
राष्ट्रीय, 18 सप्टेंबर 2025: सोलरवर्ल्ड एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड(“Solarworld” किंवा “द कंपनी”) कंपनी इक्विटी शेअरसाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी सुरूकरणार आहे.
इक्विटी शेअरसाठीच्या एकूण ऑफर साईज मध्ये 4,900 दशलक्ष रु. [490 कोटी रु.] (“एकूण ऑफर साईज”) किंमतीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये 4,400 दशलक्ष रु. [440 कोटी रु.] पर्यंतचे फ्रेश इश्यू आणिविक्री समभागधारकांकडून 500 दशलक्ष रु. [50 कोटी रु.] मूल्याच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. कंपनीने आयपीओ पूर्व प्लेसमेंटद्वारे 1,100.00 दशलक्ष रु. पर्यतच्या इक्विटी शेअरसाठीचा इश्यू 9 नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण केला.
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक सोमवार, 22 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर मंगळवार, 23 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि गुरुवार, 25 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 333 रुपये ते 351 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 42 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 42 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीचा इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या आणि आयपीओ पूर्व कामातून मिळालेल्या निव्वळ निधीचा उपयोग आपली उपकंपनी कार्तिक सोलरवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (“KSPL”) मध्ये गुंतवणुकीसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. भारतातील मध्यप्रदेशातील पंधूराणा येथे 1.2 GW सोलर PV TopCon Cell उत्पादन केंद्राच्या उभारणीसाठी वित्तपुरवठा करण्याकरता हा निधी वापरण्यात येईल आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“ऑफरचा उद्देश”) वापरण्यात येणार आहे.
ऑफर फॉर सेल मध्ये पायोनीर फेकर आयटी इन्फ्राडेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) कडून 500.00 दशलक्ष रु. (50 कोटी रु.) पर्यतच्या इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे सादर करण्यात येत असून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा (“ नवी दिल्ली RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. हे शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
ही ऑफर SCRR, नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 75% पेक्षा कमी नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापिआपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल.
यानंतर, SEBI ICDR नियमांनुसार ऑफरपैकी किमान 15% वाटप नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स साठी उपलब्ध असेल बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग बिगर संस्थात्मक बोली लावणारे (“NIBs”) (“बिगर संस्थात्मक भाग”) यांच्यासाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. ऑफरपैकी 10% पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स (‘RIIs’) साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल.
प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी पृष्ठ क्र. 423 वरील “ऑफर प्रक्रिया” (Offer Procedure) पाहा.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
Disclaimer:
Solarworld Energy Solutions Limited (the “Company”) is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its equity shares and has filed the red herring prospectus (“RHP”) with the Registrar of Companies, Delhi and Haryana at New Delhi. The RHP is available on the website of the Company at https://worldsolar.in/investors/, website of SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the book running lead managers, Nuvama Wealth Management Limited and SBI Capital Markets Limited at www.nuvamawealth.in and www.sbicaps.com respectively, and the websites of National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see “Risk Factors” of the RHP. Potential investors should not rely solely on the DRHP filed with SEBI for any investment decision.
This announcement does not constitute an offer of the Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and the Equity Shares may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933 or an exemption from registration. Any public offering of the Equity Shares to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the Company and that will contain detailed information about the Company and management, as well as financial statements. However, the Equity Shares are not being offered or sold in the United States.
Disclaimer clause of NSE:
It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to the RHP for the full text of the ‘Disclaimer Clause of NSE’
Disclaimer clause of BSE:
It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Red Herring Prospectus has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Red Herring Prospectus. The investors are advised to refer to the Red Herring Prospectus for the full text of the ‘Disclaimer Clause of NSE’

