maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपची तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाइन ट्रॅव्‍हल प्लॅटफॉर्मने आपली प्रबळ आर्थिक कामगिरी कायम ठेवली आहे, जेथे कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष २४ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी वार्षिक १८.१ टक्‍क्यांच्‍या वाढीसह १,६०७.९ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए वार्षिक १०.९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ६५३.७ दशलक्ष रूपयांवर पोहोचला, तर करोत्तर नफा वार्षिक ९.५ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ४५६.६ दशलक्ष रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २४ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी ग्रॉस बुकिंग रेव्‍हेन्‍यू २०,२६०.७ दशलक्ष रूपये आहे.

यशस्‍वी तिमाहीनंतर इझमायट्रिपने इको हॉटेल्‍स अॅण्‍ड रिसॉर्ट्समध्‍ये अंदाजे १३ टक्‍के हिस्‍सा संपादित केला, ज्‍यामुळे ऑनलाइन ट्रॅव्‍हल सेवांव्‍यतिरिक्‍त कंपनीच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आली. हे पाऊल पर्यटन व आदरातिथ्‍य क्षेत्रात पर्यावरणास अनुकूल पद्धतींना चालना देत ऑर्गनिक व इन-ऑर्गनिक विकास आणि शाश्‍वततेप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न आहे.

आर्थिक कामगिरीसंदर्भात आर्थिक वर्ष २४ च्‍या नऊमाहीसाठी कार्यसंचानांमधून महसूल वार्षिक २८.४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ४,२६५.३ दशलक्ष रूपये होता. ईबीआयटीडीए वार्षिक १७.९ टक्‍के वाढीसह १,७०५.२ दशलक्ष रूपये राहिला आणि करोत्तर नफा वार्षिक १५.३ टक्‍के वाढीसह १,१८८.६ दशलक्ष रूपये राहिला. या प्रबळ कामगिरीमधून इझमायट्रिपची सातत्‍यपूर्ण प्रगती दिसून यते आणि उद्योगामधील काही लाभदायी आधुनिक टेक कंपन्‍यांपैकी एक म्‍हणून कंपनीचे स्‍थान अधिक दृढ होते.

आर्थिक वर्ष २४ च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये एअर बुकिंग्‍जची एकूण आकडेवारी (निव्‍वळ कॅन्‍सेलेशन्‍स) २२.६ लाखांवर पोहोचली. त्‍याचप्रमाो, हॉटेल नाइट बुकिंग्‍ज आणि इतर बुकिंग्‍ज अनुक्रमे ९१,९१५ व २.७ लाख होते. आर्थिक वर्ष २४ च्‍या नऊमाहीसाठी एअर तिकिट विक्री (निव्‍वळ कॅन्‍सेलेशन्‍स) ८३.७ लाख होती. तसेच, ३.८ लाख हॉटेल नाइट बुकिंग्‍ज आणि ७.७ लाख इतर बुकिंग्‍ज होत्‍या.

Related posts

महाराष्ट्राची माधुरी पाटले बनली ‘मिसेस युनिव्हर्स इंडिया २०२३’

Shivani Shetty

हिरो मोटोकॉर्पच्‍या करिझ्मा एक्‍सएमआरला मिळाला १३,६८८ बुकिंग्‍जचा प्रतिसाद

Shivani Shetty

येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसह लक्‍झरी राहणीमानाला भारतीयांची पसंती: हाऊसिंग डॉटकॉम

Shivani Shetty

Leave a Comment