maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

कोका कोलाच्या ‘लोकली युअर्स’सोबत भारताच्या रिटेल हिरोंचा गौरव

नवी दिल्ली, १ सप्टेंबर २०२५: स्थानिक किरकोळ विक्रेते सर्वप्रथम दुकान उघडून शेवटी बंद करणारे आणि अनेक दशकांपासून समाजजीवनाच्या केंद्रस्थानी उभे राहिले आहेत. ते आपल्या ग्राहकांना नावाने ओळखतात, उत्सवांसाठी माल पुरवतात आणि दुकानांना गप्पागोष्टी, कथा आणि परंपरांमध्ये रूपांतरित करतात. ‘लोकली युअर्स’ सह, कोका-कोला इंडिया समाजाची भरभराट करणाऱ्या या खऱ्या आयुष्यातील नायकांचा गौरव करते.

स्थानिक दुकानांपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत ते जगातील सर्वात मोठ्या रिटेल नेटवर्कला शक्ती देतात, लाखो लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ, सुविधा आणि सामाजिक नाते देतात. लोकली युअर्सच्या माध्यमातून कोका-कोला इंडिया या उद्योजक भागीदारांचा गौरव करते जे उदरनिर्वाहाचे साधन मजबूत करण्यात, स्थानिक व्यवसायाला चालना देण्यात आणि कायम सामाजिक भावना जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
अनेक भागीदारांसाठी कोका-कोला हे फक्त एक शीतपेय नाही तर त्यांच्या वाढीच्या प्रवासात एक साथीदार राहिले आहे. कंपनीशी २००२ पासून संलग्न असलेले वितरक अजय साहा म्हणाले की, ‘हा दोन दशकांहून अधिक काळाचा एक अतिशय फायदेशीर प्रवास आहे. कोका-कोला इंडियासोबतची आमची भागीदारी मागील काही वर्षांत अधिक पक्की झाली आहे. कंपनीचे सातत्यपूर्ण पाठबळ आणि मार्गदर्शन आमच्या व्यवसायाला चालना देण्यात आणि समाजाची चांगली सेवा करण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.’ या भावनेला जोडणारे ओडिशातील २५ वर्षे जुन्या पारंपरिक मिठाईच्या दुकानाचे मालक राजेश कुमार राणा म्हणाले, ‘कोका-कोला इंडिया आमच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आमच्या दुकानात आम्ही फक्त पारंपरिक मिठाईच देत नाही तर आमच्या पाहुण्यांना त्यांच्या आवडत्या पेयांचा – कोका-कोला, स्प्राइट, थम्स अप आणि पाणी अशा गोष्टींचा आनंद मिळावा याची खात्री करतो. त्यांना हवे असलेले सर्व मिळेल, याची आम्ही खात्री करतो.
कोका-कोला इंडियाचे उपाध्यक्ष संदीप बाजोरिया म्हणाले, “भारतातील रिटेल ही केवळ सर्वात मोठी साखळी नाही तर स्थानिक आर्थिक चक्राचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. कोका-कोलामध्ये आम्ही नेहमीच किरकोळ विक्रेत्यांसोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून ग्राहकांना चांगली सेवा मिळेल आणि या विक्रेत्यांच्या क्षमताही बळकट होतील. व्यापारी संस्था आणि स्थानिक आस्थापनांसोबत काम करून आणि कूलर व फाउंटन मशीनमध्ये गुंतवणूक करून आम्ही क्षमता निर्माण करत राहतो आणि उद्योजकतेला चालना देतो. सुपरपॉवर रिटेलर प्रोग्राम आणि कोक बडी अशा उपक्रमांद्वारे आम्ही किरकोळ विक्रेत्यांची ताकद वाढवण्यासाठी नवनवीन कौशल्ये आणि डिजिटल साधनांनी सुसज्ज करत आहोत. लोकली युअर्ससोबत आम्ही त्यांची उद्योजकीय भावना, समुदाय निर्माते म्हणून त्यांची भूमिका आणि दैनंदिन जीवनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान साजरे करत आहोत.”
लोकली युअर्स या रोजच्या आयुष्यातील नायकांचे प्रदर्शन त्यांची वचनबद्धता, वारसा आणि उद्योजकीय भावनेचे चित्रण करणाऱ्या पोर्ट्रेट आणि चित्रपटांच्या मालिकेद्वारे प्रदर्शित करेल. काउंटरमागील लोकांना प्रकाशझोतात आणून ही मोहीम भारताच्या रिटेल अर्थव्यवस्थेला दीर्घकाळ चालना देणाऱ्या लवचिकता, नावीन्य आणि सामाजिक अभिमानाच्या कथा पुढे आणते.
देशभरातील सहा दशलक्षाहून अधिक रिटेल विक्रेते आणि वितरकांच्या नेटवर्कसह, कोका-कोला इंडिया भारतातील सर्वात महत्त्वाच्या रिटेल इकोसिस्टमपैकी एक आहे. दुकानातील शेल्फपासून ते घरापर्यंत प्रत्येक संवाद फक्त व्यवहार नाही तर ती एक सामाजिक बांधिलकी, एक संधी आणि भारताच्या उद्यमशीलतेच्या भावनेचा गौरव आहे.

Related posts

सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीज लाँच, किंमत ४२९९९ रूपयांपासून

Shivani Shetty

भारतातील स्‍पोर्टस् हायड्रेशनमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत लिम्‍काकडून लिम्‍का स्‍पोर्टझ आयन४ (ION4) लाँच

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतात क्‍लासी वेगन लेदर डिझाइन, सुपर एएमओएलईडी+ डिस्‍प्‍ले आणि शक्तिशाली स्‍नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेला गॅलॅक्‍सी एफ५५ ५जी लाँच

Shivani Shetty

Leave a Comment