maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

अपोलोचा ‘बीकाईन्ड’ उपक्रम

नवी मुंबई, २९ जुलै २०२५ – आजच्या युगात प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर दिला जात असताना, अपोलो हॉस्पिटल्सने मानवी करुणेकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे, कारण कोणत्याही आजारातून बरे होण्यामध्ये मानवी करुणा सर्वात मोलाची भूमिका बजावत असते. तब्येत बरी होणे हे केवळ क्लिनिकल उत्कृष्टतेपुरते मर्यादित नसते, हा आपला सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने ‘बीकाईन्ड’ ची सुरुवात केली आहे. अतुलनीय सहानुभूती, सखोल समज आणि प्रत्येक व्यक्तीचा मनःपूर्वक पाठिंबा यांचे वचन या उपक्रमातून देण्यात येत आहे.

अपोलोच्या ‘बीकाईन्ड’ उपक्रमामध्ये प्रतीकात्मक कौतुकाच्या पलीकडे जाऊन, आरोग्य देखभाल सेवा प्रोफेशनल्सच्या भावनिक मेहनतीचा सन्मान केला जातो. ऑपरेटिंग रूम्सपासून हॉलवेजपर्यंत सर्वत्र प्रत्येक संवाद, संबंध आणि कामामध्ये सहानुभूती, संघभावना आणि एकमेकांच्या स्वाभिमानाची जपणूक करणारे वातावरण निर्माण करण्याची रुग्णालयाची बांधिलकी यामधून प्रदर्शित केली जाते. ‘बीकाईन्ड’ उपक्रम आपल्याला कायम अशा वातावरणाची आठवण करून देत राहील जे स्नेह आणि काळजीने परिपूर्ण असेल, जे रुग्णांची सर्वोत्तम संभव देखभाल करण्यासाठी आवश्यक आहे.

डॉ प्रीता रेड्डी, एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेयरपर्सन, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या,”अपोलोमध्ये ‘बीकाईन्ड’ ही जीवन पद्धती आहे. टेंडर लव्हिंग केयर (टीएलसी) चा आमचा दीर्घकाळापासून चालत आलेला वारसा यामध्ये अधोरेखित केला जातो. आरोग्य देखभाल सेवांमध्ये करुणेने केली जाणारी प्रत्येक कृती ही रुग्णाला बरे करणारी मूक शक्ती ठरते. प्रत्येक डायग्नोसिसच्या मागे एक अशी व्यक्ती असते जिला पाहिले, ऐकले आणि सन्मानाने वागवले जाणे आवश्यक असते. जेव्हा देखभाल सेवा करुणेने प्रदान केली जाते तेव्हा ती प्रत्येक रुग्णाच्या मनात विश्वास आणि भावनिक सुरक्षा निर्माण करते.”

अपोलोच्या व्हॅल्यूज कॅम्पेनचा एक भाग म्हणून प्रकाशित करण्यात आलेल्या या फिल्ममध्ये एक खूप साधा पण प्रभावी संदेश देण्यात आला आहे, हॉस्पिटलमध्ये नर्स, अटेंडंट, हाऊसकीपिंग कर्मचारी यांच्यामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाणारी करुणा आणि सहानुभूतीपूर्ण कृती जोवर वर्तुळ पूर्ण करून पुन्हा-पुन्हा आधीच्या व्यक्तीकडे येत राहते.या बऱ्याच वेळा दुर्लक्षिल्या जाणाऱ्या सत्याकडे दर्शकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम ही फिल्म करते.

डॉ.मधु शशिधर, अध्यक्ष-सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“आर्टिफिशियल इंटेलिजेंस निदान आणि उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे, अशा आजच्या काळात ‘बीकाईन्ड’ आपल्याला हळुवारपणे आठवण करून देते की खरे उपचार तंत्रज्ञानाच्या पलीकडे आहेत. आजारपणाच्या क्षणी, लोकांना फक्त त्यांना मिळालेले उपचारच आठवत नाहीत तर त्यांना उपचार घेत असताना कशी वागणूक मिळाली, त्यांना कसे वाटले हे देखील लक्षात राहते. ‘बीकाईन्ड’ हे आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या गाभ्याला सहानुभूती देण्याच्या अपोलोच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कारण आरोग्यसेवेत, करुणा ही अतिरिक्त गोष्ट नाही; तर आवश्यक आहे.’एम्पथी इन अॅक्शन’ हा चित्रपट सांगतो की प्रत्येक यशामागे, आपली सर्वात मोठी ताकद मानवी आहे.”

‘बीकाईन्ड ‘ फिल्म पाहण्यासाठी लिंक : https://youtu.be/WDY7ZMnUK94?si=1JIqb8cPpczXmH07

Related posts

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

Shivani Shetty

पर्नोड रिकार्ड इंडियाकडून ग्रामीण परिवर्तनाला चालना

Shivani Shetty

मॅरियट इंटरनॅशनलकडून नवीन प्रादेशिक कलेक्‍शन ब्रँड ‘सिरीज बाय मॅरियट™️’च्‍या जागतिक लाँचची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment