maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

तैवान एक्‍सलन्‍सकडून ऑटोमेशन एक्‍स्‍पो २०२५ मध्‍ये अत्‍याधुनिक स्‍मार्ट आणि हरित उत्‍पादन सोल्‍यूशन्‍सचे प्रदर्शन

मुंबई, ऑगस्‍ट ४, २०२५ – तैवान एक्‍सलन्‍स ऑटोमेशन एक्स्पो २०२५ (११-१४ ऑगस्ट, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई)मध्ये २२ पुरस्कार विजेते ब्रँड्स आणि ४४ अग्रणी औद्योगिक सोल्‍यूशन्‍सना प्रदर्शित करेल, जे भारताच्या हरित आणि डिजिटल उत्पादन क्रांतीमध्ये तैवानच्या धोरणात्मक भूमिकेला दृढता देईल. ‘ग्रीन व्हिजन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग’ (हरित दृष्टिकोन, स्‍मार्ट उत्‍पादन) या संकल्पनेअंतर्गत होणाऱ्या या प्रदर्शनात एआय-संचालित ऑटोमेशन, शाश्वत धातूकाम तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री ४.०-सुसज्‍ज रोबोटिक्सचा समावेश आहे, ज्‍याचा भारतातील उद्योगांमध्ये उत्पादकता, ऊर्जा कार्यक्षमता व ईएसजी कामगिरी वाढवण्याचा मनसुबा आहे.

तैवानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे (एमओईए) पाठबळ असलेले तैवान एक्सलन्स हे जागतिक स्तरावर आदरणीय प्रमाणन आहे, जे संशोधन व विकास, डिझाइन, गुणवत्ता आणि बाजारपेठ व्यवहार्यता या क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादनांना मान्यता देते. या वर्षीचे पॅव्हेलियन तैवान-भारत औद्योगिक सहयोग वेगाने वाढत असताना आले आहे, जेथे २०२४ मध्ये ऐतिहासिक १०.६ अब्ज यूएस डॉलर्स द्विपक्षीय व्यापार आणि पुरवठा साखळी व मानवी भांडवल संबंध मजबूत करण्यासाठी प्रस्तावित कामगार गतिशीलता करार करण्‍यात आला होता.

रोबोटिक झोन, लाइव्‍ह डेमो आणि भारत-केंद्रित सोल्‍यूशन्‍स अग्रस्‍थानी
या वर्षी नवीन वैशिष्ट्य तैवान रोबोटिक झोनमध्ये हायविन, लीनटेक, टेकमॅन रोबोट (HIWIN, LEANTEC, TECHMAN ROBOT) आणि इतर आघाडीच्या उत्पादकांकडून अत्याधुनिक मानव-रोबोटिक सहयोग व स्मार्ट फॅक्टरी सक्षम करणारे घटक प्रदर्शित केले जातील. या प्रत्यक्ष प्रदर्शनाचा मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि हरित औद्योगिकीकरणाच्या दिशेने भारताच्या महत्त्वाकांक्षांशी संलग्‍न वास्तविक विश्वातील उपयोजनांना दाखवण्‍याचा मनसुबा आहे.

११ ऑगस्ट रोजी तैवान एक्सलन्स पत्रकार परिषद भारत-केंद्रित नाविन्‍यतेसाठी केंद्र म्हणून काम करेल, ज्यामध्ये पाच प्रमुख ब्रँड्स टेकमॅन रोबोट, टोयो, अॅडवान्‍टेक, डीएफआय आणि आयसीपी डीएएस भारतातील बाजारपेठेसाठी डिझाइन केलेले त्यांचे आधुनिक सोल्‍यूशन्‍स सादर करतील. ठळक वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

• अंदाजात्‍मक देखभालीसाठी एआय-एकीकृत नियंत्रण यंत्रणा
• ईएसजी-सुसज्‍ज देखरेख प्‍लॅटफॉर्म्‍स
• स्‍मार्ट असेम्‍ब्‍ली लाइन्‍ससाठी मॉड्युलर रोबोटिक्‍स
• कमी कार्बन उत्‍सर्जनासह कार्यसंचालनांसाठी शाश्वत ऊर्जा आणि एज कम्‍प्‍युटिंग डिवाईसेस

भारतासाठी धोरणात्‍मक सहयोगी म्‍हणून तैवानची औद्योगिक परिसंस्‍था
जगभरातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारत प्रगत उत्पादन क्षमता वाढवत असताना सेमीकंडक्टर, औद्योगिक पीसी, एआयओटी आणि ऑटोमेशन असलेली तैवानची मजबूत परिसंस्था चाचणी केलेले, विकासात्‍मक आणि शाश्वतता-संलग्‍न सोल्‍यूशन्‍स देते. ऑटोमेशन एक्स्पोमध्ये तैवान एक्सलन्सच्‍या सहभागामधून त्‍यांची तंत्रज्ञान प्रदाता, तसेच इंडस्‍ट्री ४.० मध्‍ये भारताच्‍या झेपेला पाठिंबा देणारी दीर्घकालीन नाविन्‍यता सहयोगी म्‍हणून देखील त्‍यांची भूमिका निदर्शनास येते.

Related posts

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा आणि आयआयटी बॉम्‍बेने डिजिटल हेल्‍थ, एआय व इतर उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील संशोधनाला चालना देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

Shivani Shetty

मामि फेस्टिवल मध्ये जिओ स्टुडिओजच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन मराठी चित्रपटांचा बोलबाला!

Shivani Shetty

सोनारी लाँजरीचे नवीनतम कलेक्शन

Shivani Shetty

Leave a Comment