maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsNew electronic products launchठळक बातम्या

ऊषाची रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी, प्रीमिअम किचन अप्लायन्सेसची नवी आयशेफ रेंज सादर भारतभरातील निवडक रिलायन्स डिजिटल आऊटलेट्समध्ये पाच सर्वोत्कृष्ट उत्पादने उपलब्ध

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३: ऊषा इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्या ग्राहकोपयोगी ब्रँडने आपल्या आयशेफ या नव्या प्रीमिअम श्रेणीमध्ये पाच नाविन्यपूर्ण किचन अप्लायन्सेस सादर केली आहेत. मुंबईतील जुहूच्या जेव्हीपीडी स्कीम येथील रिलायन्स डिजिटलमध्ये ही नवी उत्पादने सादर करण्यात आली. मुंबईत अंधेरी, मालाड, जुहू, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कुर्ला पश्चिम, प्रभादेवी आणि घाटकोपर अशा ११ ठिकाणच्या रिलायन्स डिजिटल रिटेल स्टोअरमध्ये ही उत्पादने उपलब्ध असतील.
स्वयंपाकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कालातीत डिझाइनचा सुंदर मेळ असलेली ही उत्पादने आहेत. स्वयंपाकाचा अनुभव अधिक समृद्ध आणि सुंदर करण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण पर्यायांच्या शोधात असलेल्या आधुनिक ग्राहकांसाठी ही श्रेणी फारच उपयुक्त आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, मंगलोर, चंदिगढ, कानपूर, लखनऊ आणि विझाग अशा भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ही नव्याने सादर झालेली उत्पादने खास रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.

नव्याने सादर झालेली उत्पादने:
• आयशेफ स्टीम ओव्हन
• आयशेफ हीटर ब्लेंडर
• आयशेफ स्मार्ट एअर फ्रायर ५.५ ली.
• आयशेफ स्मार्ट एअर फ्रायर– डिजिटल ५ ली.
• आयशेफ प्रोग्रामेबल केटल

यातील प्रत्येक उत्पादन स्वयंपाकासाठी उत्कृष्ट पर्याय आहे. यामुळे ग्राहकांना आनंदाने, चविष्ट आणि पोषक स्वयंपाक बनवणे सहज शक्य आहे.
आयशेफ श्रेणी सादर करताना ऊषाच्या रिटेल आणि कंपनी शॉपचे वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन आनंद म्हणाले, “प्रीमिअम उत्पादने तसेच ग्राहकांना योग्य माहितीसह पौष्टिक पर्याय धुंडाळण्यात साह्य करेल असे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही ऊषाची बांधिलकी आहे आणि या नव्या उत्पादनांमुळे ही बांधिलकी अधोरेखित झाली आहे. रिलायन्स डिजिटलचे व्यापक अस्तित्व आणि देशभरातील दमदार पोहोच यामुळे या भागीदारीसाठी ते सर्वोत्कृष्ट पर्याय होते आणि त्यांच्यासोबत खास रिटेल पार्टनर म्हणून ही भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे.”
या सादरीकरणाप्रसंगी रिलायन्स डिजिटलचे प्रवक्ते म्हणाले, “भारतभरातील आमच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक आणि सर्वोत्कृष्ट असे तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आम्ही रिलायन्स डिजिटलमध्ये सातत्याने करत असतो. ऊषा आयशेफ श्रेणीच्या या खास सादरीकरणामुळे ग्राहकांना आता आमच्या स्टोअरमध्ये येऊन स्वयंपाकासाठीचे असे पर्याय पाहता येतील जे चविष्ट पदार्थांसोबत आरोग्यदायी जीवनशैलीचीही बांधिलकी जपतात.”

Related posts

क्वांटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर ऑफर

Shivani Shetty

मोबाइल एआय युगामध्‍ये आपले स्‍वागत आहे

Shivani Shetty

द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल

Shivani Shetty

Leave a Comment