maharashtraprimenews
ठळक बातम्या
C s r activityCharityPublic Interestठळक बातम्या

पालघरमधील ४३ आदिवासी कुटुंबांना सुरक्षित घरे मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘हॅबिटॅट चॅरिटी गोल्फ’च्या सातव्या पर्वाची मुंबईत यशस्वी सांगता

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२६: “अनेक वर्षे आम्ही एका वाईट स्थितीत असलेले घरात राहत होतो. दरवर्षी पावसाळ्यात आम्ही कष्टाने उभारलेला निवारा कोसळायचा. मात्र, आज आमच्या घराला भक्कम भिंती आहेत आणि माझे कुटुंब आता सुरक्षितपणे स्थिरावले आहे. ज्या घराचे आम्ही केवळ स्वप्न पाहिले होते, ते घर उभारण्यास मदत केल्याबद्दल मनःपूर्वक आभार,” अशा शब्दांत घराच्या लाभार्थी रोशनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाच्या वार्षिक ‘चॅरिटी गोल्फ टूर्नामेंट’च्या सातव्या पर्वाच्या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या.
रोशनी जुलै २०२६ मध्ये पालघर येथील आपल्या नव्या घरात राहायला गेल्या. २०२५ मध्ये आयोजित हॅबिटॅट चॅरिटी गोल्फच्या सहाव्या पर्वातून मिळालेल्या निधीच्या मदतीने हे घर बांधण्यात आले. यंदाच्या कार्यक्रमाला रोशनी आणि त्यांचे पती रंजित मोर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरक्षित आणि सन्मानजनक घरामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला.
आदित्य बिर्ला समूह हांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या सातव्या पर्वात क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, व्यावसायिक नेते आणि सामाजिक क्षेत्रातले मान्यवर अश्या ८८ गोल्फपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबांच्या गृहनिर्माणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगाव येथील ४३ आदिवासी कुटुंबांसाठी नवीन घरे बांधण्यास पाठबळ उभारणे हा होता.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींमध्ये मारिको लिमिटेडचे अध्यक्ष श्री. हर्ष मारीवाला, स्कायडान्सचे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अर्जुन नोव्हार, नवनीत समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन विल्कॉक्स, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेटपटू श्री. अजित आगरकर, तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू, समालोचक आणि प्रशिक्षक श्री. एस. बद्रीनाथ यांचा समावेश होता.
स्पर्धेनंतर आयोजित पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून आदित्य बिर्ला समूहाच्या श्रीमती राजश्री बिर्ला उपस्थित होत्या. तर सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. निरंजन हिरानंदानी उपस्थित होते. याशिवाय हॅबिटॅट इंडिया विश्वस्त मंडळाचे अध्यक्षा श्रीमती शीला क्रिपलानी, एम. के. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय विश्वस्त सुश्री पिलू टाटा, ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार श्री. विरन रस्किन्हा यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आदित्य बिर्ला समूहच्या आणि हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाच्या IndiaBUILDS सल्लागार समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री बिर्ला म्हणाल्या, “राष्ट्रनिर्मितीची सुरुवात प्रत्येक कुटुंबाला अधिक चांगले जीवन घडवण्याची संधी देण्यापासून होते. सुरक्षित आणि सन्मानजनक घर हा त्या संकल्पनेचा मूलभूत पाया आहे. याच विश्वासातून आदित्य बिर्ला समूह गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाला सहकार्य करत आहे. हॅबिटॅट चॅरिटी गोल्फ टूर्नामेंटच्या सातव्या पर्वालाही हे सहकार्य देताना आम्हाला आनंद होत आहे.”
हिरानंदानी समूह व्यवस्थापकीय संचालक आणि हॅबिटॅट इंडियाच्या IndiaBUILDS सल्लागार समितीचे सदस्य डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले, “सन्मानजनक घर हे कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, प्रतिष्ठेसाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानजनक निवारा मिळावा, यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. हॅबिटॅट चॅरिटी गोल्फसारखे उपक्रम या समान उद्दिष्टासाठी लोकांना एकत्र आणतात. उपस्थित प्रत्येक व्यावसायिक नेते, परोपकारी व्यक्ती आणि नागरिकांनी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाच्या कार्याला यापुढेही पाठिंबा द्यावा, असे मी आवाहन करतो.”
