maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

व्हीएमएस टीएमटी लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफरिंग १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी सुरू होऊन १९ सप्‍टेंबर २०२५ रोजी बंद होईल, जिचा प्राइस बँड प्रति शेअर ९४ रूपये ते ९९ रूपये आहे

मुंबई, १३ सप्टेंबर २०२५: कामधेनू ब्रँडअंतर्गत विक्री केल्‍या जाणाऱ्या टीएमटी बारची गुजरातमधील उत्पादक व्हीएमएस टीएमटी लिमिटेड (‘कंपनी’)ने आज त्यांच्या आगामी इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ)साठी प्रति इक्विटी शेअर ९४ रूपये ते ९९ रूपये प्राइस बँड जाहीर केला. हा इश्यू बुधवार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी सुरू होईल आणि शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदार बोली मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होईल.

आयपीओ बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध केला जाईल. अरिहंत कॅपिटल मार्केट्स लिमिटेड इश्यूची बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) आहे, तर केफिन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड इश्यूची रजिस्ट्रार आहे.

आयपीओमध्ये बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे प्रत्येकी १० रूपयांच्‍या दर्शनी मूल्याच्या १,५०,००,००० पर्यंत इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू समाविष्‍ट आहे.

व्हीएमएस टीएमटी लिमिटेडचा आयपीओमधून मिळालेल्या रकमेपैकी ११,५००.०० लाख रूपयांचा वापर कंपनीने घेतलेल्या काही कर्जांच्या संपूर्ण किंवा काही प्रमाणात परतफेड/पूर्वपेमेंटसाठी करण्याचा मानस आहे, तर उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि इश्यू खर्चासाठी वापरला जाईल.

गुजरातमधील ही कंपनी भारतातील अहमदाबाद, गुजरात येथील भायला गावात असलेल्या उत्पादन केंद्रामध्‍ये टीएमटी बारचे उत्पादन करते.

३१ जुलै २०२५ पर्यंत कंपनीचे ३ वितरक आणि २२७ डीलर्स असलेले नॉन-एक्सक्लुझिव्ह वितरण नेटवर्क आहे आणि ५० हून अधिक ट्रक आहेत, जे रिटेल ग्राहकांना टीएमटी बारची घरपोच डिलिव्हरी करतात. कंपनीचे द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये विक्री वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित आहे. कंपनी २,१६,००० एमटीपीएच्या इन-हाऊस बिलेट उत्पादन क्षमतेसह एकीकृत आहे आणि कॅप्टिव्ह (विशिष्‍ट) वापरासाठी १५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प देखील स्थापित करत आहे. याव्यतिरिक्‍त, कंपनी बीआयएस, ISO 9001:2015, ISO 45001:2018 आणि ISO 14001:2015 मानकांसह प्रमाणित आहे. ज्‍यामधून कंपनीची दर्जा, सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारीप्रती कटिबद्धता दिसून येते.

व्‍हीएमएस टीएमटीचा आर्थिक वर्ष २०२५ साठी कार्यसंचालनांमधून महसूल ७७,०१९.१० लाख रूपये राहिला. करोत्तर नफा आर्थिक वर्ष २०२४ मधील १३४६.८४ लाख रूपयांवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्‍ये १४७३.७० लाख रूपयांपर्यंत वाढला.

३० जून २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी कार्यसंचालनांमधून महसूल आणि करोत्तर नफा अनुक्रमे २१,२२५.९२ लाख रूपये व ८५७.६४ लाख रूपये होता.

Related posts

विद्यार्थ्यांना क्लिक झालेली पेन्सिल – युवाची प्रोमेक मेकॅनिकल पेन्सिल

Shivani Shetty

‘यंग शेफ यंग वेटर’ स्पर्धा २०२४ चे आयोजन

Shivani Shetty

नवीन किया सोनेट ७.९९ लाख रुपयांमध्ये लॉन्च

Shivani Shetty

Leave a Comment