maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

Ultraviolette चा 24 तासांत मुंबईतील तीन ठिकाणी विस्तार

मुंबई, 26 नोव्हेंबर 2025 – मल्टी टेरेन मोटरसायकल आणि UV Crossfade या त्यांच्या पहिल्या रडार कम्युनिकेशनसह असलेल्या कार्बन फायबर हेल्मेटसह X-47 Crossover च्या यशस्वी सादरीकरणानंतर Ultraviolette ने आज वाशी आणि ठाणे येथे अत्याधुनिक एक्सपिरीअन्स सेंटरचे उद्घाटन करत भारतातील आपला विस्तार अधिक मजबूत केला आहे. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे Ultraviolette चा देशातील सातत्यपूर्ण वाढीचा प्रवास अधोरेखित होतो आणि देशभरात कामगिरी प्रणीत आणि शाश्वत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याच्या त्यांच्या बांधिलकीला अधिक बळकटी मिळते.

ही तीन UV स्पेस स्टेशन्स प्रसिद्ध डीलर हॉलमार्क मोबिलिटी LLP (हॉलमार्क ग्रुप)यांच्या भागीदारीत ग्राहकांना Ultraviolette च्या परफॉरर्मन्स मोटारसायकल X-47, F77 MACH 2 आणि F77 SuperStreet यांचा सखोल अनुभव देतात. ही सर्व UV स्पेस स्टेशन्स 3S सुविधांनी सज्ज असून टेस्ट राईड, विक्री, सेवा, स्पेअर्स आणि मोटारसायकलच्या अक्सेसरीज अशा सगळ्या गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.

Ultraviolette चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक नारायण सुब्रमण्यम उद्घाटनावेळी बोलताना म्हणाले, “मुंबई ही Ultraviolette च्या विकास प्रवासामधील एक महत्वाची पायरी आहे. शहरात अनेक रिटेल आणि सेवा स्थळे कार्यान्वित झाल्यानंतर आणि युनायटेड किंग्डममधील आमच्या अलीकडील पदार्पणानंतर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मची राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील वचनबद्धता सतत सिद्ध करत आहोत. भारतामध्ये 100 ठिकाणांपर्यंत सुव्यस्थित विस्तार करताना आम्ही आमच्या डीलर पार्टनर्स सोबत मजबूत भागीदारी निर्माण करण्यास वचनबद्ध आहोत. शाश्वत, दीर्घकालीन वाढीसाठी एकत्र काम करत आहोत आणि दळणवळण उद्योगामध्ये परिवर्तन घडविण्यास सक्षम असा व्यवसाय उभा करत आहोत.”

हॉलमार्क मोबिलिटी LLP चे संचालक आणि संस्थापक जिग्नेश मेहता म्हणाले, “आज हॉलमार्क मोबिलिटीसाठी एक अत्यंत खास दिवस आहे कारण आम्ही Ultraviolette सोबतच्या नवीन भागीदारीत 24 तासांमध्ये मध्ये तीन UV स्पेस स्टेशन्सचे एकत्र उद्घाटन करत आहोत. जागतिक पातळीवर रायडर्ससाठी सुरक्षा आणि कामगिरीचे सर्वोच्च मापदंड जपत नाविन्यपूर्णता, भविष्यवेधी डिझाईन आणि तंत्रज्ञान यांच्या सीमा सातत्याने पुढे नेणाऱ्या ब्रँडसोबत भागीदारी करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. Ultraviolette ची दळणवळणाबाबतची दूरदृष्टी आमच्या अतुलनीय ग्राहक अनुभव देण्याच्या आणि ऑटोमेटीव्ह रिटेलचे रूप बदलण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे जुळते. एकत्रितपणे आम्ही केवळ जागतिक दर्जाची उत्पादने आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणार नाही, तर भारतामध्ये प्रगत सुरक्षा मानके आणि कामगिरी प्रणीत दळणवळण यांच्या नवीन युगासाठी प्रोत्साहनही देऊ.”

