maharashtraprimenews
ठळक बातम्या
अंबरनाथआंतरराष्ट्रीयआरोग्य वार्ताउल्हासनगरकर्जतकलाकल्याणकोकणकोल्हापूरक्रीडागुजरातगुन्हेचित्रपटजळगावठळक बातम्याठाणेडोंबिवलीदिल्लीनवी दिल्लीनवी मुंबईनागपूरनाटकनांदेडनालासोपारानाशिकनेरळपंढरपूरपनवेलपालघरपिंपरी/चिंचवडपुणेबदलापूरबॉलीवूडबोरगांव/माणगांवमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईमुरुड/जंजिरारत्नागिरीरायगडराष्ट्रीयलेखवसईविदर्भविरारशहापूरसंपादकीयसांगलीसातारासाहित्यसोलापूरहॉलिवूड

एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी पण शेवटी शरद पवारांनी कॅच पकडलाच…!

मुंबई : “आम्हालाही थोडी थोडी बॅटिंग करता येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली आणि मॅच जिंकली” असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तांतराची आठवण काढली. “जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्हाला बॅटिंग करता येते” असा टोला त्यांनी मारला. एकनाथ शिंदे यांनी हे वाक्य उच्चारताच व्यासपीठाखाली बसलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “आम्हालाही संधी मिळाली की, कॅच पकडता येतो हे लक्षात असूद्या” पवार यांच्या या हजरजबाबी उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित स्नेह भोजनाच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्व सदस्यांशी संवाद साधला. तेव्हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, अमोल काळे, प्रताप सरनाईक यासारख्या विविध पक्षातील नेत्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची जोडगोळी एकाच मंचावर आले होते.एकनाथ शिंदे काय म्हणाले?”मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटले जाते, या पंढरीला एका उंचीवर नेण्याचे काम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्व आजी माजी कार्यकारी मंडळ व पदाधिकाऱ्यांनी केले. आता पवार व शेलार पॅनल देखील या स्पर्धेत उतरले असून ते नक्कीच या असोसिएशनला एका नव्या उंचीवर नेतील” असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईतील ५१ मैदाने, बीकेसी येथील २२ एकर जागेवर क्रिकेट अकादमी सुरू करणे असे प्रश्नदेखील हे पॅनल नक्की सोडवेल असे सांगून या निवडणुकीत त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारने अखेर तो निर्णय घेतला मागे, १२ हजार कोटींचा बसणार होता फटका

शरद पवार काय म्हणाले?आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. राजकारणाचे सगळ्यांचे वेगळे विषय आहेत. आम्ही तिथं संघर्ष करु पण क्रीडा प्रकारात राजकारण बाहेर ठेवतो. मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरात असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून मिटींगला यायचे. तसंच हिमाचलतर्फे अनुराग ठाकूर यायचे. काँग्रेसचे राजीव शुक्ला यायचे. सांगायचं कारण म्हणजे आम्ही खेळात राजकारण आणत नाही. आता भविष्यात काही प्रोजेक्ट हातात घ्यायचे आहेत. यापूर्वी बीसीसीआयचं हेड क्वार्टर आणलं. आपण बसलेलो हॉल उभा राहिला, असं शरद पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले अमोल काळे एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. काळेंचा सामना माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य संदीप पाटील यांच्याशी होत आहे.

हेही वाचा : फडणवीसांना बायकोनं काहीही ट्वीट केलं तरी चालतं का?;अयोध्या पौळ यांचा हल्लाबोल

Related posts

हावरे प्रॉपर्टीजचा बोरिवलीमध्ये अभिनव आणि परवडणारा’ प्रकल्प सुरू .

Shivani Shetty

वेंकटेश्‍वर हॉस्पिटल, दिल्‍लीने मेडट्रॉनिक ह्युगो™ रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी सिस्टिमचा वापर करून यशस्‍वीरित्‍या पूर्ण केली पहिली युरोलॉजी शस्‍त्रक्रिया

Shivani Shetty

‘बॉर्न टू शाइन’ ने केली आपल्या ३० विजेत्यां मुलींची घोषणा!

Shivani Shetty

Leave a Comment