maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतीय पर्यटक आता व्हिएतजेटच्‍या एक्‍सक्‍लुसिव्‍ह प्रमोशन ऑफर्ससह व्हिएतनाममधील अद्भुत पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात

(मुंबई, ६ डिसेंबर २०२३) – व्हिएतजेट या व्हिएतनाममधील आघाडीच्‍या आधुनिक विमानवाहतूक कंपनीला आगामी प्रमोशनल सेलची घोषणा करताना आनंद होत आहे. या सेलअंतर्गत भारतापासून व्हिएतनामपर्यंत अद्वितीय डील्‍सचा समावेश आहे. या मर्यादित कालावधीच्‍या ऑफरसह पर्यटक फक्‍त ५,५५५* रूपयांमध्‍ये एकमार्गी तिकिट खरेदी करू शकतात. 

हे प्रमोशन ६ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत असणार आहे, या सवलतीच्‍या तिकिटांसाठी प्रवास कालावधी ५ जानेवारीवरून ३१ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत वाढवण्‍यात येईल. तसेच, आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सची बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना वेबसाइट https://www.vietjetair.com/en ला किंवा मोबाइल अॅपला भेट देत १७१४ रूपये किंमतीचे (जवळपास ५००,००० व्‍हीएनडी) ई-वाऊचर देखील मिळेल. 

एअरलाइन एकूण ३५ साप्‍ताहिक राऊंड-ट्रिप फ्लाइट्स ऑपरेट करते, ज्‍यामधून प्रमुख भारतीय शहरे – नवी दिल्‍ली, मुंबई, अहमदाबाद, कोची व तिरूचीरापल्‍ली येथून व्हिएतनामधील शहरे – हनोई व हो ची मिन्‍ह सिटी यांना जोडणाऱ्या फ्लाइट्सच्‍या सर्वात मोठ्या नेटवर्कची सुविधा दिली जाते.  

व्हिएतनाम दशकापासून कार्यरत असण्‍यासह व्हिएतनामपासून आशिया व ऑस्‍ट्रेलियासह इतर देशांना जोडणाऱ्या १२५ मार्गांवर दररोज जवळपास ४५० फ्लाइट्सची सुविधा देते. एअरलाइनच्‍या आंतरराष्‍ट्रीय नेटवर्कमध्‍ये भारत, ऑस्‍ट्रेलिया, ईशान्‍य आशिया (जपान, दक्षिण कोरिया, तैवान, हॉंगकॉंग व मेनलॅण्‍ड चीन), आग्नेय आशिया आणि कझाकस्तान येथील गंतव्‍यांचा समावेश आहे. 

(*) अटी व नियम लागू.        

 

Related posts

वझीरएक्स एक्सचेंजकडून टोकनफायचा समावेश

Shivani Shetty

क्रेडाई-एमसीएचआय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाश्वततेसाठी वचनबद्ध आहे; दहा लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करून पर्यावरण संवर्धनासाठी फिनिक्स फाऊंडेशनला पाठिंबा

Shivani Shetty

कपिल शर्मा आणि अनुराग कश्‍यप यांनी स्‍प्राइटच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात मजेदार सीझनमध्‍ये धमाल केली

Shivani Shetty

Leave a Comment