maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

द बर्गर कंपनीची देशभरात १५० आउटलेट्स

मुंबई, ३१ जुलै २०२५: भारतातली आघाडीची स्वदेशी बर्गर आणि क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) साखळी ‘द बर्गर कंपनी’ ने देशभरात १५० हून अधिक आउटलेट्सचा टप्पा पार केला आहे. भारतीय चवीला जागतिक क्यूएसआर मानकांशी जोडत ‘देशी लोकांसाठी देशी बर्गर’ हे ब्रँडचं तत्त्व जपत,बजावलेली ही महत्त्वपूर्ण कामगिरी ब्रँडची वचनबद्धता अधोरेखित करते. २०२७ पर्यंत २५० आउटलेट्स सुरु करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

२०१८ मध्ये गुरुग्राममधील पहिल्या आउटलेटपासून सुरू झालेला कंपनीचा हा प्रवास, आज देशभरातील टियर-१ महानगरांपासून ते कोलार, गुवाहाटी, जौनपूर आणि जगदलपूरसारख्या टियर-४ शहरांपर्यंत पोहोचला आहे. लहान शहरांमध्ये ‘बर्गरचं सम्राज्य’ उभं करणारी ही एक यशोगाथा आहे.

*संस्थापक आणि सीईओ नीलम सिंह* यांनी सांगितले की, “१५० आउटलेट्सचा टप्पा पार करणं ही आमच्या भारतीय क्यूएसआर अनुभवाला नवं परिमाण देण्याच्या धोरणाची मोठी पावती आहे. हा टप्पा आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या फ्रँचायझी भागीदारांच्या समर्पणाचं प्रतीक आहे. 2027 पर्यंत 250 आउटलेट्स उघडण्याचा आमचा संकल्प आहे, विशेषतः टियर-3 आणि टियर-४ शहरांमध्ये नाविन्यपूर्ण, अधिक दर्जेदार जेवणाचा अनुभव पोहोचवण्यावर आमचा भर राहील.”

गुरुग्रामस्थित या बर्गर साखळीचा हा प्रवास देशी-फर्स्ट मेनू, जसे की तंदूरी पनीर बर्गर, ९५% फ्रँचायझी-आधारित व्यवसाय मॉडेल आणि दर्जा कायम राखणारी ऑपरेशनल कार्यक्षमता यांसारख्या धोरणात्मक घटकांवर आधारलेला आहे. द बर्गर कंपनीने दरवर्षी ३५% विक्री वाढ, प्रत्येक आउटलेटमध्ये सरासरी ८०-१०० ग्राहकांचे रोजचे आगमन आणि ४४% पुनरागमन करणाऱ्या ग्राहकांची संख्या अशी महत्त्वाची आकडेवारी दिली आहे. उत्तर भारतात (८०+) आउटलेट्स, पश्चिमेत (३०+), दक्षिणेत (२५) आणि पूर्व भारतात (१५) आउटलेट्ससह कंपनीने देशभरात आपली छाप सोडली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या गुवाहाटी आणि जगदलपूरमधील आउटलेट्सनी ६० दिवसांपेक्षा कमी वेळात नफा कमावण्यास सुरुवात केली आहे.

द बर्गर कंपनीचं यश युवकांना आकर्षित करणाऱ्या ब्रँडिंग, सर्व प्लॅटफॉर्मवर उपस्थिती, आणि झोमॅटो, स्विगी यांसारख्या अ‍ॅग्रीगेटर प्लॅटफॉर्म्ससोबतच्या भागीदारीवर आधारित आहे – जिथे त्यांचं रेटिंग सातत्याने ४.१ च्या वर आहे. आगामी योजनांमध्ये कंपनी नवीन उत्पादनं आणण्याची आणि देशभरात आपला ठसा अधिक मजबूत करण्याची दिशा ठरवून पुढे जात आहे.

Related posts

‘नाईशा’च्या ट्रेलरमध्ये भारतातील पहिले एआय संचालित सिनेस्टार्स

Shivani Shetty

मेटाकडून GenAI च्‍या माध्‍यमातून भारतातील ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेमध्‍ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी एनएलएसआययू – आयआयटी बॉम्‍बे रिसर्च प्रोजेक्‍टला मदतीचा हात

Shivani Shetty

कोका-कोलाच्‍या लिमिटेड-एडिशन पॅकेजिंगवर मार्वल युनिव्‍हर्स 

Shivani Shetty

Leave a Comment