maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

झी5 तर्फे अत्याधुनिक कॉमन मिडिया अॅप्लिकेशन फॉरमॅट अंमलबजावणी

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२४: भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी5 ने व्यापक प्रमाणात आशय वितरण परिवर्तन आणि प्रेक्षकांचा अनुभव वाढवण्यासाठी कॉमन मीडिया अप्लिकेशन फॉरमॅट (CMAF) यशस्वीरित्या अंगिकारला आहे. कंपनीच्या बंगळुरूस्थित टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरद्वारे लागू करण्यात आलेल्या या नवकल्पनात्मक उपायामुळे विविध उपकरणांवर व्हिडिओ प्लेबॅक अधिक सुरळीत होतो आणि कमी इंटरनेट बँडविड्थ असलेल्या भागातही झी5 वापरकर्त्यांना चांगल्या ऑडिओ व्हिज्युअल (AV) गुणवत्तेचा अनुभव मिळतो.

 

अधिकाधिक दर्शकांना उच्च-गुणवत्तेच्या स्ट्रीमिंगचा लाभ मिळेल हे सुनिश्चित करत जास्तीत जास्त बँडविड्थ वापर आणि ऑपरेशनल खर्च कमी करून झी5 100 दशलक्ष वापर कर्त्यां पर्यंत पोहोचत आहे. विनाअडथळा क्रॉस डिव्हाईस कम्पेटिबिलिटी सक्षम करत सेगमेंट मीडिया पॅकेजिंगसाठी सिएमएएफ हा एक बहुमुखी आणि विस्तृत मापदंड डिझाइन केला आहे. सिएमएएफ स्वीकारल्याने झी5 केवळ विनाअडथळा दृश्य अनुभव सुनिश्चित करत नाही तर कमी विलंब देखील साध्य करतो. खेळ, बातम्या आणि इव्हेंट्सच्या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

 

शिवा चिन्नासामी, चीफ टेक्नॉलॉजी-प्रॉडक्ट ऑफिसर, झी म्हणाले,“आमचे धोरणात्मक उद्दिष्ट कमी इंटरनेट असलेल्या भागांमध्ये देखील सर्वोत्तम ऑडिओ व्हिजीयुल (AV) अनुभव पुरविण्यावर आहे. बँडविड्थ कितीही असली तरी प्रत्येक प्रेक्षकापर्यंत उच्च-गुणवत्तेचा अनुभव पोहोचविणे सुनिश्चित करत कोणताही डेटा वाया न घालवता सिएमएएफ आम्हाला आशय अधिक कार्यक्षमतेने वितरित करण्यास अनुमती देते. झी5 मजबूत सेवा आणि आपल्या ग्राहकांना अनुभव प्रदान करण्यासाठी इन-हाउस क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि हे साध्य करण्यासाठी सिएमएएफ अंगीकार हे महत्त्वाचे पाऊल आहे.”

 

मनीष कालरा, चीफ बिझनेस ऑफिसर, झी5 इंडिया म्हणाले,“झी5 मध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्शकांचा अनुभव सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहोत. कॉमन मीडिया अप्लिकेशन फॉरमॅट (CMAF) स्वीकारणे हे झी5 च्या दर्जेदार मनोरंजनाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनाचे पुढचे पाऊल आहे. कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांमध्ये देखील, आमचे वापरकर्ते विनाअडथळा कार्यक्रम पाहण्याचा अनुभव घेऊ शकतात हे सुनिश्चित होते. ही धोरणात्मक पायरी म्हणजे व्यापक प्रेक्षकांसाठी दर्जेदार आशय सादर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असून एकाच वेळी अनेक उपकरणांवर मनोरंजन वितरित करण्याच्या आमच्या उद्दिष्टाशीही सुसंगत आहे. सिएमएएफ हे आमच्या प्लॅटफॉर्मवर दर्शक कशा प्रकारे आशयाचा आनंद घेतात यात आणखी सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल दर्शवते.”

Related posts

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

लिव्हप्युअरची देशभरात १०० हून अधिक स्टोअर्स होणार खुली

Shivani Shetty

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड ऑन्कोसायन्सेस आणि गॅस्ट्रोसायन्सेस विंगचे उदघाटन, विशेष देखभाल सेवांच्या विस्तारात उचलले महत्वाकांक्षी पाऊल

Shivani Shetty

Leave a Comment