राष्ट्रीय, १५ मार्च २०२४: लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् अव्वल महिला अचीव्हर्स आणि त्यांच्या सर्वोत्तम कामगिरींना सादर करत आहे. या महिलांनी समकालीन अपेक्षांना व मर्यादांना मागे टाकत सर्वोत्तमतेचे नवीन मानक स्थापित केले आहे. विशेषत: क्रीडामध्ये त्यांनी इतिहास रचला, तसेच इतरांना मोठे स्वप्न पाहण्यास आणि अडथळयांवर मात करण्यास प्रेरित केले आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् त्यांच्या अतूट उत्साहाला सन्मानित करत त्यांच्या उल्लेखनीय यशाला दाखवते. त्यांच्या गाथा आशा व सक्षमीकरणाचा आधारस्तंभ आहेत, आपल्याला आठवण करून देतात की जगामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केल्यास कोणतेच अडथळे येत नाहीत.
काही अविश्वसनीय महिलांबाबत माहिती, ज्यांची नावे कायमस्वरूपी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये राहतील, ज्यामधून त्यांचे शौर्य, चिकाटी व सर्वोत्तमतेचा उत्साह दिसून येतो –
● अहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी एशियन गेम्स २०२२ मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी ठरली. या जोडीने जगामध्ये दुसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या अनुक्रमे चेन मेंग व वाँग यिदी या चीनी जोडीला पराभूत करत ऐतिहासिक विजयासह कांस्य पदक जिंकले.
अहिका (डावीकडे) आणि सुतिर्था मुखर्जी
स्रोत: इन्स्टाग्राम
● शॉट पुटर किरण बलियानने एशियन गेम्स २०२२ मधील त्यांच्या क्षेत्रामध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले. फिल्ड इव्हेण्टमधील तिचे कांस्य पदक १९५१ मध्ये एशियन गेम्स सुरू झाल्यापासून भारताचे पहिले शॉट पुट पदक ठरले.
● ज्योती याराजी २०२२ एशियन गेम्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय १०० मीटर हर्डलर ठरली. राष्ट्रीय रेकॉर्डधारकाने १२ मिनिटे व ९१ सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले.
ज्योती याराजी
स्रोत: इन्स्टाग्राम
● सीए भवानी देवी २०२३ मध्ये एशियन फेन्सिंग चॅम्पियनशीप्समध्ये कांस्य पदक जिंकत पहिल्या भारतीय फेन्सर ठरल्या. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये देवी यांनी जपानच्या मिसाकी एम्युराविरूद्ध १५-१० या उल्लेखनीय स्कोअरसह विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीमध्ये देवी यांनी उझ्बेकिस्तानच्या झायनॅब देयीबेकोवाविरूद्ध सामना खेळला.
● भारतीय महिला कबड्डी टीम एशियन गेम्समधील अंतिम सामन्यामध्ये चायनीज तैपेयीचा पराभव करत त्यांच्या क्षेत्रात तीनदा सुवर्ण पदक जिंकणारी पहिली टीम ठरली. टीमने यापूर्वी २०१० आणि २०१४ मध्ये पदक जिंकले.
भारतीय महिला कबड्डी संघ
स्रोत: पीटीआय फोटो
• सुक्रती सक्सेना, रूपम द्विवेदी, स्वरांजली सक्सेना आणि अपाला राजवंधी यांनी महिलांच्या ग्रुपद्वारे चार-चाकीमध्ये सर्वात वेगवान गोल्डन क्वॉड्रिलॅटरल (जीक्यू) मोहिम पार केली. त्यांनी ६ दिवस, १४ तास आणि ५ मिनिटांमध्ये ६,२८३ किमी अंतर पार केले. १० मे २०२३ रोजी रात्रीच्या १.३५ वाजता इंडिया गेट, नवी दिल्ली येथून त्यांच्या मोहिमेला सुरूवात झाली आणि १६ मे २०२३ रोजी सुब्रोतो पार्क एअर फोर्स स्टेशन, नवी दिल्ली येथे सायंकाळी ४.३० वाजता मोहिमेचे समापन झाले.
जीक्यू एक्स्पीडिशन – चार-चाकी
डावीकडून उजवीकडे अपाला राजवंशी, सुक्रती सक्सेना, स्वरांजली सक्सेना आणि रूपम द्विवेदी
स्रोत: लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्
”३० वर्षांपासून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् जीवनाच्या सर्व स्तरांमधील भारतीयांच्या कल्पकता, प्रतिभा व उपलब्धींचा लक्षवेधक इतिहास राहिला आहे. या विजेत्यांमध्ये महिलांनी अग्रणी नेतृत्व केले आहे, ज्यामधून त्यांची असाधारण महत्त्वाकांक्षा व उल्लेखनीय समर्पितता दिसून येते, तसेच सर्वोत्तमतेच्या चॅम्पियन्स म्हणून त्यांची किर्ती दिसून येते, जी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. आम्ही सर्व महिला रेकॉर्डधारकांचे मनापासून अभिनंदन व आभार व्यक्त करतो, ज्यांनी मर्यादांना झुगारत अपवादात्मक यश संपादित केले आहे,” असे लिम्बा बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या कन्सल्टिंग एडिटर आणि हॅचेट इंडियाच्या प्रकाशक वत्सला कौल बॅनर्जी म्हणाल्या.
कोका-कोला कंपनीच्या भारतातील हायड्रेशन, स्पोर्टस् अँड टी कॅटेगरीच्या मार्केटिंगच्या आणि साऊथ-वेस्ट एशिया ऑपरेटिंग युनिटच्या वरिष्ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्हणाल्या, ”आम्ही अविरत आवड जोपासण्यासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये अभिमानास्पद स्थान मिळवलेल्या महिला रेकॉर्डधारकांना सलाम करतो, तसेच उत्तम कामगिरीसाठी सर्व क्षेत्रातील विजेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मी अडथळ्यांना मोडून काढण्याचे महत्त्व दर्शवत सर्व महिलांसाठी यशस्वी होण्यास प्रेरित करणाऱ्या या महिलांचे कौतुक करते.”
महिला रेकॉर्डधारकांसह लिम्का आपल्या महिला प्रमुखांच्या महत्त्वपूर्ण योगदानांना महत्त्व देते आणि सन्मानित करते, जसे त्यांच्या हायड्रेशन, स्पोर्टस् अँड टी कॅटेगरीसाठी मार्केटिंगच्या वरिष्ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य, ब्रॅण्ड लिम्काच्या मार्केटिंगच्या वरिष्ठ व्यवस्थापक अंकिता जी. महाना आणि हॅचेट इंडिया येथील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् टीम. ते त्यांची समर्पितता, कौशल्य व नेतृत्वाच्या माध्यमातून हे एडिशन निर्माण करण्यामध्ये साह्यभूत राहिले आहेत.