या दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकूने अब्दुलवर सपासप वार केले. या हल्ल्यानंतर अब्दुल जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अब्दुलली तसंच टाकून आरोपी रामने तेथून पळ काढला. तेथे उपस्थितांनी जखमी अब्दुलला तातडीने रुग्णाल्यात हलवले. मात्र, उपचार सुरु असताना अब्दुलचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी रामचा शोध सुरु केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच राम शेतातील उसामध्ये लपून बसला होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत शेतातून त्याला अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -कल्याणमध्ये ग्राहकाकडून एक दोन नाही तब्बल १७ लाखांची वीजचोरी, महावितरणलाही शॉक
कुख्यात गज्या मारणेच्या मुसक्या आवळल्या; सातारा जिल्हयातील वाईमधून घेतलं ताब्यात