नवी मुंबई, २३ जून २०२५ : वेदनांशिवाय पाऊल टाकता येणे हे अनेकांसाठी केवळ वेगाच्या दृष्टीने नव्हे, तर स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. वेदनांपासून स्वातंत्र्य परत मिळवण्यापर्यंतच्या या प्रवासामध्ये एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई (AHNM) ने “रिक्लेम युअर स्टेप्स” मध्ये रुग्ण, डॉक्टर आणि देखभाल घेणाऱ्यांना एकत्र आणले. या उपक्रमात आशा, उपचार आणि एकता यांचा अनोखा मिलाप पाहायला मिळाला. या उपक्रमाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे: रुग्णालयात २०० रोबोटिक असिस्टेड टोटल नी रिप्लेसमेंट (TKR) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यात अपोलो हॉस्पिटल मधील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक सर्जरीचे सिनियर कन्सल्टन्ट, डॉ. संजय धर, डॉ. विक्रम पावडे, डॉ.प्रशांत अग्रवाल, डॉ.सिद्धार्थ यादव आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रुग्णांना आधार देण्यासाठी एक विशेष गट सुरू करणे हा आहे. ज्यांनी गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली आहे किंवा करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा गट ‘सेफ प्लेस’ म्हणून काम करेल. सामायिक अनुभव, शस्त्रक्रियेनंतरचे मार्गदर्शन, भावनिक आश्वासन आणि सतत प्रेरणा प्रदान करणे हे गटाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या उपचार प्रवासात कोणताही रुग्ण एकटा राहणार नाही हे सुनिश्चित केले जाईल.
डॉ.संजय धर, ऑर्थोपेडिक्स-रोबोटिक सर्जरीचे सिनियर कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“गुडघे बदलणे ही केवळ एक शस्त्रक्रिया नाही – व्यक्तीला हालचाल करण्याचे, स्वतःची सर्व कामे स्वतः करता यावीत याचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवून देण्याबाबत आहे. जेव्हा आम्ही गुडघे बदलण्याचा सल्ला देतो तेव्हा रुग्णांना सर्वात मोठी भीती असते की ते पुन्हा चालू शकतील की नाही. रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेमुळे, रुग्ण खूप लवकर बरा होतो. बहुतेक रुग्ण २४ तासांच्या आत चालण्यास सुरुवात करतात आणि यामुळे त्यांना खूप आत्मविश्वास मिळतो.”
डॉ.विक्रम पावडे, ऑर्थोपेडिक्स-रोबोटिक सर्जरीचे सिनियर कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे, आम्ही अनुभवी सर्जन, प्रशिक्षित कर्मचारी आणि वेदना व्यवस्थापन तज्ञांसह मल्टी-डिसिप्लिनरी दृष्टिकोन वापरतो. यामुळे रुग्णाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वेदनामुक्त अनुभव मिळतो.”
श्री.अरुणेश पुनेथा, पश्चिम विभाग-प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही २०० हून अधिक रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आणि सर्व रुग्णांची उत्कृष्ट रिकव्हरी देखील झाली आहे. या टीकेआर प्रक्रियांमुळे आमचे रुग्ण त्यांचे जीवन परत सुरु शकतात – ते त्यांची दैनंदिन कामे स्वतःहून करू शकतात आणि हेच आमच्या रुग्णांना आम्ही देत असलेले खरे मूल्य आहे. आमच्या रुग्णांना सर्वसमावेशक काळजी देणाऱ्या आमच्या डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या रुग्ण समर्थन गटाच्या माध्यमातून, आम्ही एक देखभाल समुदाय तयार करत आहोत.”

