सायबर फसवणूका आणि डिजिटल घोटाळे नव्या स्तरावर पोहोचले आहेत. सरकारी डेटा (government data) नुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये व्यक्तींनी फसवणूकीमुळे एकत्रित १.७७ बिलियन रूपये गमावले. यंदा एप्रिल फूल दिनानिमित्त व्हिसा डिजिटल पेमेंट घोटाळे ओळखण्यासाठी, थांबवण्यासाठी आणि टाळण्यासाठी सोप्या टिप्स सांगत आहे.
१. सिम स्वॅप: स्कॅमर्स मोबाइल कॅरियर्सना तुमचा नंबर त्यांच्या स्वतःच्या सिममध्ये पोर्ट करण्यास भाग पाडू शकतात, ज्यामुळे त्यांना ओटीपी आणि खात्यांमध्ये प्रवेश मिळू शकतो, ज्याला सिमजॅकिंग देखील म्हणतात. तुम्हाला अचानक नेटवर्क लॉस, सिम बदलण्याचे अलर्ट आणि लॉगिन प्रयत्न व एसएमएस अलर्ट सारख्या असामान्य अॅक्टिव्हिटीचा सामना करावा लागला तर तुमचे खाते सुरक्षित करण्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (एमएफए) सक्षम करा, जे फक्त बायोमेट्रिक्स सारख्या एसएमएसवर अवलंबून नसते.
२. डिजिटल अरेस्ट: कायद्याच्या अंमलबजावणीची तोतयागिरी करणारे स्कॅमर्स गुन्ह्यात तुमचा सहभाग असल्याचा दावा करतात आणि अटक टाळण्यासाठी त्वरित पैसे मागतात. लक्षात ठेवा, कायदेशीर अधिकारी कधीही कॉलवर पैसे मागत नाहीत. कॉलरची वैधता पडताळण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर होस्ट केलेल्या भारत सरकारच्या आय४सी ऑनलाइन डेटाबेस (Indian Government’s I4C online database)चा वापर करा.
३. स्कॅमिंग स्कॅम: हॅकर्स स्किमर्स वापरून पीओएस किंवा एटीएम मशिनशी छेडछाड करू शकतात किंवा वेबसाइटवर मालिशियस कोड वापरून कार्ड तपशील चोरू शकतात किंवा खरेदीदारांना बनावट चेकआउट पेजेसवर पुनर्निर्देशित करू शकतात. एटीएममध्ये स्किमर्स तपासा आणि स्टोअरमध्ये तुमचे व्हिसा कार्ड टॅप करण्यासाठी कॉन्टॅक्टलेस पेमेंट वापरा. विश्वसनीय अॅप्सवर तुमचे कार्ड सेव्ह करा आणि फक्त एका टॅपने पेमेंट करा!
४. व्हॉइस क्लोनिंग एआय स्कॅम: फसवणूक करणारे ओळखीच्या व्यक्तींच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी एआयचा वापर करतात आणि तुम्हाला अज्ञात नंबर व व्यक्तींना पैसे पाठवण्यासाठी दबाव आणू शकतात. त्वरित पेमेंट करण्यास सांगणाऱ्या फोन कॉल्सबद्दल काळजी घ्या आणि ते तुमचे मित्र वाटत असतील तर त्यांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे किंवा वैयक्तिक प्रश्न विचारा.
डिजिटल घोटाळ्यांची तक्रार नेहमी सायबर क्राइम हेल्पलाइनवर (१९३० वर डायल करा), तसेच त्यांच्या पोर्टलवर (their portal) किंवा एनसीआरपीवर करावी. यंदा एप्रिल फूलच्या दिवशी, सावध रहा आणि घोटाळेबाजांना फसवणूक करण्याची संधी देऊ नका!

