मुंबई, 31 जुलै 2025: भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉइनस्विचनेआज आपल्या प्रमुख अहवालाच्या Q2 2025 आवृत्तीचे अनावरण केले – ‘इंडियाजक्रिप्टो पोर्टफोलिओ: हाऊ इंडिया इन्व्हेस्ट्स’. २ कोटींहून अधिक वापरकर्त्यांच्याव्यवहारांवर आधारित या अहवालात भारतातील वेगाने बदलणाऱ्या क्रिप्टोइकोसिस्टीमचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. यात प्रादेशिक गुंतवणुकीचीस्थिती, गुंतवणूकदारांचा कल आणि लोकप्रिय डिजिटल अॅसेट्स यांचा आढावाघेतला आहे.
अहवालानुसार, 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2) भारतातील क्रिप्टो गुंतवणुकीच्यानकाशावर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर होती, ज्याने देशातील एकूण क्रिप्टोगुंतवणुकीत 5.2% वाटा उचलला.
कॉइनस्विचचे उपाध्यक्ष बालाजी श्रीहरी म्हणाले, “Q2 2025 ही जागतिकपातळीवर क्रिप्टोसाठी क्रांतिकारी तिमाही ठरली आहे, आणि भारतही त्यालाअपवाद नाही. बिटकॉईन $123,000 च्या वर पोहोचणे, पश्चिमेकडील धोरणात्मकबदल आणि वाढता गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास – या सर्वांनी एकत्र येऊनसहभागात मोठी वाढ घडवली आहे. भारतात क्रिप्टो आता मुख्य प्रवाहात येत आहे, आणि जास्तीत जास्त गुंतवणूकदारांचे वॉलेट्स सध्या नफ्यात आहेत, हे याइकोसिस्टीमने किती प्रगती केली आहे, याचे द्योतक आहे. भारतीय गुंतवणूकदारआता संतुलित पोर्टफोलिओ तयार करत आहेत – बिटकॉईन (BTC) आणिइथेरियम (ETH) सारख्या ब्ल्यू–चिप अॅसेट्सपासून ते मीम आणि गेमिंगटोकन्ससारख्या धाडसी गुंतवणुकीपर्यंत. गती खऱ्या अर्थाने आहे, स्वीकार वाढतआहे, आणि त्यामुळे भारत जागतिक स्तरावर सर्वात गतिमान क्रिप्टो बाजारांपैकीएक बनत आहे,” त्यांनी नमूद केले.
मुंबईतील क्रिप्टो गुंतवणूकदारस्पष्टपणे मजबूत आणि सिद्धझालेल्या टोकन्सना प्राधान्यदेतात. Q2 2025 मध्ये, गुंतवणूकदारांच्यापोर्टफोलिओपैकी 70.67% वाटाब्ल्यू–चिप (38.80%) आणि लार्ज–कॅप (31.87%) टोकन्समध्ये होता, ज्यातून स्थैर्यआणि दीर्घकालीन मूल्याकडे असलेला कल दिसून येतो. मिड–कॅप टोकन्सचा वाटा24.47% होता, तर स्मॉल–कॅप टोकन्स केवळ 4.86% होते, ज्यातूनउच्च–जोखमीच्या गुंतवणुकीबाबतचा सावध दृष्टिकोन स्पष्ट होतो.
टोकन श्रेणींच्या बाबतीत, लेयर–1 टोकन्स 44.10% वाट्यासह गुंतवणूकदारांच्यापसंतीत अव्वल होते, त्यानंतर मीम कॉइन्स 19.63% आणि डिफाय (DeFi) टोकन्स 11.40% होते. यावरून दिसून येते की मुंबईतील गुंतवणूकदार मुख्यतः मूळब्लॉकचेन प्रकल्पांवर विश्वास ठेवतात, पण ट्रेंडिंग विभागांवरही लक्ष ठेवतात.
मुंबईत 63.07% पोर्टफोलिओ सध्या नफ्यात असून, स्थिरता, विश्वासार्हता आणिनिवडक वाढीवर आधारित रणनीतीमुळे शहर भारतातील सर्वोत्तम कामगिरीकरणाऱ्या क्रिप्टो बाजारांपैकी एक राहिले आहे.
महत्त्वाचे राष्ट्रीय कल: भारताचे क्रिप्टो पोर्टफोलिओ एका दृष्टीक्षेपात
लोकसंख्याशास्त्र आणि स्वीकार
गुंतवणुकीतील पसंती
मार्केट कॅप आणि टोकन ट्रेंड्स
ट्रेडिंग पॅटर्न्स
About CoinSwitch
Founded in 2017, CoinSwitch is India’s largest crypto trading platform and a pioneer in shaping the country’s crypto ecosystem. With over 2 crore users, CoinSwitch operates a regulatory-compliant platform that simplifies and enhances crypto trading for both retail and professional investors.
Backed by global investors such as Coinbase Ventures, Tiger Global, and Sequoia Capital India to the tune of $300 million, CoinSwitch offers 350+ coins on its platform. CoinSwitch is ISO/IEC 27001:2022 certified and Financial Intelligence Unit – India (FIU- IND) registered.
For more information, visit: www.coinswitch.co

