maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इक्सिगोची आंतरराष्‍ट्रीय प्रवासाकरता ‘इक्सिगो अशुअर्ड’ सेवा

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३: आघाडीचे ट्रॅव्‍हल व्‍यासपीठ इक्सिगोने निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जसाठी प्रतिष्ठित मोफत कॅन्‍सलेशन फीचर ‘इक्सिगो अशुअर्ड’ लाँच केले आहे. इक्सिगो अशुअर्ड कोणत्‍याही कारणास्‍तव प्रवाशांनी फ्लाइट बुकिंग रद्द केल्‍यास कोणतेही प्रश्‍न न विचारता संपूर्ण परताव्‍याची हमी देते. यापूर्वी इक्सिगो अशुअर्ड देशांतर्गत फ्लाइट बुकिंग्‍जसाठी ३९९ रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीपासून उपलब्‍ध होते. आता, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्ससाठी इक्सिगो अशुअर्डच्‍या सादरीकरणासह वापरकर्ते प्रतिप्रवासी ५९९ रूपयांपासून त्‍यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय प्रवास योजनांसाठी त्‍याच स्‍वरूपाच्‍या संरक्षणाचा आनंद घेऊ शकतात. हे फीचर ग्राहकांना समाधान देण्‍याप्रती इक्सिगोच्‍या कटिबद्धतेशी संलग्‍न आहे. या वैशिष्‍ट्यामधून फ्लाइट बुकिंग्‍ज रद्द केल्‍यास कोणतेही प्रश्‍न न विचारता संपूर्ण परताव्‍याची हमी मिळते, ज्‍यामुळे स्थिरता आणि प्रवाशांचा विश्‍वास अधिक वाढतो.

इक्सिगोचे सह-संस्‍थापक रजनीश कुमार व अलोक बाजपेयीम्‍हणाले, ‘आज प्रवाशांना सामना कराव्‍या लागणाऱ्या अनिश्चितता पाहता इक्सिगो अशुअर्ड त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी आणि त्‍यांना आवश्‍यक असलेली स्थिरता प्रदान करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. आम्‍ही वापरकर्त्‍यांना सर्वोत्तम प्रवास अनुभव देण्‍याप्रती समर्पित आहोत. आता आंतरराष्‍ट्रीय व देशांतर्गत फ्लाइट्ससाठी इक्सिगो अशुअर्ड उपलब्‍ध असताना आम्‍ही वापरकर्ते अधिक समाधानासह त्‍यांच्‍या स्‍वप्‍नवत ट्रिप्‍स बुक करू शकण्‍याची खात्री घेण्‍यासाठी प्रयत्‍न करतो. या उपक्रमामधून ग्राहक समाधानाप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामुळे ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल व्‍यासपीठ म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ होत आहे.”

इक्सिगो अशुअर्डचा अवलंब करणारे वापरकर्ते निवडक आतंरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर संपूर्ण परतावा मिळण्‍यास पात्र ठरतील, ज्‍यासाठी त्‍यांना नियोजित निर्गमन वेळेच्‍या २४ तासांच्‍या आत बुकिंग्‍ज रद्द करणे आवश्‍यक असेल. इक्सिगो अशुअर्ड एकसंधी रिफंड प्रक्रियेची खात्री देते, ज्‍याअंतर्गत कागदपत्र व्‍यवहाराची गरज दूर होते. कॅन्‍सलेशननंतर इक्सिगो त्‍वरित रिफंड प्रक्रिया सुरू करते (बँक व पेमेंटच्‍या मोडवर आधारित, काही केसेसमध्‍ये पैसे परत मिळण्‍यासाठी जवळपास ७ दिवस लागू शकतात). इक्सिगो अशुअर्डसह प्रवासी आता आत्‍मविश्‍वासासह भावी प्रवास योजनांचे नियोजन करू शकतात, जेथे त्‍यांना त्‍यांच्‍या प्रवास योजनांमध्‍ये अनिश्चिततांचा सामना करावा लागल्‍यास प्रवास रद्द करून संपूर्ण परताव्‍याची खात्री मिळते.

Related posts

विजय सेल्सचा ‘अॅप्पल डेज सेल’

Shivani Shetty

क्वांटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर ऑफर

Shivani Shetty

जानेवारी 2024 मध्ये ओपन सिग्नल च्या अहवालानुसार एअरटेल मुंबईतील ब्रॉडबँड स्पीड लढाईत आघाडीवर*

Shivani Shetty

Leave a Comment