या मोटारसायकल्स इलेक्ट्रिक कामगिरीची नवीन व्याख्या करतात. त्यात 40.2 hp ची powertrain आणि 100 Nm torque आहे. फक्त 2.8 सेकंदामध्ये 0 ते 60 kph गाठते. 10.3 kWh बॅटरी असलेल्या या मोटारसायकल्स एका सिंगल चार्जवर 323 kms चा IDC range सादर करतात. त्यांच्या 3-level Traction Control System मुळे विविध राइडिंग परिस्थितींमध्ये सर्वोत्तम ट्रॅक्शन आणि स्थिरता मिळते. तसेच, 10 लेव्हल्स रीजनरेटीव्ह ब्रेकिंगमुळे अधिक सोय आणि उर्जा कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे रेंजही प्रभावीपणे वाढते. यात Dynamic Stability Control (UV DSC) देखील आहे. हे एक अत्याधुनिक वैशिष्ट्य असून रीजनरेटीव्ह ब्रेकिंग लेव्हल्स आणि ABS चे विनाअडथळा मोड्यूलेशन करून माईल्ड, ॲक्टीव्ह किंवा पॅनिक ब्रेकिंग दरम्यान पूर्ण नियंत्रण आणि स्थिरता देते. त्यामुळे चालक अधिक सुरक्षित होतो.

त्याव्यतिरिक्त, X-47 मध्ये UV Radar Intelligence आहे. दोन-चाकी वाहनांच्या डायनामिक्ससाठी खास डिझाइन केलेल्या या रडार यंत्रणेमध्ये 20 अंशापर्यंतच्या लीन अँगलसाठी intelligent adaptation आणि roll व pitch मधील फरकांसाठी seamless compensation आहे. त्यामुळे चालवताना सर्वोत्तम कामगिरी आणि त्या त्या परिस्थितीतील सजगता मिळते. यामुळे Ultraviolette ही UV HyperSense द्वारा समर्थित Advanced Rider Assistance System सादर करणारी पहिली उत्पादक बनली आहे. चालक सजगता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी तयार केलेली ही प्रणाली ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन चेंज असिस्ट, ओव्हरटेक अलर्ट आणि रिअर कोलिजन वॉर्निंग या चार मुख्य फीचर्सद्वारे कार्य करते.

या वर्षाच्या सुरुवातीला, Ultraviolette ला मुख्य प्रवाहातील त्यांच्या दोन नवीन सादरीकरणानाही प्रचंड प्रतिसाद मिळाला: जगातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक स्कूटर – ‘Tesseract’. यात या विभागातील पहिले समग्र अंतर्भूत रडार आणि dashcam आहेत. तसेच ओम्नीसेन्स मिरर्स दिले आहेत. जोडीला disruptive electric motorcycle – ‘Shockwave’ हे दुसरे सादरीकरण. रोमांचक रायडिंग अनुभव शोधणाऱ्या चालकांसाठी काळजीपूर्वक डिझाइन आणि इंजिनियर करण्यात आली आहे.

अंधेरी (पूर्व) मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप 1 & 2, क्रेसेंट सोलिटेअर बिझनेस पार्क, साकीनाका, टेलिफोन एक्सचेंज लेन जवळ, साकी नाका, मुंबई- 400072, महाराष्ट्र.
वाशी मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप नं. 4 & 5, सेक्टर 30 A, लोकमत कॉम्प्लेक्स जवळ, वाशी, नवी मुंबई- 400705, महाराष्ट्र.
ठाणे मधील UV स्पेस स्टेशनचा पत्ता: शॉप नं. 6 & 7, ग्राउंड फ्लोअर, ब्ल्यू नाईल, प्लॉट नं. 369, एलबीएस रोड, मखमली तलाव जवळ, ठाणे (पश्चिम)- 400601, महाराष्ट्र.

Related posts

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्स – कॅरेटलेन ची भागीदारी

Shivani Shetty

‘गोल्ड सील ऑफ अप्रूव्हल®️’ मिळवणारे नवी मुंबईतील अपोलो पहिले रुग्णालय

Shivani Shetty

१९ ऑक्टोबर रोजी ठाण्यामध्ये राज्यस्तरीय शिक्षण स्नेहमेळाव्याचे आयोजन, हजारो शिक्षक उपस्थित राहणार*

Shivani Shetty

Leave a Comment