maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

१५व्या ‘ब्राइड्स ऑफ इंडिया’ अभियानाचे अनावरण

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२५ : प्रत्येक भारतीय वधू तिच्यासोबत भावनांचे एक जग घेऊन जाते. त्यात तिच्या स्वतःच्या अनेक आठवणी असतात. ती ज्या रीतिरिवाजांना बघत मोठी झाली, ती ज्या संस्कृतीशी संबंधित आहे, ज्या आठवणी तिने हृदयाच्या जवळ जपल्या आहेत आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एकाची ओळख ठरतील असे दागिने, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिऱ्यांच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतातील समृद्ध, सांस्कृतिक वारशातील वधूच्या दागिन्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून समजून घेतले आहे. वधूच्या श्रेणीतील दागिन्यांमध्ये मलबार गोल्ड अँड डायमंड्सने विचारपूर्वक क्युरेट तसेच विकसित केलेले डिझाइन एकत्र आणले आहेत. ज्यामुळे प्रत्येक वधूच्या परंपरांचा आदर करणारे शुद्धता, हेतू आणि कारागिरीने तयार केलेले दागिने सुनिश्चित होतात. वधूच्या कारागिरीतील सखोल कौशल्यासह, ब्रँडने देशभरातील वधूंच्या विशिष्ट परंपरांचा आदर करणारे डिझाइन तयार करण्याचा एक अतुलनीय वारसा निर्माण केला आहे.

प्रार्थना बेहेरे, सिने अभिनेत्री म्हणाली,”महाराष्ट्रीयन विवाह हे अर्थपूर्ण प्रतीकांनी परिभाषित केले जातात नथ, मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, हे अलंकार आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे प्रतीक आहेत. या तपशीलांमध्ये सांस्कृतिक अभिमान आहे. हे सगळे तपशील ब्राइड्स ऑफ इंडियामध्ये अगदी बारकाईने उतरतात, आपल्या परंपरांचे सार अधोरेखित करते आणि आजच्या वधूशी नैसर्गिकरित्या जोडले जाऊ शकतील अशा डिझाइन सादर करते.”

एक महत्त्वाचा टप्पा गाठत, मलबार गोल्ड अँड डायमंड्सने आज त्यांच्या प्रमुख ब्राइड्स ऑफ इंडिया अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे अनावरण केले, जी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अपेक्षित ब्राइडल प्रॉपर्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या आवृत्तीत 22 वधू आणि 10 सेलिब्रिटी एकत्र आले प्रार्थना बेहेरे, आलिया भट्ट, करीना कपूर खान, एनटीआर, कार्ती, अनिल कपूर, श्रीनिधी शेट्टी, रुक्मिणी मैत्र, सब्यसाची मिश्रा आणि मानसी पारेख, हे सर्व या मोहिमेचा विस्तार, वैविध्य तसेच भावनिक खोली दर्शवते. शुभजीत मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. या जाहिरातीत भारताच्या वेगवेगळ्या भागातील वधू संस्कृतींचे सार टिपणारे तसेच प्रत्येक वधूच्या कथेला आकार देणाऱ्या विधि, भावना तसेच वारसा साजरे करणारे दृश्य आणि संगीतमय कथानक एकत्र आणले आहे.

श्री.एम.पी.अहमद, अध्यक्ष, मलबार गोल्ड अँड डायमंड्स म्हणाले,“दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ब्राइड्स ऑफ इंडिया उपक्रम म्हणजे या देशातील वधूंप्रति आमची कृतज्ञता आहे. आणि हे 15वे वर्ष तर आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपतानाच वधू परंपरेचा देखील कसा आदर करतात हे आम्ही अनेकदा अधोरेखित केले आहे. ही आवृत्ती त्या परंपरांची खोली दर्शवते – आठवणी, विधि आणि नातेसंबंध जे तिची ओळख आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता हमीसाठी मलबारची असलेली वचनबद्धता लक्षात घेता, प्रत्येक कुटुंबाला अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह दागिने निवडण्याचा आत्मविश्वास वाटावा अशी आमची इच्छा आहे.”

महाराष्ट्रीयन वधू शतकानुशतकांच्या जुन्या परंपरेला आधुनिकतेशी जोडते. खेळकर पण शांत, आनंद आणि गांभीर्य यांचे अनोखे मिश्रण त्यात दिसते. तिचा वारसा ती आत्मविश्वासाने पुढे नेत असते. मलबार गोल्ड अँड डायमंडचे दागिने तिच्या याच वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहेत – तेजस्वी, भावपूर्ण आणि मराठी वधूच्या कालातीत ओळखीचा सन्मान करण्यासाठी डिझाइन केलेले.

Related posts

मेटा आणि आयुष्‍मान खुराणा यांनी जनतेना ऑनलाइन घोटाळ्यांविरोधात सक्षम करण्‍यासाठी केली हातमिळवणी

Shivani Shetty

टाटा मोटर्सने सीएनजी श्रेणीमध्‍ये २१.१ टक्‍क्‍यांचा प्रभावी मार्केट शेअर संपादित केला

Shivani Shetty

कोका कोला इंडिया के किन्ले सोडा ने 1,500 करोड़ रुपये की उपलब्धि हासिल की, सोडा कैटेगरी में सबसे आगे

Shivani Shetty

Leave a Comment