BCCI निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी भारतीय क्रिकेटपटू श्री. अजित आगरकर म्हणाले, “खेळ लोकांना एकत्र आणतो आणि त्यातून समाजासाठी काही योगदान देता आले, तर त्याहून चांगली गोष्ट नाही. सुरक्षित घरामुळे कुटुंबाला सन्मान मिळतो आणि भविष्यासाठी नियोजन करण्याची संधी मिळते. गोल्फ समुदाय केवळ खेळासाठी नव्हे, तर त्यापेक्षा मोठ्या सामाजिक उद्देशासाठी एकत्र येत असलेल्या या उपक्रमाचा भाग होता आल्याचा मला आनंद आहे.” हॅबिटॅटच्या ध्येयाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे राष्ट्रीय संचालक श्री. आनंद कुमार बोलिमेरा म्हणाले, “ही स्पर्धा केवळ गोल्फपुरती मर्यादित नाही. आतापर्यंतच्या सहा पर्वांमधून गोल्फ समुदायाच्या सहकार्याने आम्ही गृहनिर्माण, पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक (WaSH) तसेच घरांशी संबंधित सेवांच्या माध्यमातून ४२८ कुटुंबांना मदत करू शकलो आहोत. यंदा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील ४३ आदिवासी कुटुंबांना सुरक्षित आणि मजबूत घरे उभारण्यासाठी मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या प्रवासात सातत्याने सहकार्य करणाऱ्या प्रत्येक सहभागी आणि भागीदाराचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे सल्लागार श्री. राजीव मेनन म्हणाले, “२०१८ मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली, तेव्हा आमची संकल्पना अतिशय साधी होती – खेळाविषयीच्या आपल्या सामायिक आवडीला एका अर्थपूर्ण सामाजिक कार्याची जोड द्यायची. सात पर्वांनंतर आज सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत त्या अशा कुटुंबांच्या कहाण्या, ज्यांच्या आयुष्यात आम्ही सकारात्मक बदल घडवून आणू शकलो आहोत.”
२०१८ मध्ये हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने एशियन टूरसोबत शाश्वत विकास भागीदार म्हणून भागीदारी केल्यानंतर हॅबिटॅट इंडियाने आपल्या पहिल्या चॅरिटी गोल्फ टूर्नामेंटची सुरुवात केली. तेव्हापासून या स्पर्धेने गोल्फ समुदायाला गृहनिर्माण आणि सामुदायिक विकास उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत ४२८ कुटुंबांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणण्यात आली आहे.
हॅबिटॅट चॅरिटी गोल्फच्या सातव्या पर्वाला आदित्य बिर्ला समूह, हिरानंदानी कम्युनिटीज – निरंजन हिरानंदानी यांचा उपक्रम, कोवे, बीएमडब्ल्यू नवनीत मोटर्स, गुडरिच मेरीटाइम प्रा. लि., प्लेव्हिड ग्रुप, विदा सोल्युशन्स इंडिया, हॅबिट शूज, सुचना मरीन सर्व्हिसेस प्रा. लि., टेकडॉग्स मार्केटिंग प्रा. लि., ट्रान्सफॉर्मिया अ‍ॅडव्हायझर्स एलएलपी, आउटरवर्ल्ड, ट्रायडेंट हॉटेल नरिमन पॉइंट मुंबई, जीन-क्लॉड बिगिन सलून अँड स्पा, द पँट प्रोजेक्ट, नक्षा, इकोसॅक, फॅब कार्स, झवेरचंद स्पोर्ट्स प्रा. लि. आणि स्टे व्हिस्टा यांचे सहकार्य लाभले.
हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया विषयी
प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी एक सन्मानजनक जागा मिळायला हवी, या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ची स्थापना भारतात १९८३ मध्ये तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी अगदी छोट्या पातळीवर झाली. तेव्हापासून ही गृहनिर्माण संस्था विस्तारत जाऊन आज भारतातील एक अग्रगण्य ना-नफा (नॉन-प्रॉफिट) गृहनिर्माण संस्था बनली आहे. या संस्थेने भारतातील हजारो कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा त्यांच्या घरांची सुधारणा करण्यासाठी मदत केली आहे. ‘गृहनिर्मिती’, ‘WASH’ (पाणी, स्वच्छता व आरोग्य) आणि ‘आपत्ती-प्रतिरोधक गृहनिर्माण व प्रतिसाद’ या आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’ने देशभरातील ८२.८ लाखांहून अधिक लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला आहे. आर्थिक मदत, स्वयंसेवा किंवा परवडणाऱ्या घरांच्या मागणीला आपला पाठिंबा देणे, अशा विविध मार्गांनी आपण प्रत्येकजण या कुटुंबांना मदत करू शकतो. यामुळे त्यांना स्वतःचे जीवन अधिक चांगले घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता, स्थैर्य आणि स्वावलंबन या गोष्टी मिळवता येतील. आम्ही लोकांना निवाऱ्याच्या माध्यमातून सक्षम करतो. अधिक माहितीसाठी, देणगी देण्यासाठी किंवा स्वयंसेवा करण्यासाठी, www.habitatindia.org या संकेतस्थळाला भेट द्या.

माध्यमांशी संबंधित चौकशीसाठी, कृपया संपर्क साधा:
ऋत्विक सावंत, संचालक – जनसंपर्क (Communications), हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया
ई-मेल: ritwiks@habitatindia.org

Related posts

यामाहाकडून भारतात १५० सीसी श्रेणीमधील पहिली हाय‍िब्रिड मोटरसायकल : २०२५ ‘FZ-S Fi Hybrid’ लाँच

Shivani Shetty

डिजिटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? यंदा सणासुदीच्‍या काळात अशा घोटाळ्यांपासून सुरक्षिततेसाठी ५ महत्त्वपूर्ण उपाय

Shivani Shetty

सेन्‍चुरी मॅट्रेसकडून ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडरपदी ‘पीव्‍ही सिंधू यांची नियुक्‍ती

Shivani Shetty

Leave a Comment