maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोका-कोलाकडून आइस्‍ड ग्रीन टी ‘ऑनेस्‍ट टी’ लाँच

ऑर्गनिक ग्रीन टीपासून तयार करण्‍यात आलेली ही ग्रीन टी लक्ष्‍मी ग्रुपच्‍या मालकीच्‍या मकाईबारी टी इस्‍टेटमधून मिळवली आहे
ग्राहकांना अधिकाधिक पेय पर्याय प्रदान करण्‍यासाठी कोका-कोला इंडियाने कोका-कोला कंपनीची उपकंपनी ऑनेस्‍ट, इन्‍क.च्‍या मालकीचा ब्रॅण्‍ड ऑनेस्‍ट टीच्‍या लाँचसह रेडी-टू-ड्रिंक चहा पेयांच्‍या क्षेत्रात प्रवेश केला. ऑनेस्‍ट टी रिफ्रेशिंग, ऑर्गनिक ग्रीन टी आधारित पेय आहे. ऑनेस्‍ट टीसाठी ऑर्गनिक ग्रीन टी विशेषत: लक्ष्‍मी ग्रुपच्‍या प्रसिद्ध मकाईबारी टी इस्‍टेटमधून मिळवली आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तीव्र उतारावर वसलेले मकाईबारी हे दार्जिलिंगमधील सर्वात जुने ऑर्गेनिक चहाचे मळे आहेत. मकाईबारी येथे, बायोडायनॅमिक कृषी वातावरणात चहा काळजीपूर्वक निवडला जातो, जो दुर्मिळ चंद्रप्रकाशात खुडल्‍या जाणा-या चहासाठी प्रसिद्ध आहे.
”दार्जिलिंगमध्ये मकईबारीपेक्षा मोठा चहाचा मळा नाही. जपान किंवा इंग्‍लंड असो किंवा राजघराणे असो सर्वांसाठी हा चहा सर्वोत्तम आहे,” असे कोलकाता-स्थित लक्ष्‍मी ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक रूद्र चॅटर्जी म्‍हणाले. ”सत्‍यजित रे यांनी त्‍यांचे काल्‍पनिक गुप्‍तहेर पात्र फेलुदासाठी याच चहाची निवड केली आहे.”
या नवीन लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या हायड्रेशन, कॉफी व चहा विभागाच्‍या विपणनाचे संचालक कार्तिक सुब्रमण्‍यम म्‍हणाले, ”आम्‍हाला आमची नवीन रेडी-टू-ड्रिंक आइस्‍ड ग्रीन टी सादर करण्‍याचा आनंद होत आहे. ऑनेस्‍ट टीसह आम्‍ही ग्राहकांना उत्तम स्‍वादिष्‍ट ग्रीन टी आधारित पेयाचा खास अनुभव देत आहोत. तुम्‍ही प्रवास करत असा किंवा शांतमय क्षणाचा शोध घेत असा ‘ऑनेस्‍ट टी’ रिफ्रेशमेंट व छान स्‍वाद देणारी परिपूर्ण सोबती आहे.”
ग्राहकांच्‍या विविध चवींनुसार ऑनेस्‍ट टी लेमन-तुलसी व मँगो या दोन रिफ्रेशिंग फ्लेवर्समध्‍ये येते. संतुलित जीवनशैली जगण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आजच्‍या आधुनिक महिला व पुरूषांसाठी हे नवीन लाँच करण्‍यात आलेले पेय आइस्‍ड ग्रीन टीच्‍या प्रत्‍येक सिपसह ‘मोमेण्‍ट ऑफ गुड’चा अनुभव देते. निसर्गाशी सुसंगत राहत उत्‍पादित करण्‍यात येणाऱ्या ऑर्गनिक ग्रीन टीपासून तयार करण्‍यात आलेली ऑनेस्‍ट टी उत्तम स्‍वाद देते आणि उत्तम दर्जाच्‍या चहाच्‍या पानांपासून बनवण्‍यात आली आहे.
ऑनेस्‍ट टी बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, चेन्‍नई व पुणे येथे ई-कॉमर्सवर लाँच करण्‍यात आली आहे आणि ५० रूपयांच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल. अधिक माहितीसाठी ऑनेस्‍ट टीचे इन्‍स्‍टाग्राम पेज – @honestteaindia ला भेट द्या.

Related posts

इंटरफेस व्हेंचर्सची एमईडीसीसह हातमिळवणी

Shivani Shetty

भांडुप पश्चिमेकडील ३ एकर जमीन आर्केड डेव्हलपर्स लि.ने कॉपर रोलर्स प्रा.लि.कडून १०३.८८ कोटींना विकत घेतली

Shivani Shetty

पेपरफ्राय ‘होम बीट’ अहवालात फर्निचर आणि गृहोपयोगी वस्तूंचे टॉप ट्रेंड्स उघड

Shivani Shetty

Leave a Comment